Maharashtra News LIVE Updates : यवतमाळमध्ये हनीट्रॅप प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

| Updated on: Oct 21, 2021 | 10:10 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Updates : यवतमाळमध्ये हनीट्रॅप प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Oct 2021 09:08 PM (IST)

    यवतमाळमध्ये हनीट्रॅप प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

    हनीट्रॅप प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केलीय

    संदेश मानकर याने आपल्या राहत्या घरी गॅस सिलेंडर सुरू करून स्वतःला खोलीत बंद करत केली आत्महत्या

    महिन्याभरापूर्वी दिल्लीच्या डॉक्टरला मुलगी बनून 2 कोटींचा घातला होता गंडा

    पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावत संदेशला केली होती अटक, जामिनावार बाहेर येताच त्याने राहत्या घरी केली आत्महत्या

  • 21 Oct 2021 08:03 PM (IST)

    नवाब मलिकांचे माझ्यावरील आरोप खोटे : समीर वानखेडे

    समीर वानखेडे नेमकं काय म्हणाले?

    ते दुबईत गेल्याचं बोलत आहे. मी या गोष्टीची घोर निंधा करतो. ही चुकीची माहिती आहे. जी तारीख ते सांगत आहेत, डिसेंबर महिन्यात मी त्यावेळी मुंबईत होतो. ते या गोष्टीचा तपास किंवा शाहनिशा करु शकतात. हा चुकीचा आरोप आहे.

    खंडणी हा खूप घाणेरडा आणि खालच्या पातळीचा शब्द आहे. मी मालदीवला गेलो होतो. मी सरकारची परवानगी घेऊन आपल्या मुलांसोबत गेलो होतो. त्याला तुम्ही खंडणी म्हणत होते, हे चुकीचे आहे.

    माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी एक छोटा सरकारी कर्मचारी आहे. ते खूप मोठे मंत्री आहेत. देशसेवा करण्यावरुन, ड्रग्ज हटवण्यावरुन ते मला जेलमध्ये टाकत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो

  • 21 Oct 2021 08:02 PM (IST)

    वरिष्ठांचा सल्ला करुन मी कारवाई करणार- समीर वानखेडे

    मी केंद्रीय कर्मचारी आहे. मी माझ्या वरिष्ठांचा सल्ला घेईल. त्यांच्या सल्ल्यानुसार मी कारवाई करेल. मी बॉलिवूडला टार्गेट करण्यासाठी आलो आहे, हा आरोप चुकीचा आहे.

  • 21 Oct 2021 08:00 PM (IST)

    देशाची सेवा करण्यासाठी तुरुंगात टाकण्यात येणार असेल तर स्वागत करतो- समीर वानखेडे

    मागील पंधरा दिवसांपूसन माझ्या कुटुंबीयांवर शाब्दिक केले जात आहेत. नवाब मलिक हे मोठे मंत्री आहेत. मी छोटा सरकारी नोकर आहे. देशाची सेवा करण्यासाठी मला तुरुंगात टाकण्यात येत असेल तर मी स्वागत करतो.

  • 21 Oct 2021 07:58 PM (IST)

    नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे, चौकशी करु शकता- समीर वानखेडे

    समीर वानखेडे माध्यमांशी सेवा करत आहेत. नवाब मलिक दुबईविषयी सांगत आहेत ते चुकीचे आहे. मी या चुकीच्या माहितीचे खंडण करतो. हा सर्व आरोप चुकीचा आहे. त्यांनी केलेल्या आरोपांनुसार डिसेंबर महिन्यात मी मुंबईला होतो. त्याची चौकशी केली जाऊ शकते, असे समीर वानखेडे म्हणाले.

  • 21 Oct 2021 07:47 PM (IST)

    समीर वानखेडे परवानगी घेऊन मालदीवला गेले होते, एनसबी अधिकाऱ्यांची माहिती

    समीर वानखेडे परवानगी घेऊन मालदीवला गेले होते

    नवाब मलिक यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही

    एनसबी अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद घेऊन माहिती

  • 21 Oct 2021 07:37 PM (IST)

    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मालदीवला गेल्याचं मान्य केलं- नवाब मलिक

  • 21 Oct 2021 06:36 PM (IST)

    मंत्री नवाब मलिकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, एनसीबीच्या समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

    मंत्री नवाब मलिकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया

    मी दुबईला कधी गेलो ते मलिकांनी सांगावं

    मलिकांवर कायदेशीर कारवाई करणार

    समीर नावखेडे यांची प्रतिक्रिया

  • 21 Oct 2021 05:46 PM (IST)

    पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही नव्या कोरोनाबाधित मृत्यूची नोंद नाही, 112 नवे रुग्ण

    पुणे : दिवसभरात ११२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ११८ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. -१५१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०३४६९. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९८८. - एकूण मृत्यू -९०६७. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९३४१४. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९८६.

  • 21 Oct 2021 05:21 PM (IST)

    संजय राऊत यांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा आणखी उतरली नाही का? : चित्रा वाघ

    औरंगाबाद  :

    चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर जहरी टीका

    संजय राऊत यांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा आणखी उतरली नाही का?

    औरंगाबादच्या बलात्काराच्या घटनेवर संजय राऊत यांनी एक शब्दही का काढला नाही?

    चित्रा वाघ यांचा पत्रकार परिषदेत संतप्त सवाल

    त्यांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरलेली नाही

    त्यामुळे त्यांनी या बलात्कार प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही

  • 21 Oct 2021 04:14 PM (IST)

    पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रवर दरोडा, बंदूकीचा धाक दाखवत 31 लाख रोख आणि दोन कोटींचे सोने पळवले

    शिरूर (पुणे) : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भर दिवसा बँक ऑफ महाराष्ट्रवर दरोडा, दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत बँकेतील ३१ लाख रुपये रोकड तसेच दोन कोटी रुपये सोने चोरी गेल्याची प्राथमिक माहिती, पाच ते सहा दरोडेखोर दुपारच्या सुमारास चारचाकी वाहनातून येऊन बॅकेत टाकला दरोडा, आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली घटना

  • 21 Oct 2021 03:53 PM (IST)

    हर्षवर्धन पाटील फाटली होती म्हणून भाजपमध्ये गेले का? नवाब मलिक भडकले

    नवाब मलिक यांची हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया :

    हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपमध्ये गेलो म्हणून शांत झोप येते. फाटली होती म्हणून भाजपमध्ये गेले का? बरं आता गेले ते गेले. आमच्यावर यंत्रणांचा वापर केला तरी महाविकासआघाडी सरकारला काही फरक पडत नाही. पण एक सांगतो आम्हाला शांत झोप येते आणि येणारच. पण तुमची झोप उडवून टाकू.

    मी वानखेडेला आव्हान देतो, वर्षभरात तुझी नोकरी जाईल हा किती बोगस आहे माहितीये, याचा बाप बोगस होता माझ्या जावयाला जेलमध्ये टाकले, मला फोन करत होता, माझ्यावर दबाब होता अरे दबाब टाकणाऱ्या तुझ्या बापाचं नाव सांगा ना पोकळ धमकीला घाबरणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत

  • 21 Oct 2021 03:29 PM (IST)

    जळगावमध्ये अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना ग्रामस्थांकडून मारहाण

    जळगाव :

    जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लोणी येथे अतिक्रमण निर्मूलन कारवाईवेळी पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक कर्मचाऱ्यास ग्रामस्थांची मारहाण

    अतिक्रमण कारवाईला विरोध करत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी केली जबर मारहाण

    ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या अतिक्रमण बंदोबस्तांसाठी गेलेले पहूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे सहकारी पोलीस नाईक दिनेश मारवडकर यांना झालीये मारहाण

    मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून, याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे

  • 21 Oct 2021 03:23 PM (IST)

    नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी

    - कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी

    - पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांची तपासणी आयकर विभागाकडून सुरू

    - कांदा साठवणूक करत जास्त दराने कांदा विक्री केल्या गेली का ? याबाबत कागदपत्रांची तपासणी सुरु

    - कमालीची गुप्तता ठेवत आयकर विभागाकडून आज सकाळपासून कांदा व्यापाराची तपासणी सुरु

    - कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आयकर विभागाकडून केंद्र सरकारच्या वतीने धाडी टाकल्याची चर्चा

    - बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी दोनशे रुपयाची घसरण होत कांद्याचे सर्वसाधारण बाजार भाव आले पंचवीस रुपयांपर्यंत

  • 21 Oct 2021 03:22 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरु

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मानवी हक्क आयोगाृ संदर्भात गृह विभागासमवेत बैठक सुरू

    बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित

    सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक सुरू

  • 21 Oct 2021 03:19 PM (IST)

    केवळ भीती निर्माण करुन बदनामी करण्यासाठी अजित पवारांच्या बहिणींच्या घरी छापा : नवाब मलिक

    नवाब मलिक यांची भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया :

    केंद्र सरकारची बोगसगिरी सुरु आहे

    केवळ भीती निर्माण करुन बदनामी करण्यासाठी अजित पवारांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने कारवाई केली

    आठ-आठ दिवस नेत्याच्या नातेवाईकांच्या घरी कारवाई ही लोकांना घाबरवण्यासाठी केली जाते

    महाविकास आघडीचे नेते कार्यकर्ते याला घाबरणार नाही

    बंगालमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होणार,

    पंजाबमध्ये मोदींना हटवण्यासाठी अन भाजपला नेस्तनाबूत ही तीन राज्य करतील

    आर्यन खान प्रकरणावर प्रतिक्रिया :

    समीर वानखेडे प्रसिद्धसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहे

    वानखडे भाजप वाल्यांचा म्होरक्या आहेत

    या बोगस केसेस आहेत, हे आम्ही कोर्टात सिद्ध करु

    येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे

    ही तोडपाणी थांबली पाहिजे

  • 21 Oct 2021 12:41 PM (IST)

    अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीचं समन्स

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला समन्स बजावलं आहे

    ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेला घरी जाऊन समन्स बजावलं

  • 21 Oct 2021 12:38 PM (IST)

    तोंडोळी सामूहिक बलात्कार प्रकरण, शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट

    औरंगाबाद =-

    तोंडोळी सामूहिक बलात्कार प्रकरण

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट

    पीडित कुटुंबाची भेट घेऊन संदीपान भुमरे यांनी केलं सांत्वन

    औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडळी गावात दोन महिलांवर सात जणांनी केलाय बलात्कार

    शेतवस्तीवत दरोडा टाकून 2 महिलांवर केला सात दरोडेखोरांनी बलात्कार

    संदीपान भुमरे यांनी कुटुंबाचे सांत्वन करून जलद तपास करण्याच्या पोलिसांना दिल्या सूचना

  • 21 Oct 2021 12:37 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

    पुणे

    राष्ट्रवादी काँग्रेसचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन,

    झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचं आंदोलन,

    छकड्यावर दुचाकी ठेऊन निषेधात्मक आंदोलन,

  • 21 Oct 2021 12:37 PM (IST)

    मुंबई सत्र न्यायालयात राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ ईडी प्रकरणात न्यायालया समोर हजर झाले

    मुंबई सत्र न्यायालयात राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ ईडी प्रकरणात न्यायालया समोर हजर झाले

    आज या प्रकरणात न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यास बजावले होते

    भुजबळांना २०१६ मध्ये ईडीने मनीलाँड्रींग गुन्ह्यात अटक केली होती

    या गुनह्यात हजर राहण्याचे आदेश देण्यातलआलेहोते.

  • 21 Oct 2021 11:17 AM (IST)

    थकबाकीदारांनी थकीत वीजबिल न भरल्यास ऐन दिवाळीत घरी होणार अंधार

    नागपूर -

    वीज बिल ठाकबाकीदारांनो सावधान

    थकबाकीदारांनी थकीत वीजबिल न भरल्यास ऐन दिवाळीत घरी होणार अंधार

    नागपूर परिमंडळात तब्बल 6 लाखांवरील वीज ग्राहकांवर जवळपास 250 कोटींची थकबाकी

    कोळसा संकट निर्माण झाल्यावर कोळसा कंपन्यांना बिल देणं शक्य झालं नाही त्यामुळे यावर समतोल साधण्यासाठी वीज बिल वसुली होणार

  • 21 Oct 2021 11:16 AM (IST)

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पासून 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पासून 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर

    रात्री होणार नागपुरात आगमन

    पोलीस वसाहत, हुडकेश्वर पोलीस स्टेशन इमारत, महिला पोलीस कक्षाच उदघाटन सारख्या कार्यक्रमात होणार सहभागी

  • 21 Oct 2021 11:16 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांवर विद्युत रोषणाई

    औरंगाबाद -

    औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांवर विद्युत रोषणाई

    100 कोटी लसीकरण पूर्ण झाल्याच्या उत्साहात विद्युत रोषणाई

    औरंगाबाद शहरातील बीबी का मकबऱ्याबर केली तिरंगी विद्युत रोषणाई

    तर देवगिरी किल्ल्यातील चांद मिनार वरही केली विद्युत रोषणाई

    विद्युत रोषणाईत झगमगले औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

  • 21 Oct 2021 11:15 AM (IST)

    यवतमाळमध्ये वांजरी शिवारात वाघाचा गुरख्यावर हल्ला

    यवतमाळ- वांजरी शिवारात वाघाचा गुरख्यावर हल्ला,

    गुलाब कुंचलवार याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

    शेतात गाई चारायला गेला असता त्याच्या भागात नाल्या जवळ असलेल्या वाघाने केला हल्ला बरेच दूर फरफटत नेत केला हल्ला

    या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण

  • 21 Oct 2021 10:42 AM (IST)

    आर्यन खानच्या जामिनाबाबत मंगळवारी सुनावणी होणार

    शाहरुख खानने आर्यनची भेट घेतली

    आर्यन खानच्या जामिनाबाबत मंगळवारी सुनावणी होणार आहे,

    वकिलांनी न्यायालयात विनंती केली

    जामिनाबाबत मुंबई उच्च न्यायालयात विनंती करण्यात आली आहे

  • 21 Oct 2021 10:11 AM (IST)

    भारताने इतिहास रचला, कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा पार

  • 21 Oct 2021 09:29 AM (IST)

    जगभरात प्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्यांच्या दरात मोठी घसरण

    - जगभरात प्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्यांच्या दरात मोठी घसरण

    - सात हजार ते १५ हजार रुपये टनांपर्यंत कोसळले संत्र्याचे दर

    - दरवर्षी २२ ते २५ हजार रुपये टन असायचा संत्र्याचा दर

    - अतिवृष्टीमुळे आधीच ६० टक्के संत्र्याची झाली गळ, त्यात दर पडल्याचा फटका

    - दर पडल्याने नागपुर संत्राउत्पादक संकटात

    - यंदा नागपूरी संत्र्याचा उत्पादन खर्चंही निघत नाही

  • 21 Oct 2021 08:58 AM (IST)

    नाशकातील वादग्रस्त आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या खुल्या चौकशीला परवानगी

    नाशिक -

    वादग्रस्त आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या खुल्या चौकशीला परवानगी

    लोकायुक्तांनी दिले खरमाटे यांच्या खुल्या चौकशीचे आदेश

    खरमाटे यांच्या विरोधात निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी केली होती तक्रार

    खरमाटे यांच्या चौकशीत धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता

  • 21 Oct 2021 08:58 AM (IST)

    सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे असतील चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे स्वच्छतादूत

    चंद्रपूर -

    सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे असतील चंद्रपूर महानगरपालिकेचे नवे स्वच्छतादूत

    चंद्रपूर शहर मनपा कार्यक्षेत्रात स्वच्छता मिशनच्या कार्याला मिळणार नवी प्रेरणा,

    मनपाच्या सभागृहात अनिकेत आमटे यांचा करण्यात आला विशेष सन्मान,

    राज्यातील स्वच्छ महापालिका यादीत चंद्रपूरचा पहिल्या तीन मध्ये आहे समावेश,

    यापुढच्या स्वच्छता कार्यासाठी चंद्रपूर मनपा व नागरिक जोमाने प्रयत्नरत राहणार असल्याचा विश्वास

  • 21 Oct 2021 08:58 AM (IST)

    नाशकात वाढलेल्या गुन्हेगारिचा बिमोड करा नाशिककरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

    नाशिक -

    नाशकात वाढलेल्या गुन्हेगारिचा बिमोड करा नाशिककरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

    दिवसागणिक शहरात,घरफोडी,जबरी लूट, चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत

    चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नाही हेच यावरून स्पष्ट होतंय

    त्यामुळे पोलीस आयुक्तांनी इतर मोहीम हाती घेण्याबरोबरच गुन्हेगार ही शहरातून हद्दपार करावे अशी मागणी नाशिककर करत आहेत

  • 21 Oct 2021 08:57 AM (IST)

    नाशकात लसीकरणानंतर महिला डॉक्टरचा मृत्यू

    नाशिक -

    लसीकरणानंतर महिला डॉक्टरचा मृत्यू

    धक्कादायक मृत्यूची केंद्र शासनानं घेतली गंभीर दखल

    32 वर्षीय डॉ स्नेहल लुणावत या होत्या डेंटिस्ट

    इगतपुरीच्या SMBT मेडिकल कॉलेजमध्ये होत्या कार्यरत

    28 जानेवारीला,कोरोना योद्धा म्हणून घेतली होती लस

    यानंतर सुरू झाला त्रास

    माईल्ड मायग्रेन हे पहिलं निदान

    मात्र,उपचारासाठी हलविण्यात आलं दिल्लीत

    लसीकरणानंतर,दुर्मिळ गुंतागुंत होऊन,मेंदूत रक्तगाठ झाली होती तयार

    अखेर 1 मार्चला घेतला अखेरचा श्वास

    त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याचं, केंद्रीय आरोग्य विभागाच्या AEFI समितीनं केलं स्पष्ट

    सिरीयस ऍडव्हर्स इव्हेन्ट फॉलोईंग इम्युनायझेशन असं समितीच्या अहवालात नमूद

    लस उत्पादक कंपनीलाही, डॉ स्नेहल यांच्या पालकांची तक्रार

    दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं आरोग्य विभागाचं मत

    मात्र,या घटनेनं मोठी खळबळ

  • 21 Oct 2021 08:44 AM (IST)

    पालिका निवडणुकीच्या तोंडावर जागा भाडेतत्त्वावर विषय पुन्हा महासभेत येणार

    सोलापूर -

    पालिका निवडणुकीच्या तोंडावर जागा भाडेतत्त्वावर विषय पुन्हा महासभेत येणार

    पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून महापालिकेच्या जागा हडपण्याचा प्रकारावर आणला होता अंकुश

    जो जास्त भाडे देईल त्यालाच जागा भाडेतत्त्वावर देणे गरजेचे ठरविले होते धोरण

    दरम्यान महानगरपालिका निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने भाडेतत्त्वावर जागा घेण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या

    उद्या होणार्‍या महासभेत भाडेतत्वाच्या जागांवर होणार चर्चा

  • 21 Oct 2021 07:55 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली; लेखी परीक्षेची नवीन तारीख 19 नोव्हेंबर

    पिंपरी चिंचवड

    - पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली; लेखी परीक्षेची नवीन तारीख 19 नोव्हेंबर

    - पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा थेट दिवाळी नंतर तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे

    - परीक्षार्थींची संख्या अधिक असल्याने नियोजन करणे सहज शक्य होत नसल्याने परीक्षेची तारीख पुढे आहे

    - पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा थेट दिवाळी नंतर तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. परीक्षार्थींची संख्या अधिक असल्याने परीक्षेची तारीख पुढे आहे

    - पहिल्या टप्प्यातील 720 पदांसाठी एक लाख 89 हजार 732 जणांचे अर्ज आलेत

  • 21 Oct 2021 07:50 AM (IST)

    पुण्यात आज 198 लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा

    पुणे

    पुण्यात आज 198 लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा,

    कोव्हीशिल्ड आणि कोव्हँक्सिन दोन्ही ही लसीचे डोस मिळणार,

    187 केंद्रावर 250 डोसचं नियोजन करण्यात आलंय,..

    कोव्हँक्सिनच्या 11 केंद्रावर 500 लसीच्या डोसचं नियोजन करण्यात आलाय

  • 21 Oct 2021 07:49 AM (IST)

    सोलापुरातील सहा जणांना दोन वर्षांसाठी तडीपारीचे आदेश

    सोलापूर -

    सोलापुरातील सहा जणांना दोन वर्षांसाठी तडीपारीचे आदेश

    सोलापूर शहर जिल्हा इंदापूर तालुका उस्मानाबाद जिल्हा येथील दोन वर्षासाठी तडीपार

    फैजल अब्दुल रहीम सालार, मोसिन अब्दुल रहीम सालार, मुस्तफा अब्दुल रहीम सालार, मल्लिकार्जुन आळगुंडगे, योगेशकुमार चोळे, महादेव सरडगी असे तडीपार करण्यात आलेल्या लोकांची नावे

    गर्दी जमवणे, लोकांना दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करणे ,जीवे मारण्याचा प्रयत्न असे सहा जणांवर गंभीर प्रकारचे गुन्हे

    पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी काढले आदेश

  • 21 Oct 2021 07:49 AM (IST)

    अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात 19400 हेक्टर पिकांचं नुकसान

    - अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात 19400 हेक्टर पिकांचं नुकसान

    - सर्वेक्षणानंतर नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर

    - अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं सर्वाधिक नुकसान

    - 15 हजार हेक्टरवरील सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका

    - 4400 हेक्टरवरील कापूस पिकाचं नुकसान

    - जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार

  • 21 Oct 2021 07:48 AM (IST)

    पुण्यात आणखी एक नवीन नगरपरिषद होणार?

    पुण्यात आणखी एक नवीन नगरपरिषद होणार?

    हिंजवडीसह लगतची पाच गावं नगरपरिषद करण्याच्यादृष्टीने नगरविकास मंत्री एकनाथ यांच्याशी प्राथमिक चर्चा,

    पुणे विभागीय आयुक्तांचा अहवाल मागविण्यात आलाय..

    पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद यांचीही, पीएम आरडीए यांचीही मतं जाणून घेतली जाणाराय,

    हिंजवडी, माण, मारूंजी, नेरे, नांदे, कासारसाई ही गावं मिळून नगरपरिषद स्थापन करण्याचा विचार,

    नगरविकास विभागाकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता,

    सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 21 Oct 2021 07:19 AM (IST)

    हुपरी नगर परिषदेतील भाजपमधील अंतर्गत धुसफूस उफळली

    कोल्हापूर

    हुपरी नगर परिषदेतील भाजपमधील अंतर्गत धुसफूस उफळली

    उपनगराध्यक्ष भरत घट्टे यांच्या विरोधात अविश्वास ठराव

    ठरावावर नगराध्यक्षा जयश्री गट यांचीही सही

    नगराध्यक्षा 12 यांच्यासह 12 नगरसेवकांनी दाखल केला ठराव

    भाजपमध्ये राहुल पक्षविरोधी कारवाई केल्याचा गट्टे यांच्यावर आरोप

    दाखल ठरावावर चर्चेसाठी 25 ऑक्टोबरला होणार सभा

  • 21 Oct 2021 07:09 AM (IST)

    कोरोनाची तपासणी आणि लसीकरण करणाऱ्या मनपाचे कर्मचारी वेतनापासून वंचित

    औरंगाबाद -

    कोरोनाची तपासणी आणि लसीकरण करणाऱ्या मनपाचे कर्मचारी वेतनापासून वंचित

    ऑगस्ट महिन्यापासून मिळाला नाही पगार

    तिसरा महिना सुरू झाला तरी पगार नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमार

    कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार साजरी मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर प्रश्न निर्माण

    याआधी 630 कर्मचाऱ्यांना केले होते कामावरून कमी,उर्वरित 130 कर्मचाऱ्यांचे पगारच नाहीत

    कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या निधीसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केल्याची मनपाची माहिती

  • 21 Oct 2021 07:09 AM (IST)

    जलवाहिनीचे काम वेगाने करा अन्यथा होणार कंत्राटदारांना दंड

    औरंगाबाद -

    जलवाहिनीचे काम वेगाने करा अन्यथा होणार कंत्राटदारांना दंड..

    अतिवृष्टी नंतर थंडावलेल्या कंत्राटदाराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिला इशारा..

    आता पावसाळा संपला असून कामांना गती द्या अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा..

    1680 कोटी रुपयांची औरंगाबाद शहरासाठी मंजूर केलीली योजना..

    हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला दिलेले काम..

  • 21 Oct 2021 07:08 AM (IST)

    कोरोना काळात फटाक्यामुळे पर्यावरणात धूर निर्माण होऊ नये यासाठी ग्रामीण भागांमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

    सोलापूर - कोरोना काळात फटाक्यामुळे पर्यावरणात धूर निर्माण होऊ नये यासाठी ग्रामीण भागांमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

    त्यानुसार प्रशासनाने ग्रामीण भागातील सर्व नगरपरिषद प्रशासनाला पत्र पाठवून, बैठका घेऊन प्रथम ते मुक्त दिवाळी साजरी करण्याच्या केल्या सूचना

    नगरपरिषद प्रशासन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागांमध्ये फटाके उडवतात येणार नाही, फटाक्यांची विक्रीवरही बंदी

  • 21 Oct 2021 07:07 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात पुन्हा वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची चिंता

    - नागपूर जिल्ह्यात पुन्हा वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची चिंता

    - गेल्या २४ तासांत जिल्हयात १३ नव्या कोरोना रुग्णांची भर

    - जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली ३७ वर

    - ३१८७ जणांच्या चाचण्यांमधून १३ जणांचे रिपोर्ट आले पॅाझिटीव्ह

    - जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या १० च्या वर

  • 21 Oct 2021 07:06 AM (IST)

    गुडबायचे फिल्मी स्टाईल स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

    औरंगाबाद -

    गुडबायचे फिल्मी स्टाईल स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

    फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणाची राहत्या घरातील पंख्याला घेतला गळफास..

    नागेश मधुकर तुरूकमाने असे युवकाचे नाव..

    उच्चशिक्षित तरुणाने जीवनयात्रा का संपवली याचे कारण अस्पष्ट..

    छावणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • 21 Oct 2021 06:59 AM (IST)

    गुटखा कारवाईतील आरोपीला जामीनासाठी मदत करण्यासाठी स्वीकारली 40 हजारांची लाच

    कोल्हापूर

    गुटखा कारवाईतील आरोपीला जामीनासाठी मदत करण्यासाठी स्वीकारली चाळीस हजारांची लाच

    कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाड पोलीस स्टेशनचा सहाय्यक फौजदारा सह पंटर ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

    राजेंद्र उगलमुगले असं सहाय्यक फौजदाराचा ना तर आप्पासाहेब मगदूम अस पंटर च नाव

    राजेंद्र उगलमुगले याला गेल्यावर्षीच मिळालय पोलीस महासंचालक पदक

    वादग्रस्त कारकीर्द असलेला उगलमुगले अखेर लाचलुचपत जाळ्यात

  • 21 Oct 2021 06:47 AM (IST)

    दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांचे उच्चांकी दराची परंपरा कायम

    कोल्हापूर -

    दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांचे उच्चांकी दराची परंपरा कायम

    या वर्षीच्या गळीत हंगामासाठी कारखाना तीन हजार 56 रुपये एकरकमी एफआरपी देणार

    ऊस उत्पादकांची दिवाळी यंदा गोड होणार

    कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी पाटील यांची माहिती

    दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना ठरला जिल्ह्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना

  • 21 Oct 2021 06:46 AM (IST)

    अहमदनगरातील जवळे गावात युवतीचा मृतदेह तिच्या घरातच आढळून आल्याने खळबळ, अत्याचार करुन खून केल्याचा संशय

    अहमदनगरला पारनेर तालुक्यातील जवळे गावात एका युवतीचा मृतदेह तिच्या घरातच आढळून आल्याने खळबळ उडालीये. तरुणीवर अत्याचार करून तोंडात बोळा कोंबून खून केल्याचा पोलिसांना संशय आहेय. ही तरुणी घरात एकटीच असताना हा प्रकार घडल्याच समोर आलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आलाय. तर या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जातेय.

Published On - Oct 21,2021 6:25 AM

Follow us
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.