Maharashtra News LIVE Update | मुंब्र्यात 5 मजली धोकादायक इमारत खाली केली, 36 कुटुंबांची एका शाळेत राहण्याची सोय

| Updated on: Jun 12, 2021 | 11:44 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मुंब्र्यात 5 मजली धोकादायक इमारत खाली केली, 36 कुटुंबांची एका शाळेत राहण्याची सोय
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी| Maharashtra News LIVE Update

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Jun 2021 10:59 PM (IST)

    इचलकरंजी : गावभाग पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

    इचलकरंजी :

    गावभाग पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

    गुन्ह्यातील मुद्देमाल परत देण्यासाठी केली होती पाच हजारांची मागणी

    शेखर शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यांला घेतले ताब्यात

    सांगली जिल्ह्यातील पथकाने दूरध्वनीवरील संभाषणाच्या आधारे केली कारवाई

  • 12 Jun 2021 10:22 PM (IST)

    मुंब्र्यात 5 मजली इमारत खाली केली, 36 कुटुंबांची एका शाळेत राहण्याची सोय

    मुंब्र्यात पाच मजल्यांची इमारत आज खाली करण्यात आली.

    श्री साई अपार्टमेंट असलेली इमारत पालिकेच्या वतीने खाली करण्यात आलेली आहे.

    इमारतीच्या कोलममध्ये गेले तडे

    या इमारतीला तडे गेले असल्याने इमारत धोकादायक म्हणून सर्व परिवारांना बाहेर काढण्यात पालिकेला यश आले

    याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाई केली.

    सध्या या 36 कुटुंबांना एका शाळेत राहण्याची सोय करण्यात आली आहे.

    ही इमारत आधी पासून महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत होती

  • 12 Jun 2021 08:18 PM (IST)

    आता 36 जिल्ह्यात मूक आंदोलन करणार, काकासाहेब शिंदे यांच्या स्मारक स्थळावरुन संभाजीराजेंचा एल्गार

    संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे.

    ज्यांनी बलिदान दिलं त्यांना नोकरीवर घेण्याचं आश्वासन दिलं. पण अजूनही नोकरीवर घेतलेलं नाही. माझी सरकारला विनंती आहे, त्यांना लवकर नोकरीवर घ्यावं. काहितरी कुठलीतरी नोकरी द्यायची, असं करू नका चांगल्या खात्यात नोकरी द्या.

    जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत ही विनंती

    आता समाजाला रस्त्यावर उतरवायचं, आता जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घ्यावी

    रिव्ह्यू पिटीशन दाखल करावं, मग क्युरिटी पिटीशन दाखल करावं, नंतर अयोग स्थापन होईल. त्यानंतर आरक्षण प्रश्न सुटण्याची शक्यता आहे

    ओबीसींच्या सवलती गरीब मराठा समाजाला मिळाल्या पाहिजेत.

    आता मूक आंदोलन करणार, 36 जिल्ह्यात आंदोलन होणार, नंतर लॉंग मार्च काढू

  • 12 Jun 2021 07:24 PM (IST)

    सातारा : केंजळ गडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी

    सातारा : केंजळ गडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी

    मयंक उरणे असे जखमी बालकाचे नाव

    पाखेरी वस्तीतील ग्रामस्थांच्या मदतीने मयंक उरणे या बालकास दरीतून शोधून काढण्यास यश

    वाई येथे प्राथमिक उपचारानंतर जखमी मयंकला पुण्याला हलविले

    पुणे जिल्हयातील सासवड येथील 8 जण वाई येथील केंजळगडावर आले होते ट्रेकिंगला

    वाई तालुक्यातील केंजळगड येथील घटना

  • 12 Jun 2021 07:22 PM (IST)

    मुलगी जन्माला आली म्हणून पतीला आणि पत्नीला मारहाण करून घराच्या बाहेर हाकलले, धुळ्यातील संतापजनक घटना

    धुळे :

    मुलगी जन्माला आली म्हणून पतीला आणि पत्नीला मारहाण करून घराच्या बाहेर हाकलले, सासू-सासरे, जेठ-जेठाणी यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

    महिलेला पोटावर मारहाण केल्याने जळगाव येथे महिला उपचारार्थ हलविले, धुळे तालुका येथील तरवाडे गावातील घटना

  • 12 Jun 2021 07:21 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर गावात राहत्या घरात रानटी डुक्कर शिरले

    चंद्रपूर : जिल्ह्यातील विसापूर गावात राहत्या घरात शिरले रानटी डुक्कर, ग्रामस्थाच्या घरात शिरलेल्या रान डुकराला पकडण्यासाठी वनविभागाने केले शर्थीचे प्रयत्न, अत्यंत चपळ आणि घातक असलेल्या रान डुकराला पकडण्यासाठी विसापूर ग्रामस्थांनी केली मदत, मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्याच्या सहाय्याने वन पथकाने केले रान डुकराला जेरबंद, सुमारे तीन तास चाललेल्या या मोहिमेनंतर रान डुकराला नजीकच्या जंगलात करण्यात आले निसर्गमुक्त, थेट गावातच रान डुक्कर शिरल्याने गावात पसरली होती दहशत

  • 12 Jun 2021 06:57 PM (IST)

    बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

    बीड: बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    वडवणी येथील नदीचे बांध फुटले

    अर्धा तासापासून जोरदार पाऊस

    अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित

  • 12 Jun 2021 06:15 PM (IST)

    औरंगाबाद : संभाजीराजे काही वेळात पोहोचणार काकासाहेब शिंदे स्मारकावर

    औरंगाबाद :-

    संभाजीराजे काही वेळात पोचणार काकासाहेब शिंदे स्मारकावर

    औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका इथे आहे काकासाहेब शिंदे यांचं स्मारक

    काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला संभाजीराजे करणार अभिवादन

    थोड्याच वेळात संभाजीराजे पोचणार काकासाहेब शिंदे स्मारकवर

    काकासाहेब शिंदे यांचा भाऊ अविनाश शिंदे यांचीही घेणार भेट

  • 12 Jun 2021 06:10 PM (IST)

    कल्याण रेल्वे यार्डात मालगाडीच्या परीक्षनासाठी 10 महिलांचे पथक नियुक्त

    कल्याण : रेल्वेच्या विविध विभागात महिला कार्यरत आहेत. मात्र रेल्वेने आता मालगाड्यांच्या देखभाल दुरुस्ती आणि परिक्षनाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर टाकलीय. मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे यार्डात तपासणी करण्यासाठी दहा जणांच्या महिलांच्या पथकाची निर्मिती रेल्वेकडून करण्यात आली आहे . 8 जून पासून कल्याण रेल्वे यार्डात हे पथक कार्यरत असून या यार्डात येणाऱ्या मालगाडीचे परीक्षण देखभाल दुरुस्ती या पथकाकडून केली जातेय . याआधी मालगड्याच्या देखभाल दुरुस्ती व परीक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने पुरुषाच्या खांद्यावर होती परीक्षण करण्यासाठी असलेल्या दहा जणांच्या पथकात दोन ते तीन महिलांचा समावेश असायचा मात्र पहिल्यांदाच या परीक्षनाची संपूर्ण जबाबदारी या दहा महिलांकडे देण्यात आली आहे .रेल्वेने दिलेल्या संधीबद्दल या पथकातील महिलांनादेखील रेल्वेचे आभार मानलेत .

  • 12 Jun 2021 05:01 PM (IST)

    हतनूर धरणात 23 हजार 523 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

    धुळे :

    जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणात 23 हजार 523 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पुढील 72 तासात तापी नदीपात्रात देखील मोठा विसर्ग सोडण्यात येण्याची पूरनियंत्रण कक्षाने दिली माहिती

    तापी नदीतून सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्प मध्ये करण्यात येणार पाण्याचा विसर्ग

    तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

  • 12 Jun 2021 04:34 PM (IST)

    पोलिसांवरील हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि शंभर नंबरी गुन्हेगार हैदरला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

    देशात शंभरहून अधिक स्नैचिंगच्या गुन्ह्यात आरोपी, इतकेच नाही तर पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हैदर तहजीब इराणी याला पकडण्यात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना यश आले आहे. असे तर या वर्षात खडकपाडा पोलिसांनी 25 इराणी आरोपींना पकडून अन्य पोलिसांच्या हवाली केले आहे. मात्र हैदर पकडला गेल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.

  • 12 Jun 2021 04:03 PM (IST)

    कुणीही कितीही रणनीती बनवली तरीही 2014 ला पंतप्रधान मोदीच निवडून येतील : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस -

    ( प्रशांत किशोर--पवार भेट)

    - कुणीही कितीही रणनीती बनवली तर आजही मोदी आहे आणि 2024 ला मोदी येतील. विरोधी पक्षातील लोक स्ट्रॅटेजी तयार करत असतात.

    - सकाळी उठल्यानंतर पहिलं वाक्य ते बोलतात केंद्र सरकार जबाबदार, हे हास्यास्पद आहे

    - नक्षल पत्राची गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे, नक्षल विचार लोकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचे आहे.

    - मराठा आंदोलनात भाजपचे नेते सहभागी होणार. गेल्यावेळेस आम्ही सत्तेत असतानाही आमचे आमदार त्यावेळ आंदोलनात सहभागी झाले होते

    - कमी उस्थितीची पायी वारी शक्य होती. सरकारने थोडा विचार करायला हवा होता.

  • 12 Jun 2021 03:57 PM (IST)

    स्मार्ट सिटी अंतर्गत खोदलेल्या खड्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन

    सोलापूर :

    स्मार्ट सिटी अंतर्गत खोदलेल्या खड्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन

    खड्यात  उतरून खड्याची पूजा करून केले  आंदोलन

    गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे स्मार्ट सिटीचे  संथ गतीने काम

    दोन दिवसापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या कामासाठी खड्ड्यामुळे लहान मुलाचा झाला होता अपघात

  • 12 Jun 2021 03:09 PM (IST)

    काँग्रेसशिवाय विरोधी पक्षाची आघाडी पूर्ण होऊ शकत नाही : संजय राऊत

    जळगाव : "काँग्रेसच्या आघाडीमध्ये किती पक्ष उरले आहेत, तेही एकदा पाहावे लागणार आहे. या देशातील जे प्रादेशिक पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक मजबूत आघाडी उभे करणे गरजेचे आहे. पण विरोधी पक्षांची आघाडी ही काँग्रेस शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कारण काँग्रेस जरी कमजोर झाली असली तरी तो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आसाम अशा राज्यांमध्ये अजूनही त्यांचे चांगले बळ आहे. यासंदर्भात देशातील प्रमुख नेते चाचपणी करत असतील तर नक्कीच त्यातून भविष्यात दृश्य फळ बघायला मिळेल", असं संजय राऊत म्हणाले.

  • 12 Jun 2021 03:05 PM (IST)

    औरंगाबादच्या कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला संभाजीराजे भेट देणार, परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    औरंगाबाद :

    कायगाव टोका परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला संभाजीराजे देणार भेट

    भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लावला कडेकोट बंदोबस्त

    मराठा आरक्षणासाठी पहिला बळी देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला संभाजीराजे देणार भेट

  • 12 Jun 2021 02:23 PM (IST)

    अहमदनगर छत्रपती संभाजी राजे थोड्याच वेळात कोपर्डीत दाखल होणार कोपर्डीतील पीडित कुटूंबाची भेट घेणार तर संभाजी राजेंच्या भूमिकेकडे लक्ष

    अहमदनगर

    छत्रपती संभाजी राजे थोड्याच वेळात कोपर्डीत दाखल होणार

    कोपर्डीतील पीडित कुटूंबाची भेट घेणार

    तर संभाजी राजेंच्या भूमिकेकडे लक्ष

  • 12 Jun 2021 12:20 PM (IST)

    कोपर्डी बलात्कार आणि हत्येला 5 वर्ष पूर्ण, न्याय मिळण्यासाठी कुटुंब संभाजी राजेंशी चर्चा करणार

    अहमदनगर -

    कोपर्डी अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येला 5 वर्ष पूर्ण झाली

    मात्र अद्यापही आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही

    न्याय मिळण्यासाठी आज संभाजी राजेंशी चर्चा करणार

    तर मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, पीडित कुटूंबाची मागणी

    संभाजीराजे आज कोपर्डीत येणार

    यावेळी ते कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेणार

  • 12 Jun 2021 12:19 PM (IST)

    सागंलीतील कसबे डिग्रज बागणी रोड याठिकाणी बिबट्या आल्याची चर्चा

    सांगली -

    कसबे डिग्रज बागणी रोड याठिकाणी बिबट्या आल्याची चर्चा

    रात्री आणि सकाळच्या सुमारास गावातील लोकांनी शेता लगत बिबट्या आणि एक लहान पिलू पाहिल्याची चर्चा

    शेता मध्ये ठसे आढळल्याने भीतीचे वातावरण वन विभागाकडून शोध सुरू

    सांगली परिसरात पुन्हा बिबट्या आल्याने नागरिकांत भीती चे वातावरण.

  • 12 Jun 2021 12:18 PM (IST)

    साईबाबा संस्थन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिल्याने महाविकास आघाडी सरकारला अखेरीस जाग

    साईबाबा संस्थन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिल्याने महाविकास आघाडी सरकारला अखेरीस जाग

    विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी सरकारच्या हालचाली

    22 जूनपर्यंत विश्वस्त मंडळ सरकारला नेमावे लागणार

    या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच

    अध्यक्षपदी दोन्ही पक्षाकडून दावा

    नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे

  • 12 Jun 2021 09:59 AM (IST)

    16 तारखेच्या आंदोलनासाठी मराठा क्रांती मोर्चाची चलो कोल्हापूर ची हाक

    पुणे -

    16 तारखेच्या आंदोलनासाठी मराठा क्रांती मोर्चाची चलो कोल्हापूर ची हाक,

    संघर्ष अटळ आहे! अशा आशयानं सोशल मिडीयात आंदोलनाची तयारी,

    मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन,

    कोल्हापूरच्या आंदोलनाची तयारी सुरू,

    सोशल मिडीयाच्या माध्यमातून केलं आवाहन

  • 12 Jun 2021 09:07 AM (IST)

    लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला नागरीकांची गर्दी

    बारामती :

    - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला नागरीकांची गर्दी

    - नागरीकांच्या विद्या प्रतिष्ठान परिसरात रांगा

    - प्रत्येक नागरीकाजवळ जाऊन अजित पवार घेतायत भेट

    - नागरीकांच्या समस्यांचं जागेवरच निराकरण

  • 12 Jun 2021 09:05 AM (IST)

    नागपूर विद्यापीठाचा ९ हजार ४२९ विद्यार्थ्यांना दणका

    -  नागपूर विद्यापीठाचा ९ हजार ४२९ विद्यार्थ्यांना दणका
    - विद्यापीठाने परिक्षा पुन्हा घेण्याची विनंती फेटाळली
    - हिवाळी परिक्षेत ९ हजार ४२९ विद्यार्थी होणार फेल
    - समाधानकारक कारणं न दिलेल्याने पुर्नपरिक्षा नाही
  • 12 Jun 2021 08:51 AM (IST)

    इस्लामपूरसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक

    सांगली -

    इस्लामपूरसह जिल्ह्यात अन्य ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक

    स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

    3 लाखाचा मुद्देमाल केला जप्त

    चोरट्या कडून आणखी गुन्हे उगडकीस होण्याची शक्यता

  • 12 Jun 2021 08:49 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये फटफटी गँगचा धुमाकूळ

    औरंगाबाद -

    औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मध्ये फटफटी गँग चा धुमाकूळ

    गोदावरी नदी पात्रातील बाईकद्वारे वाळू उपसा सुरू

    श्री संत एकनाथ महाराजांच्या मंदिराच्या मागे वाळू उपसा सुरू

    नाथ मंदिराच्या मोक्षघाटास नुकसान पोहचण्याची शक्यता

    सर्रासपणे सुरू असलेल्या वाळू उपशावर प्रशासन गप्प

  • 12 Jun 2021 08:48 AM (IST)

    पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात 17 कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमबाह्य

    सोलापूर - पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात 17 कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमबाह्य

    2017 -18 कालावधीत झालेली पदोन्नती प्रक्रिया पूर्णपणे नियमबाह्य असल्याचा घेण्यात आला आहे आक्षेप

    तत्कालिन कुलसचिव डॉक्टर गणेश मंझा यांनी केलेल्या पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा ठपका

    पदोन्नती प्रक्रिया राबवताना राखीव संवर्गासाठी 33 टक्के जागा रिक्त ठेवून उर्वरित जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात याव्यात असा शासन निर्णय

    मात्र  तत्कालिन प्रशासनाने राखीव जागेनुसार विद्यापीठातील 17 शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी दिली पदोन्नती

  • 12 Jun 2021 08:48 AM (IST)

    सोलापुरात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार, शहर गुन्हे शाखेचा छापा

    सोलापूर- ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार

    शहर गुन्हे शाखेचा छापा

    9  नृत्यांगना  आणि 29 शौकीन  गुन्हे शाखेच्या ताब्यात

    48 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    शिवाजीनगर येथील हॉटेल पॅराडाईज मधील प्रकार

    डान्सबारवर बंदी असल्यामुळे आर्केस्ट्राच्या नावावर सुरू होता डान्स बार

    रात्री  साडे अकराच्या सुमारास सुरू होता डान्सबार

    याची माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना मिळाल्यानंतर

    शहर गुन्हे च्या शाखेने टाकला शाखा

  • 12 Jun 2021 08:47 AM (IST)

    खासदार संभाजी राजे आज कोपर्डीत

    अहमदनगर

    खासदार संभाजी राजे आज कोपर्डीत

    पिडीत कुटुंबीयांची भेट घेऊन मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार.

    दुपारी २ च्या दरम्यान संभाजी राजे कोपर्डीत दाखल होणार,

    संभाजी राजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष.

  • 12 Jun 2021 08:04 AM (IST)

    पीएमपी प्रवासासाठी तीन एप्रिलपूर्वी काढलेल्या प्रवासी पासची मुदत वाढवून देण्यात येणार

    पुणे

    पीएमपी प्रवासासाठी तीन एप्रिलपूर्वी काढलेल्या प्रवासी पासची मुदत वाढवून देण्यात येणार

    पीएमपी प्रशासनाने केली पासची मुदतवाढ जाहीर

    मात्र, त्यासाठी प्रवाशांना पास केंद्रांवरून त्यांची मुदत वाढवून घ्यावी लागणार

    लॉकडाऊन जाहीर होणेपुर्वी अनेक नोकरदार, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसह नियमित प्रवाशांनी पास केंद्रावरून पीएमपीचे बस पासेस काढले

    परंतु, 3 एप्रिल रोजी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने अशा पासधारकांना बस पासचा वापर करता आलेला नाही.

  • 12 Jun 2021 08:01 AM (IST)

    नागपूर-छिंदवाडा महामार्गावर  कारचा भीषण अपघात

    नागपूर :

    नागपूर-छिंदवाडा महामार्गावर  कारचा भीषण अपघात,

    दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरचा ताबा सुटल्याने अपघात,

    कार छोट्या पुलाच्या भिंतीवर आदळल्यानं कारचे अक्षरशः दोन तुकडे,

    कार मधील तीन महिलांचा मृत्यु, वाहन चालक आणि एक महिला गंभीर जखमी,

    मध्य प्रदेशातील रामकोना येथे लग्नासाठी जात असताना घडला अपघात

  • 12 Jun 2021 07:46 AM (IST)

    अहमदनगरला मानाच्या संत निळोबाराय पालखीचे प्रमुख अशोक सावंत यांनी वारीला पायी जाण्याची केली मागणी

    अहमदनगर

    अहमदनगरला मानाच्या संत निळोबाराय पालखीचे प्रमुख अशोक सावंत यांनी वारीला पायी जाण्याची केली मागणी

    आषाढी वारी ही महाराष्ट्रातील संतांच्या दृष्टीने दिवाळीचा सण असतो तर वारकऱ्यांच्या दृष्टिने आनंदाची वारी

    मात्र दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पायी जाण्याची वारी थांबली

    तर यावर्षी आम्ही शासनाला विनंती केलीये कोरोनाच भय लोकांच्या मनातून गेला आहेय. त्यामुळे 50 ते 100 लोकांमध्ये पालखीसोबत पायी जाण्याची परवानगी द्यावी

    काही लोक या वारीचं राजकारण करताय. मात्र आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नसून वारकऱ्यांना वाटतंय संतांच्या पालखी बरोबर पायी चालावं.

    त्यामुळे सरकारच्या मनात आलं तर अजुनही निर्णय बदलु शकतो

    पायी चालण्याची परवानगी दिल्यास स्वागत करू

    परवानगी न दिल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे वारी करू.

  • 12 Jun 2021 07:21 AM (IST)

    नाशिक शहरातील तब्बल 29 धोकादायक वृक्ष काढण्यात येणार

    नाशिक - अपघातास कारणीभूत ठरणारे वृक्ष काढण्यास प्राधिकरणाची मंजुरी

    शहरातील तब्बल 29 धोकादायक वृक्ष काढण्यात येणार

    एकट्या गंगापूर रोड वरील 9 झाड काढण्यास परवानगी

    धोकादायक झाडांमुळे अनेकांना गमवावे लागले प्राण

    वृक्ष प्रेमींची मात्र निर्णयाबाबत नाराजी

  • 12 Jun 2021 07:20 AM (IST)

    सिडको सातपुरमध्ये आज पाणी नाही

    नाशिक - सिडको सातपुर मध्ये आज पाणी नाही

    तांत्रिक कामांमुळे मुकणे धरणाचा विद्युत पुरवठा आज होणार खंडित

    रविवारी देखील कमी दाबाने पाणी येणार

    नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून ठेवण्याची सूचना

  • 12 Jun 2021 07:19 AM (IST)

    आता 1 जुलै रोजी सुरू होणार नाशिक पालिकेची बस सेवा

    नाशिक - पालिकेच्या बस सेवेला सापडला नवीन मुहूर्त

    आता 1 जुलै रोजी सुरू होणार पालिकेची बस सेवा

    संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दुर्लक्षित करून बस सेवेला मंजुरी

    27 ते 30 जून दरम्यान शहरात ट्रायल रन सुरू करण्याचे आयुक्त कैलास जाधव यांचे आदेश

    10 वर्षांसाठी असणार बस सेवा

    वार्षिक 35-40 कोटींचा तुटवडा असल्याने झाला होता बस सेवेला विरोध

  • 12 Jun 2021 06:59 AM (IST)

    कोरोनामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांना मालमत्ता कर, वीजबिल, अबकारी कर यामध्ये सवलत देण्याची मागणी

    पुणे :

    कोरोनामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांना मालमत्ता कर, वीजबिल, अबकारी कर यामध्ये सवलत देण्याची मागणी

    पूना रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशन (प्रहा), पूना हॉटेलिंग असोसिएशन (पीएचए), युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन (यूएचए) अशा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सवलतींची मागणी

  • 12 Jun 2021 06:56 AM (IST)

    उरवडे आग दुर्घटमध्ये मृत झालेल्या 17 नागरिकानांवर पाच दिवसांनी अंत्यसंस्कार

    पुणे

    मुळशी तालुक्यात पिरंगुट उरवडे येथील एसव्हीएस कंपनी मध्ये झालेल्या आग दुर्घटमध्ये मृत झालेल्या 17 नागरिकानांवर पाच दिवसांनी अंत्यसंस्कार

    डीएनए अहवालानंतर मृतदेह नातेवाइकांना ससून हॉस्पिटलमधून ताब्यात दिल्यानंतर करण्यात आले अंत्यसंस्कार

    या सर्व प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

  • 12 Jun 2021 06:46 AM (IST)

    युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये युवा सेनेच्या वतीने 50 रुपये लिटर दराने पेट्रोल दिले जाणार

    युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये युवा सेनेच्या वतीने 50 रुपये लिटर पेट्रोल दिले जाणार

    रविवारी 13 जून रोजी अंबरनाथच्या विम्को नाका पेट्रोल पंपावर शिवसेनेकडून होणार अर्ध्या किमतीत पेट्रोल वाटप

  • 12 Jun 2021 06:45 AM (IST)

    पुण्यात आता नागरिकांना मिळणार घरबसल्या ''लर्निंग लायसन

    पुणे :

    पुण्यात आता नागरिकांना मिळणार घरबसल्या ''लर्निंग लायसन

    त्यासाठी नागरिकांना घरी बसूनच ऑनलाईन परीक्षा देता येणार

    परीक्षेचा निकाल तत्काळ कळणार असून लायसनही संबंधित नागरिकाला काही क्षणांतच मिळणार

    येत्या 8-10 दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार

    मात्र, त्यासाठी आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे

    या प्रकियेसाठीची संगणक प्रणाली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात

    पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची माहिती

Published On - Jun 12,2021 6:23 AM

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.