AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काही लोकांच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली’; धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडली

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी परळीत शरद पवार यांची सभा पार पडली, या सभेमधून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

'काही लोकांच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली'; धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडली
शरद पवारImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 09, 2024 | 5:53 PM
Share

महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आज परळीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली, राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांची ही परळीमध्ये पहिलीच सभा होती. ते या सभेत काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

परळीने जीवा भावाचा सहकारी दिला होता, महाराष्ट्राला वीज देण्याचं काम या परळीतून होतं अलीकडच्या काळात परळीला काय झालं आहे ते माहीत नाही परळीत गुंडागिरी वाढली आहे.  काही लोकांना राजकीय संकटाच्या काळात मदत केली होती. बीड जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचं काम मला दिले होते, दुर्दैवाने आता परिस्थिती बदलली सत्ता आल्यानंतर सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही, मात्र काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली.  लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत पवार यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बीड जिल्ह्यातील गुंडागिरी थांबावी, बीड जिल्ह्यातील शेतीचे पाण्याचे प्रश्न सोडवावेत. तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी तुमची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करा. पक्ष संकटात आहे, अनेक अडचणी आहेत. पक्ष फोडण्यात तीन लोक प्रामुख्याने होते, त्यात कोण लोक होते हे विसरण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी परळीमधून महायुतीकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्यावेळी महाविकास आघाडीकडून धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांनी माहयुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. राज्यातील ज्या काही प्रमुख विधानसभेच्या लढती आहे, त्यामध्ये या मतदारसंघाचा देखील समावेश होतो.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?