AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board Results 2025 Date : 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय ? कुठे चेक कराल निकाल ?

Maharashtra Board Class 10th, 12th Result 2025 : महाराष्ट्र दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होण्यास काहीचदिवस उरले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि https://mahresult.nic.in/ वर त्यांची प्रोव्हिजनल मार्कशीट तपासू शकतील. नक्की कधी लागणार निकाल, ताजे अपडेट्स काय ते जाणून घेऊया.

Maharashtra Board Results 2025 Date : 10वी-12वी बोर्ड रिझल्टबद्दल ताजे अपडेट्स काय ? कुठे चेक कराल निकाल ?
10वी-12वी बोर्ड रिझल्टImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: May 04, 2025 | 3:30 PM
Share

Maharashtra Board Class 10th 12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) लवकरच दहावी (SSC) आणि बारावी (HSC) वर्ग 2025 चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.यंदा 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या असून ते निकालाच्या तारखेची आणि मार्कशीट कधी हातात येईल याची हत आहेत. यावर्षी, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च आणि बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली.

निकाल जाहीर झाल्यानंतर, 10वी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in आणि https://mahresult.nic.in/ वर त्यांची प्रोव्हिजनल मार्कशीट तपासू शकतील.

कधी लागणार निकाल ?

ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्र बोर् हेड मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्ड दहावी (एसएससी) निकाल आणि महाराष्ट्र बोर्ड बारावी (एचएससी) निकाल 2025 जाहीर करू शकते. गेल्या वर्षी एसएससी बोर्डाचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. त्याआधी 2019 साली 08 जूनला तर 2020 मध्ये 29 जुलैला आणि 2023 साली हा निकाल 02 जूनला लागला होता. आता बोर्ड लवकरच निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर करणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक ?

दहावीप्रमाणे, महाराष्ट्र बारावी (एचएससी) उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 % गुण मिळवावे लागतात. दोन्ही वर्गांसाठी उत्तीर्ण होण्याचे निकष सारखेच आहेत. प्रत्येक विषय १०० गुणांचा असतो, ज्यामध्ये थिरी 80 गुणांची असतो आणि प्रॅक्टिकल/इंटर्नल मूल्यांकन 20 गुणांचे असते. उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी किमान 35 गुण आवश्यक आहेत. म्हणजेच 80 गुणांच्या थिअरी पेपरमध्ये किमान 28 गुण मिळवणे आणि प्रॅक्टिकलमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

रिझल्टनंतर काय कराल ?

निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक तपासावे. मूळ गुणपत्रिका काही दिवसांनी शाळेतून उपलब्ध होईल. जर तुम्ही निकालांमुळे माधानी नसाल, तर तुम्ही जून 2025 मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकता. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, ते जुलै 2025 मध्ये पुरवणी परीक्षेला बसू शकतात. विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत वेबसाइटवर विश्वास ठेवावा आणि बनावट बातम्यांपासून दूर रहावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.