कोणाला संधी, कोणाला डच्चू?; मनसे, शिंदे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी आज होणार जाहीर?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, इतर पक्षांकडूनही लवकरच यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मनसेसह शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) देखील लवकरच आपल्या उमेदवारांच्या यादी जाहीर करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणात जोरदार बदल दिसून येत आहेत.

कोणाला संधी, कोणाला डच्चू?; मनसे, शिंदे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी आज होणार जाहीर?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 9:19 AM

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यातच काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी झाली. या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर काही उमेदवारांमध्ये आनंदाचे तर काहींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपच्या यादीनंतर आता लवकरच सर्वच पक्षांकडून त्यांच्या पहिल्या उमेदवारींची यादी जाहीर करणार आहेत.

राज ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अॅक्शन मोडवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचे निवास्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी बैठकांवर बैठका पार पडत आहेत. आज सकाळी राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मनसेच्या उमेदवार निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे मनसेच्या विधानसभा लढणाऱ्या उमेदवारांची यादीच आजच जाहीर होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मनसेने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात मुंबईसह महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर

2. पंढरपूर – दिलीप धोत्रे

3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे

4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे

5. चंद्रपूर – मनदीप रोडे

6. राजुरा – सचिन भोयर

7. वणी – राजू उंबरकर

शिंदे गटाची यादीही तयार, ३० ते ४० जणांचा समावेश

दरम्यान भाजपपाठोपाठ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली विधानसभेची यादी तयार करण्यात आली आहे. आज या यादीवर शेवटचा विचारविनिमय केला जाणार आहे. त्यानंतरच शिंदे गटाकडून साधारण ३० ते ४० जणांची यादी प्रदर्शित केली जाईल.

उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब

तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादीही आजच जाहीर केली जाईल, असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहेत. आज या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.