AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra 12th Result 2026 Declared : 12 वीचा निकाल जाहीर, राज्यात कोकणने मारली बाजी, सर्वात कमी निकाल कोणाचा ? वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी मुलींनी पुन्हा बाजी मारली असून, मुलांपेक्षा त्यांचा निकाल अधिक लागला आहे. तर राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. विद्यार्थी आपला निकाल दुपारी 1 वाजल्यापासून mahahsscboard.in आणि अन्य अधिकृत वेबसाईटवर तपासू शकतात.

Maharashtra 12th Result 2026 Declared : 12 वीचा निकाल जाहीर, राज्यात कोकणने मारली बाजी, सर्वात कमी निकाल कोणाचा ? वाचा एका क्लिकवर
12 वीचा निकाल जाहीरImage Credit source: social media
| Updated on: May 02, 2026 | 12:27 PM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी ते मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला.  थोड्याच वेळापूर्वी बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन सविस्तर निकाल सादर केला. यंदा 12 वीचा निकाल एकूण 89.79 टक्के लागला आहे. यंदाच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली तर सर्वाधिक कमी निकाला हा लातूर विभागाचा लागला आहे.  नऊ विभागांमध्ये कोकण हा पहिल्या स्थानी असून या विभागाचा निकाल 94.14 % इतका लागला आहे.

गेल्या वर्षी, म्हणजे 2025 साली 12 वीचा निकाल 91.88 टक्के लागला होता. यंदा (2026 साली) गेल्या वर्षीपेक्षा 2.09 टक्के कमी निकाल लागला आहे.

यंदाही मुलींची बाजी

12 वीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून 93. 15 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर 86.80 टक्के मुलं उत्तीर्ण झाली.

आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच डिजीलॉकरवर (DigiLocker) देखील हा निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.

विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे

कोकण 94.14 %
कोल्हापूर 89. 97 %
मुंबई 90.08 %
छत्रपती संभाजीनगर 88.68 %
अमरावती 90.92 %
पुणे 91.25 %
नाशिक 90.72 %
नागपूर 88.67 %
लातूर 84.14 %

लाखो विद्यार्थ्यांचा लागला निकाल 

फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, 12 वी आणि 10वीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 14 लाख 33 हजार 058 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल चेक करता येणार आहे.

खालील दिलेल्या वेबसाईट्सवर विद्यार्थी त्यांचा निकाल चेक करू शकतील

mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

तुमचा निकाल पाहण्यासाठी इथे नाव आणि नंबर टाका…

बातमी अपडेट होत आहे. 

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी