Maharashtra Marathi Breaking News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

| Updated on: Dec 19, 2023 | 7:12 AM

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आज 18 डिसेंबर... राज्य विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासंदर्भातील प्रत्येक घडामोडी... विरोधकांचे आरोप अन् सत्ताधाऱ्यांची उत्तरं... अधिवेशनासंदर्भातील महत्वाच्या बातम्या तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Marathi Breaking News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरु आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरनंतर वेळ देणार नसल्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे. मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या न्या.शिंदे समितीतील ३ निवृत्त न्यायाधिशांना कॅबिनेट दर्जा दिला जाणार आहे. तसेच मुंबईतील हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान रुळांची वेगक्षमता १०५ किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे हा प्रवास वेगवान होणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा  ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Dec 2023 06:55 PM (IST)

    लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होईल: छत्तीसगड मुख्यमंत्री

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सांगितले की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होईल. नव्या आणि जुन्या अशा दोन्ही चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

  • 18 Dec 2023 06:45 PM (IST)

    संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला, एसआयटी स्थापन करण्याची मागणी

    संसदेच्या सुरक्षेचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 18 Dec 2023 06:32 PM (IST)

    जयाप्रदा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, त्यांच्या शिक्षेवर 6 महिन्यांची स्थगिती

    चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने ESIC प्रकरणात जयाप्रदा यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. जयाप्रदा यांना ESIC प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा झाली होती.

  • 18 Dec 2023 06:22 PM (IST)

    मुंबईतील जुहू येथील रेसिडेन्सी हॉटेलला आग, कोणतीही जीवितहानी नाही

    मुंबईतील जुहू येथील रेसिडेन्सी हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

  • 18 Dec 2023 06:09 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस, 21 डिसेंबरला हजर राहावे लागणार

    सक्तवसुली संचालनालयाने मद्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. ईडीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी 2 नोव्हेंबरला ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ही नोटीस बेकायदेशीर ठरवत ती मागे घेण्याची मागणी केली होती.

  • 18 Dec 2023 05:27 PM (IST)

    Eknath Shinde | वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    नागपूर | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. पण सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी झाली. त्यामुळे 6 लाख 56 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6 लाख 56 हजार वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करतो", अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

  • 18 Dec 2023 05:20 PM (IST)

    येत्या पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, सरकारचं उत्तर

    नागपूर | विद्यार्थी हे गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सरकार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे, हे आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. तसेच संविधानाने दिलेला हा अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर गांभीर्याने चर्चा झालीच पाहिजे. जर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानभवनात उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या खात्यात येत्या 15 दिवसात पैसे येतील, असं उत्तर सरकारकडून मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं.

  • 18 Dec 2023 05:12 PM (IST)

    लोकसभा आणि राज्यसभेतील 81 खासदारांचे आजपर्यंत निलंबन

    नवी दिल्ली | देशाच्या राजधानीतून मोठी बातमी समोर आली आहे. आज (18 डिसेंबर) दिवसभरात 67 खासदारांच निलंबन करण्यात आलं आहे. जयराम रमेश, रजनी पाटील यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण 81 खासदारांचे आजपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता उद्यापासून कामकाज चालणार की नाही, याकडे राजकीय विश्वाचं लक्ष असणार आहे.

  • 18 Dec 2023 04:57 PM (IST)

    संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांसाठी १६९ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद, पणन मंत्री अब्दुल सत्तार

    नागपूर : संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्याचा आर्थिक फटका संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना बसला. त्यासाठी राज्य शासनाने १६९ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा दिला जाईल, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

  • 18 Dec 2023 04:53 PM (IST)

    ठाकरे गटाची अवस्था 'घर का ना घाट का', मंत्री गिरीश महाजन यांची टीका

    नागपूर : सलीम कुत्ता हा बाँम्बस्फोटातील सर्वात मोठा सुत्रधार आहे. तो नगरसेवक बडगुजर यांच्यासोबत तिकडे नाचत आहे. आमच्यावर आक्षेप घेतला जातोय. पण, ठाकरे गटाची अवस्था 'घर का ना घाट का' झालीय अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

  • 18 Dec 2023 04:49 PM (IST)

    बळीराजाला दीड वर्षात ४४ हजार २७८ कोटी मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती

    नागपूर : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. ३२ पैकी २६ जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अवकाळीसाठी 2 हजार कोटी देय आहेत. जसे पंचनामे पूर्ण होतील तशी ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल. काही चेकचे वाटप दिले आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू जास्त महत्वाचे आहेत. त्यांची जास्त काळजी आहे. बळीराजाला ४४ हजार २७८ कोटी इतकी मदत दीड वर्षात दिली आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

  • 18 Dec 2023 04:43 PM (IST)

    शरण आलेल्या नक्षलवाद्यांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

    नागपूर : नक्षलवादी कारवायामुळे पीडित होऊन विस्थापित होणारे तसेच नक्षलवादी विचारसरणीचा त्याग करून जे शरण येतात, त्यांचे पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे. या प्रक्रियेसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा. विशेष पोलीस मोहिमांमध्ये शहीद झालेल्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नेमणुका तातडीने करण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

  • 18 Dec 2023 04:36 PM (IST)

    मुख्यमंत्री यांच्या हस्ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप

    नागपूर : अवकाळी पावसामुळे राज्यात साडेपाच ते सहा लाख हेक्टर पिकांचं नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विधानभवन परिसरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधिक रुपात काही शेतकऱ्यांना मदत केलीय. कोरडवाहू शेतकऱ्यांना २१ हजार ६०० रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आलीय. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

  • 18 Dec 2023 04:28 PM (IST)

    ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कारागृहात रवानगी, पुढचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये

    नाशिक : नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासह चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १० दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आता ललित पाटीलच पुढचा मुक्काम असणार आहे. ललित पाटील, हरीश पंत, रोहित चौधरी आणि जिशान शेख या चौघांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

  • 18 Dec 2023 04:26 PM (IST)

    नाशिकमधून तब्बल १९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त

    नाशिक : अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत १९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलंय. नाशिकच्या सिडको परिसरातील अंबड-लिंक रोड येथील मे. तिस्ता क्रोप केअर प्रा. लि. या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. रिफाईन्ड पोमोलिन ऑईलचा वापर करून पनीरचे अन्नपदार्थ बनवित असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

  • 18 Dec 2023 04:18 PM (IST)

    न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सरकारला सादर, मुख्यमंत्री उद्या सभागृहात अहवाल मांडणार

    नागपूर : मराठा आरक्षण संदर्भात नेमण्यात आलेल्या शिंदे समितीने आपला दुसरा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी सभागृहात मांडणार आहेत. हा अहवाल सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीचे आभार मानले आहेत. याची पुढची कार्यवाही आपण करणार आहोत. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

  • 18 Dec 2023 04:12 PM (IST)

    दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता येरवडा जेलमध्येच, अधिकाऱ्यांनी दिली माहिती

    पुणे : सध्या राज्यभर चर्चेत असलेला दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता हा 2016 पासून पुण्यातील येरवडा कारागृहात बंद आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 1993 च्या बॉम्बस्फोटात सह आरोपी असलेला सलीम कुत्ता 2016 पासून येरवडा येथे सजा भोगत आहे. 2016 च्या आधी तो नाशिक येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. त्यावेळी तो पॅरोलवर सुटला होता. डान्स करतानाचा त्याच जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय तो त्याच वेळेचा असल्याचे देखील बोलले जात आहे.

  • 18 Dec 2023 04:07 PM (IST)

    विनोद तावडे तुम्ही एक दिवस मुख्यमंत्री नक्की व्हाल

    पुणे : विनोद तावडे हुशार आहेत. ते मुद्दाम मंचाच्या खाली बसले आहेत. त्यांना माहिती आहे की ज्यांनी ज्यांनी खाली बसून मला ऐकलं आहे ते पंतप्रधान झालेत. तुम्ही मुख्यमंत्री तर व्हलच. नरेंद्र मोदी हे 2006-07 मध्ये मला खाली बसून ऐकत होते. मी म्हणालो होतो की तुम्ही पंतप्रधान व्हाल. 2014 मध्ये ते बनले सुद्धा असे विधान कुमार विश्वास यांनी पुण्यात केलं.

  • 18 Dec 2023 03:52 PM (IST)

    मराठा आरक्षणांसंदर्भात शिंदे समितीकडून दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सादर

    शिंदे समितीने मराठा आरक्षणासंदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केला आहे.

  • 18 Dec 2023 03:40 PM (IST)

    लोकसभेत गदारोळ केल्याने आज आणखी 33 खासदार निलंबित

    लोकसभेत गदारोळ केल्याने अनेक विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी अधीर रंजन चौधरी यांच्यासह 33 विरोधी खासदारांना निलंबित केले. या खासदारांच्या निलंबनाबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात प्रस्ताव ठेवला होता, तो मान्य करण्यात आला आहे. याआधी विरोधी पक्षाच्या एकूण 14 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. असे पाहिले तर या अधिवेशनात आतापर्यंत एकूण 47 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

  • 18 Dec 2023 03:17 PM (IST)

    मराठा आरक्षणासंदर्भातला शिंदे समितीची अहवाल थोड्याच वेळात सादर होणार

    मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातला शिंदे समितीची अहवाल थोड्याच वेळात सादर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादर होणार अहवाल.

  • 18 Dec 2023 03:12 PM (IST)

    जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकेंचा मोर्चा

    जालना : जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकेंचा मोर्चा काढण्यात आला. वेतन वाढ करण्यात यावी या सह विविध मागण्यासाठी शहरातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले. आमच्या मागण्या सरकारने लवकर मान्य कराव्या अशी मागणी देखील करण्यात आली.

  • 18 Dec 2023 02:55 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना देणार गुड न्यूज

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विक्रमी मदत जाहीर करणार असल्याची माहीती समजत आहे.  मुख्यमंत्री यांची संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे.

  • 18 Dec 2023 02:45 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी नारंगी सारंगी धरणात उतरून आंदोलन सुरू

    मराठा आरक्षणासाठी वैजापूर तालुक्यातले कार्यकर्ते आक्रमक झालेत. नारंगी सारंगी धरणात उतरून आंदोलन सुरू केलं आहे. मराठा कार्यकर्त्याचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न, धरण परिसरात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. अनेक कार्यकर्ते नारंगी सारंगी धरणाच्या पाण्यात उतरलेत. गेल्या चार तासापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. धरण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

  • 18 Dec 2023 02:35 PM (IST)

    नाशिक - पुणे महामार्गावर अपघातात चौघांचा मृत्यू

    संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे.  माल वाहतूक ट्रक कारला धडकला.  अकोले तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रकचालक घटना घडल्यावर झाला फरार झालाय.

  • 18 Dec 2023 02:20 PM (IST)

    दाऊद मेला की जिवंत संबंधित आमदारांनी हेसुद्धा सांगावं- नितेश राणे

    बडगुजर यांनी फार्म हाऊसवर स्वत: पार्टी बोलावली. आमदारांकडे दहशतवाद्यांबाबत एवढी माहिती कशी? दाऊद मेला की नाही हेसुद्धा संबंधित आमदारांनी सांगावं- नितेश राणे

  • 18 Dec 2023 02:10 PM (IST)

    कैलास गोरंट्याल यांना सलीम कुत्ताबाबत कोणी माहिती दिली- नितेश राणे

    कैलास गोरंट्याल यांना सलीम कुत्ताबाबत कोणी माहिती दिली.  1993 च्या बॉम्बस्फोटाबाबत राजकारण होऊ शकत नाही. कैलास गोरंट्याल यांची चौकशी करा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

  • 18 Dec 2023 01:57 PM (IST)

    केवळ आकसापोटी सरकारचे आमदार संजय राऊत यांच्यावर आरोप करत आहेत- सुनिल प्रभू

    केवळ आकसापोटी सरकारचे आमदार संजय राऊत यांच्यावर आरोप करत आहेत. संजय राऊत यांचा कोणताच संबंध नाही , हा निव्वळ पोरखेळ आहे. आम्ही काल नागपूरात झालेल्या सोलार कंपनीतील ब्लास्टबद्दल सरकारला विचारणा केली पण त्यावर सरकारने अद्याप ऊत्तर दिलं नाहीये, असे सुनिल प्रभू  यांनी म्हटले आहे.

  • 18 Dec 2023 01:36 PM (IST)

    मराठा समाजासाठी ज्यांनी लढा दिला आहे ते लोक बैठकीसाठी आले आहेत

    जसा मनोज जरांगे प्रयत्न करत आहेत तसा सगळे प्रयत्न करत आहेत. कोणाला इशारा आम्ही दिला नाही... तो देण्याचा संबंध नाही. माझं सर्व खासदारांना आवाहन आहे... जर निरोप पोहोचला नसेल तर हे निमंत्रण समजून बैठकीला या, असे संभाजी राजे छत्रपती म्हणाले आहेत.

  • 18 Dec 2023 01:12 PM (IST)

    अमरावतीच्या अचलपूरमध्ये मोठ्या घडामोडी

    अमरावतीच्या अचलपूर शहरमध्ये मध्यरात्री NIA ने केलेल्या छापेमारीत ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांला अमरावतीला आणले. अमरावतीमध्ये एका ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याची NIA कडून कसून चौकशी.

  • 18 Dec 2023 01:02 PM (IST)

    नाशिकहून पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प

    पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर मालवाहतूक गाडीचा अपघात झाल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली आहे.

  • 18 Dec 2023 12:39 PM (IST)

    अमरावतीच्या अचलपूरमध्ये मध्यरात्री NIA ची छापेमारी

    अमरावतीच्या अचलपूरमध्ये मध्यरात्री NIA ची छापेमारी करुन एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हा विद्यार्थी दहशतवादी कारवाया मध्ये गुंतला असावा असा NIA ला संशय आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांला NIA चे पथक अमरावतीला घेऊन गेल्याची माहिती

  • 18 Dec 2023 12:16 PM (IST)

    केईएम,नायर, सायन रुग्णालयात डॉक्टरांचा संप

    डॉक्टरांना परमानंट करा, वेतन वाढ करा, डॉक्टरांना राहण्यासाठी क्वार्टर्सची व्यवस्था करा अशा अनेक मागण्यासाठी केईएम रुग्णालयातील डॉक्टर आज संपावर राहणार आहेत.

  • 18 Dec 2023 11:59 AM (IST)

    भाजपशासित तीन राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार

    नवी दिल्ली- भाजपशासित तीन राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रीपदाची नावं दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून निश्चित करण्यात आली आहेत.

  • 18 Dec 2023 11:55 AM (IST)

    नैना प्रकल्पाचा विरोध करणारे गावांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला

    नैना प्रकल्पाचा विरोध करणारे गावांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहे. पनवेल, पेण आणि उरण तालुक्यांत होणाऱ्या नैना प्रकल्पाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. तसेच 6 डिसेंबरपासून सिडकोविरोधात काही प्रकल्पग्रस्त नेते मंडळी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मात्र सरकार प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती राज ठाकरे यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन आले आहे. सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या २५ किलोमीटरच्या परिघात नैना प्रकल्प राबवला जात आहे. यामुळे पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील गावे बाधित होत आहेत. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सिडकोतर्फे जी मोबदल्यात जमीन दिली जात आहे, त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

  • 18 Dec 2023 11:45 AM (IST)

    'एक राष्ट्र, एक निवडणूक' या संकल्पनेवर विचारमंथन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक

    'एक राष्ट्र, एक निवडणूक' या संकल्पनेवर विचारमंथन करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची आज अनौपचारिक बैठक होण्याची शक्यता आहे. या संकल्पनेबाबत आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचं मानलं जात आहे. एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिक्रियांवरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. समितीने पहिल्या बैठकीत राजकीय पक्षांचे मत जाणून घेण्याचा निर्णय घेतला होता.

  • 18 Dec 2023 11:35 AM (IST)

    नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी निकाल येत्या 20 डिसेंबरला

    नागपूर - नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी निकाल येत्या 20 डिसेंबरला सुनावण्यात येणार आहे. आजचा निकाल पुढे ढकलला आहे. 18 डिसेंबर रोजी निकाल देण्यास न्यायदंडाधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याची मुभा दिली. या प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार या घोटाळ्यात मुख्य आरोपी आहेत.

  • 18 Dec 2023 11:25 AM (IST)

    नवी दिल्ली- लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ

    नवी दिल्ली- लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी जोरदार गदारोळ करण्यास सुरुवात केली. घुसखोरीचा मुद्दा आणि खासदारांचे निलंबन यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

  • 18 Dec 2023 11:13 AM (IST)

    रत्नागिरी- कोकणात मतलई वारे वाहण्यास सुरुवात

    रत्नागिरी- कोकणात मतलई वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. किनारपट्टी भागात मतलई वाऱ्यांचा वेग अधिक वाढला आहे. या वाऱ्यामुळे मासेमारी जाळी टाकण्यासाठी अडथळा येतोय. पुढील दीड महिना मतलई वाऱ्यांचा वेग कायम राहणार आहे. मतलई वारे आंब्याच्या हंगामासाठी देखील पोषक असतात. समुद्रावरील हवेचा दाब आणि जमिनीवरील हवेचा दाब यांमुळे मतलई वारे तयार होतात.

  • 18 Dec 2023 10:57 AM (IST)

    Live Update : चंपाषष्ठीनिमित्त जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमली जेजुरी

    चंपाषष्ठीनिमित्त जय मल्हारच्या जयघोषाने दुमदुमली जेजुरी... खंडोबाची पूजा, भंडारा, तळी भरण्यासाठी भाविकांची जेजुरीत गर्दी... पहाटेपासून भाविक जेजुरीत दाखल... चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी देवस्थानाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे अयोजन

  • 18 Dec 2023 10:50 AM (IST)

    Live Update : महाराष्ट्रात पुन्हा एनआयएच्या धाडी; काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती

    महाराष्ट्रात पुन्हा एनआयएच्या धाडी पडल्या आहेत. ISIS मॉड्यूलविरोधात महाराष्ट्रात NIA चं धाडसत्र... काही काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत अनेक ठिकाणी धाडी... अमरावतीच्या अचलपूरमध्ये एनआयएचे छापे

  • 18 Dec 2023 10:40 AM (IST)

    Live Update : दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मराठा आरक्षण द्या - जरांगे पाटील

    दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मराठा आरक्षण द्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या तज्ज्ञांकडे लेखी नोंदी आहेत. मुख्यमंत्री खोटं बोलणार नाहीत पण, मुख्यमंत्री खोटं बोलल्यास चिठ्ठी उघड करु. राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे... असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 18 Dec 2023 10:35 AM (IST)

    Live Update : इंडिया आघाडीची मंगळवारी राजधानी दिल्लीत बैठक

    इंडिया आघाडीची उद्या राजधानी दिल्लीत बैठक होणार आहे. बैठकीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सहभागी होणार आहेत. तिघेही नेते आजच संध्याकाळी राजधानी दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • 18 Dec 2023 10:22 AM (IST)

    Live Update : एक देश एक निवडणूकबाबत आज महत्वपूर्ण बैठक

    एक देश एक निवडणूक बाबत आज महत्वपूर्ण बैठक... जोधपूर ऑफिसर्स होस्टेलमध्ये आज होणार बैठक... आज संध्याकाळी साडेचार वाजता होणार बैठक,, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश , एक निवडणूकसाठी तयार करण्यात आलेल्या समितीची आज होणार महत्त्वपूर्ण बैठक

  • 18 Dec 2023 10:00 AM (IST)

    पुणे - जुन्या वादातून तरूणावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला

    पुण्यात जुन्या वादातून एका तरूणावर चाकूने वार करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना घडली. तरूणाला घराबाहेर बोलवत घराच्या परिसरातच त्याच्यावर हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांना देखील आरोपींकडून दम देण्यात आला.

  • 18 Dec 2023 09:55 AM (IST)

    फोडा, झोडा, राज्य करा अशा पद्धतीने भाजप वागतंय - संजय राऊत

    फोडा, झोडा, राज्य करा अशा पद्धतीने भाजप सध्या वागत आहे.

  • 18 Dec 2023 09:52 AM (IST)

    महाराष्ट्राचा कारभार सध्या दिल्लीतून चालतो - संजय राऊत

    महाराष्ट्राचा कारभार सध्या दिल्लीतून चालतो आहे. महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली.

  • 18 Dec 2023 09:48 AM (IST)

    संभाजीराजे यांनी बोलावलेल्या बैठकीला आमचे नेते उपस्थित राहतील - संजय राऊत

    संभाजीराजे यांच्या बैठकीकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्यांनी बोलावलेल्या बैठकीला आमचे नेते उपस्थित राहतील , असे संजय राऊत म्हणाले.

  • 18 Dec 2023 09:44 AM (IST)

    'इंडिया'च्या बैठकीला सर्व घटकपक्षांना निमंत्रण - संजय राऊत

    'इंडिया'च्या बैठकीला सर्व घटकपक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे आज राजधानी दिल्लीत जाणार आहेत.

    उद्धव ठाकरे- केजरीवाल यांची भेट पूर्वनियोजित आहे, असे संजय राऊत म्हणाले.

  • 18 Dec 2023 09:26 AM (IST)

    21 तारखेला दिल्लीत होणार काँग्रसेच्या वर्किंग कमिटीची बैठक

    3 राज्यातील पराभवानंतर  काँग्रेस पक्ष पुन्हा कामाला लागला आहे, 21 तारखेला दिल्लीत काँग्रसेच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे.  मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार आहे. तसेच तीन राज्यात झालेल्या पराभवाच्या कारणांवरही चर्चा होईल.

  • 18 Dec 2023 09:11 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा उपक्रम आपल्या मंत्रिमंडळात राबवावा - एकनाथ खडसे यांचा सल्ला

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला स्वच्छता अभियान उपक्रम चांगला आहे, पण स्वच्छतेचा हा उपक्रम त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातही राबवावा, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.  सध्या त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे देशद्रोहाचे आरोप होत आहेत,  त्यांनी स्वच्छतेची सुरुवात तिथून करावी, असेही ते म्हणाले.

    मुख्यमंत्री महोदय आपण जी स्वच्छता बाहेर करता आहात ती मंत्रिमंडळातील अंतर्गत स्वच्छता करा, असे खडसे यांनी सांगितले.

  • 18 Dec 2023 08:57 AM (IST)

    पुण्यात कचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मोडवर

    पुणे महानगरपालिकेचा कचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मोडवर आहे.  शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.  पुणे महानगरपालिकेकडून गेल्या पाच दिवसात 2380 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून महापालिकेकडून 5 दिवसात 9 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  पुणे महानगरपालिकेकडून शहरभरात पथकांची स्थापना करण्यात आली आहे.  तर गेल्या पंधरा दिवसात त पुणे महानगरपालिकेकडून 19 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.  सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर आणि जाळणाऱ्यांवर पुणे महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.

  • 18 Dec 2023 08:45 AM (IST)

    विनायक मेटे यांच्या निवासस्थानावरून वाद

    पुण्यात विनायक मेटे यांच्या निवासस्थानावरून वाद... विनायक मेटे यांच्या बहिण आणि त्यांच्या मुलाने घर हडपल्याचा विनायक मेटे यांच्या मुलाचा आरोप आहे. विनायक मेटे यांच्या बहिणी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात विनायक मेटे यांनी खरेदी केलेल्या घराच्या ताब्यावरून नेत्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झालाय. विनायक मेटे यांच्या मुलाकडून विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक मेटे यांनी खरेदी केलेल्या घरात त्यांच्या बहिणीने आणि भाच्याने अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 18 Dec 2023 08:30 AM (IST)

    दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग?

    मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची सध्या चर्चा सुरु आहे. दाऊद याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जातोय.

  • 18 Dec 2023 08:15 AM (IST)

    नाशिक पोलीस सलीम कुत्ताचा जबाब घेणार

    नाशिक पोलीस सलीम कुत्ताॉचा जबाब घेणार आहेत.  नाशिक पोलिसांचे पथक लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहे.  1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सध्या येरवडा जेलमध्ये आहे.  सलीम कुत्ताची कसून चौकशी होणार आहे.  नाशिकमध्ये झालेल्या कथेत पार्टी प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची चौकशी सध्या सुरू आहे. बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या संबंधाची चौकशी होणार आहे. नाशिक पोलिसांचे पथक लवकरच येरवडा कारागृहात जाण्याची शक्यता आहे.

  • 18 Dec 2023 07:58 AM (IST)

    Marathi News | सरसंघचालक मोहन भागवत आज कोल्हापुरात

    सरसंघचालक मोहन भागवत आज कोल्हापुरात येत आहे. मोहन भागवत करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. मोहन भागवत यांच्या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 18 Dec 2023 07:43 AM (IST)

    Marathi News | राज्यसभा अन् विधान परिषदेच्या निवडणुका

    आगामी वर्षांत लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होत असतानाच राज्यसभेचे सहा तर विधान परिषदेचे तब्बल २१ आमदार निवृत्त होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याने राष्ट्रवादीचा शरद पवार गट  तसेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्याकरिता कसरत करावी लागणार आहे.

  • 18 Dec 2023 07:32 AM (IST)

    Marathi News | मुंबईतील प्रवास वेगवान होणार

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे. हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान रुळांची वेगक्षमता १०५ किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात १५ मिनिटांची बचत शक्य होणार आहे.

  • 18 Dec 2023 07:14 AM (IST)

    Marathi News | न्या. शिंदे समितीला कॅबिनवेट दर्जा

    मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या न्या.शिंदे समितीतील ३ निवृत्त न्यायाधिशांना कॅबिनेट दर्जा दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्या शिंदे समितीच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी शासनाकडून हे महत्वाचे पाऊल उचलले जाणार आहे.

Published On - Dec 18,2023 7:13 AM

Follow us
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.