Maharashtra News LIVE Update | भिवंडीमध्ये टोरेंट पावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

| Updated on: Jul 04, 2021 | 12:36 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 03 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening 

Maharashtra News LIVE Update | भिवंडीमध्ये टोरेंट पावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi July 03 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Jul 2021 11:48 PM (IST)

    तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच, स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची माहिती

    पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरूच

    भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट

    स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची माहिती

    जखमींचा खाजकी रुग्णालयात उपचार सुरू

    अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

    शर्थीचे प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले यश

  • 03 Jul 2021 10:39 PM (IST)

    भिवंडीमध्ये टोरेंट पावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

    भिवंडी : काटई परिसरात अनधिकृत वीज जोडणीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरेंट पावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

    मारहाणीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू.

    शवविच्छेदनानंतर मृत्यू चे कारण स्पष्ट होणार

    निजामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे

    तुकाराम पवार असं  मृत सुरक्षा रक्षकाचे नाव

  • 03 Jul 2021 08:35 PM (IST)

    कल्याणमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म एकवर भंगार विक्रेत्याची हत्या

    कल्याण : प्लॅटफॉर्म एकवर साडेदहाच्या सुमारास भंगार विक्रेत्याची हत्या

    कल्याण स्टेशनवरली धक्कादायक घटना

    सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीचा शोध सुरु

    मयत आणि आरोपी दोघांची ओळख नाही

  • 03 Jul 2021 08:23 PM (IST)

    नाशिकमधील रविवार पेठेतील देवधर गल्लीतील जुन्नरे-जोशी वाडा कोसळला, दोन महिला जखमी

    नाशिक - रविवार पेठेतील देवधर गल्लीतील जुन्नरे-जोशी वाडा  कोसळला

    - वाड्यात वैश्य कुटुंब राहत होते या घटनेत दोन महिला जखमी

    - जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल

    -अग्निशमन दलासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल

  • 03 Jul 2021 07:35 PM (IST)

    अस्वलाच्या हल्ल्यात 4 जण जखमी, पोंभूरणा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरातील घटना

    चंद्रपूर : अस्वलाच्या हल्ल्यात 4 जण जखमी

    पोंभूरणा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरातील घटना

    जखमी झालेले सर्व गुराखी असून गावाशेजारील जंगलात गुरे चारण्यासाठी गेले होते

    दुपारच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या अस्वलाने केला हल्ला

    विलास पेंदोर (54), सीताराम मडावी (57), प्रफुल्ल सिडाम (45) आणि रुपेश कुळमेथे अशी जखमींची नावं

    सर्व जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात केले दाखल

  • 03 Jul 2021 07:06 PM (IST)

    JNPT बदंरात DRI ची मोठी कारवाई, 879 कोटी रुपयांचे 293 KG हेरॉईन जप्त 

    रायगड : JNPT बदंरात DRI ची मोठी कारवाई

    879 कोटी रुपयांचे 293 KG हेरॉईन जप्त

    अफगाणिस्तान येथून इराण मार्गे JNPT  बंदरात आयात करण्यात आले होते हेरॉईन

    जप्त केलेले हेरॉईन पंजाब येथे जाणार होते.

    कागदोपत्री तुर्टी आणि सुगंधी पावडर असल्याचे नमूद करण्यात आले होते

    आयातदार याला अटक करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती

    अफगाणिस्तानहून इराणमार्गे आल्याने संशय बळावला

    त्यामध्ये बंदी असलेला माल असण्याचा संशय आल्याने तपासणी करण्यात आली होती

  • 03 Jul 2021 06:39 PM (IST)

    मुक्या तरुणीचा मोबाईल हिसकावून केला बलात्कार, कल्याणमधील धक्कादायक प्रकार 

    कल्याण : कल्याणमधील धक्कादायक प्रकार

    मुक्या तरुणीचा मोबाईल हिसकावून केला बलात्कार

    कल्याण पश्चिमेतील रेल्वे कॉलिनी येथे घडला प्रकार

    शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता कामावर जात असताना घटना घडल्याची पोलिसांनी माहिती

    कल्याणचे महात्मा फुले पोलीस आरोपींच्या शोधात

  • 03 Jul 2021 05:37 PM (IST)

    पवई परिसरात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अँबरग्रीसची बेकायदेशीर खरेदी व विक्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड

    मुंबई : पवई परिसरात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    व्हेल माशाची उलटी  (अँबरग्रीस) बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड

    याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली, होंडा कारही घेतली ताब्यात

    आरोपींकडून सुमारे 6 कोटींची अंबरग्रीस जप्त केली

    अंबरग्रीस अनेक औषधे, परफ्यूम तयार करण्यासाठी वापरला जातो

  • 03 Jul 2021 04:51 PM (IST)

    ओबीसी आरक्षणासाठी महादेव जानकर मैदानात, उद्या राज्यभरात करणार चक्काजाम आंदोलन  

    मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी महादेव जानकर मैदानात

    उद्या राज्यभरात करणार चक्काजाम आंदोलन

    भाजपनंतर आता ओबीसी आरक्षणासाठी महादेव जानकरांचा एल्गार

    राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात करणार चक्काजाम

    रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची माहिती

    मुंबईत मानखुर्दमध्ये महादेव जानकर करणार चक्काजाम

  • 03 Jul 2021 04:39 PM (IST)

    भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात निदर्शने

    भिवंडी : भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात निदर्शने

    आंदोलनात तृतीयपंथियांचा सहभाग

  • 03 Jul 2021 04:11 PM (IST)

    नागपुरात स्वतावर गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

    नागपूर - नागपुरात स्वतावर गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

    - प्रमोद शंकरराव मेरगुरवार यांची आत्महत्या

    - कोरोनानंतर म्युकरमायकोसिस झाला होता, उपचार सुरु होते

    - सर्व्हीस रिव्हालरने गोळी मारुन केली आत्महत्या

    - 2016 पासून विशेष सुरक्षा विभागात होते कार्यरत

  • 03 Jul 2021 03:48 PM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची मुदत वाढवली 

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची मुदत वाढवली

    4 जूलैपर्यंत विद्यापीठाकडून देण्यात आली शेटवची मुदत

    अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज केले नसल्यानं मुदत वाढवण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात होती

    अखेर विद्यापीठानं ही मुदत वाढवून दिलीये, 10 जूलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असल्याचे सांगितले.

    तर 15 तारखेपर्यंत विलंब शुल्कानं अर्ज करता येईल

    विद्यापीठानं परिपत्रकाद्वारे ही माहिती दिलीये

    यानंतर मुदत वाढवून दिली जाणार नसल्याचं विद्यापीठानं सांगितलंय

  • 03 Jul 2021 03:31 PM (IST)

    लातुरमध्ये हरंगूळ भागात दोन मुलींची गळफास घेऊन आत्महत्या

    लातुर- शहरा जवळच्या हरंगूळ भागात दोन मुलींची गळफास घेऊन आत्महत्या

    मयत मुली आहेत एकमेकांच्या मावस बहिणी

    आत्महत्येचं कारण अस्पष्ट

    पोलिसांचा तपास सुरू,

    धनश्री क्षीरसागर(वय-20) असं आत्महत्या केलेल्या एका मुलीचं नाव

    दुसरी मुलगी अल्पवयीन

  • 03 Jul 2021 01:42 PM (IST)

    अंबरनाथमध्ये इमारतीच्या गच्चीवर असलेल्या मोबाईल टॉवरला आग

    अंबरनाथमध्ये इमारतीच्या गच्चीवर असलेल्या मोबाईल टॉवरला लागली आग

    अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर, गणपती मंदिर परिसरात लागली आग

    आगीमुळे इमारतीच्या गच्चीवर आगीचे लोळ

  • 03 Jul 2021 12:55 PM (IST)

    कल्याण तरुणी मारहाण प्रकरण, पीडित तरुणीची पोलिसांना तक्रार द्यायला नकार

    कल्याण तरुणी मारहाण प्रकरण

    पीडित तरुणीचा पोलिसांना तक्रार द्यायला नकार

    तरुणीसोबत असलेल्या दोघा तरुणांचा फिर्यादीवरून पोलिसांनी दाखल केला गुन्हा

    पीडित तरुणी ही अजूनही पोलीस ठाण्यातच बसून

    शिवसेना महिला आघाडी, भाजपच्या महिला कार्यकर्त्या यांनी तरुणीची भेट घेत तिला धीर देण्याचा केला प्रयत्न

    मात्र तरीही तरुणी मात्र तक्रार न करण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम

  • 03 Jul 2021 12:12 PM (IST)

    इंधन दर गगनाला भिडल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

    जळगाव

    इंधन दर गगनाला भिडल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासून फाडले पोस्टर

    वाढती महागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा केला आरोप

    वाढत्या महागाईने जनता हवालदिल, मात्र केंद्र सरकारकडून लूट होत असल्याचा केला आरोप

  • 03 Jul 2021 11:28 AM (IST)

    हडपसर मार्गे सासवडच्या  दिशेने निघाले जाणाऱ्या वारकऱ्यांना सोलापूर पोलिंसानी अडविले

    सोलापूर -

    हडपसर मार्गे सासवडच्या  दिशेने निघाले जाणाऱ्या वारकऱ्यांना सोलापूर पोलिंसानी अडविले

    हडपसर ते दिवे घाटाच्या परिसरात अडविले

    कोरोनाचे  नियम पाळून पालखी सोहळ्यात होणार होते

    लोणीकाळ भोर पोलिसांनी अडविले

    वेगळ्या 9  वारकरी संघटनांचे होते पालखी सोहळ्यासाठी झाले होते रवाना

  • 03 Jul 2021 11:27 AM (IST)

    नाशकात जेलरोडच्या बालाजी नगर परिसरात गाड्यांची तोडफोड

    नाशिक -

    जेलरोडच्या बालाजी नगर परिसरात गाड्यांची तोडफोड

    दहशत पसरवण्यासाठी टोळक्याकडून गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड

    सिगरेट मागण्याच्या क्षुल्लक कारणावरून केली तोडफोड

    लाकडी दंडुक्यांसह सुरे व कोयत्यांचा सर्रास वापर करत केली दहशत निर्माण

    नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल

  • 03 Jul 2021 11:24 AM (IST)

    भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा कोळसेवाडी पोलिसांवर गंभीर आरोप

    भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा कोळसेवाडी पोलिसांवर गंभीर आरोप

    क्रॉस कंपलेंट करून देतात फिर्यादीला त्रास

    जो गुन्हा दाखल करण्यासाठी जातो त्यालाच गुन्हेगार ठरवून त्याला पोलीस स्टेशनमध्ये बसवतात

    जे आरोपी आहेत त्यांच्याकडून सेटिंग करतात

    त्यामुळे कोळसेवाडी हा गुन्हेगारांचा अड्डडा बनला आहे

    आमदार गणपत गायकवाड यांचा गंभीर आरोप

  • 03 Jul 2021 11:23 AM (IST)

    सिने अभिनेता अजिक्यं देव याने घेतली आमदार महेद्रं थोरवे यांची सदिच्छा भेट

    कर्जत

    सिने अभिनेता अजिक्यं देव याने घेतली आमदार महेद्रं थोरवे यांची सदिच्छा भेट.

    कर्जत तालुक्यातील विविध सामाजिक कार्याकरीता आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी अजिक्यंदेव याने घेतली भेट.

    अजिंक्य देव यांचे स्वागत करुन सामाजिक कार्याविषयी चर्चा यावेळी करण्यात आली

  • 03 Jul 2021 11:22 AM (IST)

    बंडा तात्या काराडकरांच्या समर्थकांचं आंदोलन स्थगित

    पिंपरी चिंचवड

    -बंडा तात्या काराडकरांच्या समर्थकांचं आंदोलन स्थगित

    -बंडा तात्यांनी तसा निरोप दिल्याचं वारकऱ्यांनी जाहीर केलं

    -सध्या तात्यांना सातारा जिल्हा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आ

  • 03 Jul 2021 10:04 AM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग

    चंद्रपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग, नागपूर येथून मूलकडे येत असताना काल सकाळची घटना, नागभीड तालुक्यातील मोहाडी येथे गाडीने घेतला अचानक पेट, बोनेट मधून धूर दिसताच गाडीतील सुरक्षा रक्षक उतरले खाली, सुदैवाने कोणालाही इजा नाही

  • 03 Jul 2021 09:40 AM (IST)

    सोलापुरात पदवी-पदव्युत्तरच्या परीक्षा 5 जुलै ते 21 आगस्ट या कालावधीत ऑनलाईन घेतल्या जाणार

    सोलापूर -

    पदवी-पदव्युत्तरच्या परीक्षा 5 जुलै ते 21 आगस्ट या कालावधीत ऑनलाईन घेतल्या जाणार

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा निर्णय

    विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व परीक्षा विषयक अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून विविध हेल्पलाईन नंबर जारी

    कोरोना आणि टाळेबंदी मुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार

    विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध

  • 03 Jul 2021 09:38 AM (IST)

    गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी केसीसी पोर्टलद्वारे सुविधा

    गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी केसीसी पोर्टल द्वारे सुविधा

    जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या आदेशाने केसीसी पोर्टचे सुविधा

    गेल्या वर्षी पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे वारंवार फिरुन सुद्धा पीक कर्ज मंजूर झाले नाही हे सर्व लक्षात घेता

    2020-2021 या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज ताबडतोब मिळावा यासाठी केसीसी पोर्टल वर शेतकऱ्यांनी आपले अर्ज अपलोड करू शकतात

    गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यात आहे तहसील कार्यालयातून करण्यात येणार शेतकऱ्यांना अर्ज

    खरीप हंगाम साठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे

  • 03 Jul 2021 08:15 AM (IST)

    कल्याण कोळसेवाडी विभागात दोन तरुण आणि एक तरुणीला जमावाची बेदम मारहाण

    कल्याण कोळसेवाडी विभागात दोन तरुण आणि एक तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मध्य रात्री घडली आहे

    राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत

    ते उल्हास नगर विभागात रहातात

    मध्यरात्री त्यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करीत असताना रिक्षा चालकाने या तरुणीशी छेडछाड करु लागला

    यावेळी तिने फोन वरुन याची माहिती तिच्या मित्रांना दिली

    यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले

    मात्र या ठिकाणी रिक्षा चालक आणि गावातील लोकांनी या तरुणांना जोरदार मारहाण केली

    अगदी पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली

    एवढेच काय तर या तरुणीला देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे

    मात्र या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अजून ही कोणता गुन्हा दाखल केला नाहीये

    हे तरुण अजून ही पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

  • 03 Jul 2021 08:12 AM (IST)

    नाशकातील कोव्हिड योद्धे असलेल्या होमगार्ड्सचे मानधन थकले

    नाशिक -

    कोव्हिड योद्धे असलेल्या होमगार्ड्सचे मानधन थकले

    जवळपास 400 होमगार्डस चे मानधन थकल्याचा धक्कादायक प्रकार समोर

    सुमारे 52 दिवसांचे मानधन थकले

    पोलिसांसोबतच होमगार्ड देखील कोव्हिडं काळात रस्त्यावर उभे

    जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या होमगार्ड वर उपासमारीची वेळ

  • 03 Jul 2021 08:11 AM (IST)

    छत्रपती संभाजी राजे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर

    औरंगाबाद -

    छत्रपती संभाजी राजे आज मराठवाडा दौऱ्यावर

    युवराज छत्रपती संभाजी राजे यांचा मराठा समाज जनसंपर्क दौरा

    संभाजी राजे घेणार युवक विद्यार्थी संवाद परिषद..

    मराठा आरक्षणावर चर्चा सह घेणार बैठकी..

    बीड, जालना,औरंगाबाद असे तीन जिल्ह्यात छत्रपती संभाजी राजे देणार भेट

    औरंगाबादेत संभाजी राजे यांच्या संवाद मेळाव्याची जय्यत तयारी

  • 03 Jul 2021 08:10 AM (IST)

    नाशकात महापालिकेतील भरती प्रकरणी आज मुंबईत बैठक

    नाशिक -

    महापालिकेतील भरती प्रकरणी आज मुंबईत बैठक

    महापालिकेतील सडे तीन हजार रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम

    पुढील आठवड्यात बैठक घेण्यासाठी अजित दादांचा पुढाकार

    महापालिकेच्या भरती पुरते वित्त विभागाचे निर्बंध शिथिल व्हावेत अशी मागणी

    नाशिक राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांची अजित पवारांकडे मागणी

  • 03 Jul 2021 08:09 AM (IST)

    नाशिक महापालिकेच्या 100 कोटींचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात

    नाशिक - महापालिकेच्या 100 कोटींचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात

    केंद्र सरकार आणि नगरविकास विभाग यांच्याशी सल्लामसलत करणार

    त्यानंतरच ही रक्कम देता येणार की नाही हे ठरणार

    सीताराम कुंटे यांची स्मार्ट सिटी बैठकीत माहिती

  • 03 Jul 2021 08:08 AM (IST)

    "संभाजीराजे यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजप मधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेड मध्ये सहभागी व्हावं"

    औरंगाबाद -

    संभाजीराजे यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजप मधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेड मध्ये सहभागी व्हावं

    आम्ही संभाजी राजे यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत

    असं प्रतिउत्तर संभाजी ब्रिगेडनवं छत्रपती संभाजी राजे यांना दिलं आहे

    संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानूसे यांनी हे प्रतिउत्तर दिलं आहे

    काल बीड इथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला असता मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा असं संभाजीराजे म्हणाले होते

    त्याला संभाजी ब्रिगेडने प्रतिउत्तर दिलं आहे

  • 03 Jul 2021 08:06 AM (IST)

    आळंदी धरण परिसरात बिबट्याचा वावर, परिसरात भीतीचे वातावरण

    नाशिक - आळंदी धरण परिसरात बिबट्याचा वावर

    परिसरात भीतीच वातावरण

    वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्याची मागणी

    काही दिवसांपूर्वी बिबट्याने केला होता चिमुरडीवर हल्ला

    पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीनकडे येत असल्याने नागरिक भयभीत

  • 03 Jul 2021 08:05 AM (IST)

    नाशकात लग्नात व्यस्त असलेल्या कुटुंबाचे घर चोरट्याने केले साफ, पाच लाखांची रोकड आणि 37 तोळे सोने लंपास

    नाशिक - लग्नात व्यस्त असलेल्या कुटुंबाचे घर चोरट्याने केले साफ

    पाच लाखांची रोकड आणि 37 तोळे सोन्याची चोरी

    नाशिक रोड परिसरातील घटनेने शहरात खळबळ

    फ्लॅट चा मागील दरवाजा तोडून घरात केला शिरकाव

    वजन जास्त असल्याने तिजोरी मात्र नेता आली नाही

  • 03 Jul 2021 07:52 AM (IST)

    काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी संबंध नाही, नितीन राऊत यांचा खुलासा

    - काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी संबंध नाही

    - ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा खुलासा

    - ‘खनीजकर्म महामंडळाकडून महाजनकोला कोळसा पुरवणाऱ्या कंत्राटावर आक्षेप घेतला’

    - नाना पटोले यांच्या पत्रानंतर खनीजकर्म महामंडळाच्या कंत्राटाची चौकशी सुरु

    - विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश

    - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले चौकशीचे आदेश

  • 03 Jul 2021 07:48 AM (IST)

    आमदार संजय गायकवाडसह 80 ते 90 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

    बुलडाणा

    आमदार संजय गायकवाडसह 80 ते 90 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

    कोव्हिडं नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

    दोन गटातील चर्चित ठरलेल्या चोतोडा येथे गर्दी जमविल्या प्रकरणी गुन्हे दाखल तर दलित पँथर सेनेच्या दीपक केदार सह 20 लोकांवर गुन्हे दाखल

    खामगाव तालुकयातील चितोडा येथील वाघ आणि हिवराळे कुटुंबाचा वाद जिल्हाभर गाजत आहे, त्याठिकाणी हे दोघेही विचारपूस करण्यासाठी गेले होते

  • 03 Jul 2021 07:33 AM (IST)

    बंडा तात्या यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले

    पिंपरी चिंचवड

    -बंडा तात्या ना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे

    -त्यांना पिंपरी चिंचवड मधील दिघी जवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहेत

    -बंडा तात्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याचे जे समर्थक आहेत ते संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली

    -ह्या मंगल कार्यालया बाहेर त्याच्या समर्थकांचे भजन सुरू

  • 03 Jul 2021 07:32 AM (IST)

    कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर विरोधात तक्रार

    - कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर विरोधात तक्रार

    - आचारसंहितेचा भंग केल्याची निवडणूक अधिकाऱ्याकडे केली तक्रार

    - आचारसंहिता सुरु असताना केलं समाज भवनाचं उद्घाटन

    - नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे निखील फलके यांनी केली तक्रार

    - आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • 03 Jul 2021 07:05 AM (IST)

    बंडा तात्या कराडकर यांचे समर्थक जमायला सुरुवात

    पुणे

    - बंडा तात्या कराडकर यांचे समर्थक जमायला सुरुवात

    - ज्या ठिकाणी बंडा तात्या कराडकर याना ठेवण्यात आले आहे त्याठिकाणी त्याचे समर्थक जमायला सुरुवात

  • 03 Jul 2021 06:49 AM (IST)

    बंडा तात्या कराडकर पायी वारीला अजून ठाम आहे

    पुणे -

    बंडा तात्या कराडकर -

    - पायी वारीला अजून ठाम आहे

    - पोलीसानी जर नाटक केले तर आम्ही समूह घेऊन चालू एक-एकट चालणार नाही

    - काल आम्ही काही मान्य नाही केले पोलीस प्रत्येक पावलाला खोट बोलतात

    - कोरोना असेल तर आमच्या जबाबदारी वर आम्ही जाऊ

  • 03 Jul 2021 06:46 AM (IST)

    अखेर बंडा तात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

    पुणे

    - अखेर बंडा तात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

    - पहाटे त्याचे समर्थक वारकरी आळंदीच्या वेशीवर आले तेव्हा ते त्याना सोडवण्यासाठी गेले असता पोलिसानी घेतले ताब्यात

Published On - Jul 03,2021 6:23 AM

Follow us
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.