Maharashtra News LIVE Update | सामान्य नागरिकालाही पत्र लिहण्याचा अधिकार, लोकशाहीचा खून करणे सुरु- चंद्रकांत पाटील

| Updated on: Sep 22, 2021 | 12:38 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | सामान्य नागरिकालाही पत्र लिहण्याचा अधिकार, लोकशाहीचा खून करणे सुरु- चंद्रकांत पाटील
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Sep 2021 10:58 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव, एकाच गोठ्यातील 11 जनावरांचा मृत्यू 

    पुणे : जिल्ह्यात लाळ्या खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव

    जिल्ह्यातील डाळज  येथे लाळ्या खुरकूत रोगाने एका गोठ्यातील 11 जनावरांचा मृत्यू

    जनावरांची लाळ तपासणीसाठी भोपाळला पाठवली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह

    जिल्ह्यात लाळ्या खुरकूत रोगाचा प्रसार व्हायला सुरुवात झाल्यानं पशुसंवर्धन विभाग अलर्टवर

    एकाच शेतकऱ्यांच्या 11 गाईंचा दोन दिवसात झाला मृत्यू

    जिल्हा परिषद कडून मदतीची शेतकऱ्याला अपेक्षा

  • 21 Sep 2021 09:01 PM (IST)

    उस्मानाबादेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार

    उस्मानाबाद : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार

    अंबीतील तरुणाची फसवणूक, नांदेडच्या वधूसह चौघांना बेड्या

    अंबी येथील विश्वनाथ भोसले या तरुणाचा विवाह नांदेड येथील एका तरुणीसोबत 18 सप्टेंबरला झाला

    दुसऱ्या दिवशी लघुशंकेच्या बहान्याने नववधू विवाहातील दागिन्यांसह तीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने झाली पसार

    उस्मानाबाद पोलीसानी केली नांदेड येथून अटक

  • 21 Sep 2021 07:55 PM (IST)

    सामान्य नागरिकालाही पत्र लिहण्याचा अधिकार, लोकशाहीचा खून करणे सुरु- चंद्रकांत पाटील

    मुंबई : आजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांनी जे पत्र लिहिलं आहे, यामध्ये देखावा करण्याचं काय आहे ? हा संवैधानिक अधिकार आहे. सामान्य नागरिकालाही पत्र लिहण्याचा अधिकार आहे. राज्यपाल अधिवेशन बोलवत असतात. मुख्यमंत्र्यांनी बोलवायचं नसतं. मुख्यमंत्र्यांनी फक्त विनंती करायची असते. राज्यपालांच्या सहीशिवाय अधिवेशन बोलावता येत नाही. राज्यपालांच्या सहीशिवाय अधिवेशन संस्थगित करता येत नाही. मुंबईमध्ये जी घटना घडली ती भूषणावह आहे का ? लोकशाहीचा खून करणे सुरु आहे. दोन दिवसांपेक्षा जास्त अधिवेशन होत नाहीये. प्रश्नांवर चर्चा होत नाहीये, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

  • 21 Sep 2021 07:47 PM (IST)

    अभिनेता सोनू सूदच्या समर्थनार्थ नागपुरात आम आदमी पक्षाचे आंदोलन

    नागपूर -अभिनेता सोनू सूदच्या समर्थनार्थ आम आदमीचं आंदोलन

    सोनू सूदच्या घरावर टाकण्यात आलेल्या आयकर विभागाच्या रेड विरोधात आंदोलन

    केंद्र सरकार सूड भावणेने कारवाई करत आहे ती मागे घ्यावी

    अन्यथा मोठं आंदोलन करण्याचा इशारा

  • 21 Sep 2021 07:44 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुली होणार

    पिंपरी चिंचवड -पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुली होणार

    -मात्र केवळ जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाच मुभा

    -जलतरण प्रशिक्षकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक

    -आदेश उद्यापासून लागू होतील

    -तसं परिपत्रक पालिका आयुक्त यांनी काढलं आहे.

  • 21 Sep 2021 06:37 PM (IST)

    राज्यपाल कुटुंबप्रमुख आहेत, त्यांनी विरोधकांचे कान उपटले पहिजे,- संजय राऊत

    मुंबई : संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  अशा प्रकारचं पत्र लिहून ते मीडियाकडे लीक करण्याची गरज नाही. विशेष अधिवेशन कशासाठी. राज्यापाल हे राज्याचे पालक आहेत. त्यांनी राज्याची बदनामी करु नये. घटनादत्त पदावर ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते या राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. राज्याची बदनामी होत असेल तर त्यांनी त्याला विरोध केला पाहिजे. भाजपचे लोक विरोधी पक्षात आहेत. ते सरकारवर चिखल फेकत आहेत. राज्यपाल ज्येष्ठ आहेत. त्यांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे. त्यांच्या डोक्यावरची टोपी ही विद्वत्तेची आहे. त्यांनी विरोधकांचे कान उपटले पहिजे. राजभवनात जाऊन सरकारविरोधी जे काही सुरु आहे, त्यामुळे आम्हाला एक दिवस पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांकडे जाऊन भूमिका मांडवी लागेल. तुमच्या इतर राज्यात काही घडत नाही का. सगळं आलबेल आहे का ? राज्यपालांनी आ बैल मुझे मार असं केलं आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची. त्यांनी आम्हाला मूठ उघडायला लावली आहे. अजून काही उघडायला लावू नका, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

  • 21 Sep 2021 06:35 PM (IST)

    सोनपेठ सामूहिक बलात्कार आणि आत्महत्या प्रकारण, मयत मुलीचा मृतदेह गावात पोचला

    परभणी ब्रेकिंग :-

    सोनपेठ सामूहिक बलात्कार आणि आत्महत्या प्रकारण

    मयत मुलीचा मृतदेह गावात पोचला

    गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    पोलीस बंदोबस्तात मुलीवर होणार अंत्यसंस्कार

  • 21 Sep 2021 06:06 PM (IST)

    अहमदनगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका, 5 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण

    अहमदनगर : कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याचा धोका

    आज जिल्ह्यात 5 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण

    जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना नियमांचा विसर

    विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचं मोठं विधान

    नगर जिल्ह्यात दौरा केल्यानंतर केलं विधान

    दहावा, लग्न सोहळे मोठ्या प्रमाणात तर रस्त्यांवर मोठी गर्दी

    नागरिकांनी दक्षता न घेतल्यास अहमदनगर जिल्ह्यातून तिसरी लाट सुरू होऊ शकते

    नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे विभागीय महसूल आयुक्तांचे आदेश

  • 21 Sep 2021 06:02 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस

    कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस

    ठिकठिकाणी साचले पावसाचे पाणी

    टिटवाळयातील इंदिरानगरात साचले पाणी

    वाहणाऱ्या पाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

    बेकायदा बांधकामामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी

  • 21 Sep 2021 06:01 PM (IST)

    जळगाव शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

    जळगाव - शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

    दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा

    जळगावकरांना उकड्यापासून दिलासा

  • 21 Sep 2021 04:32 PM (IST)

    अमित ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मनसेच्या बैठकीला सुरुवात

    नाशिक - अमित ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

    नाशिकच्या राजगड कार्यालयात बैठक सुरू

    उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला येणार असल्याने बैठकीचे आयोजन

    अमित ठाकरे यांनी निवडलेल्या शाखाध्यक्षांची राज ठाकरे उद्या करणार नियुक्ती

    मनसे नेत्याच्या दोन दिवसीय दौऱ्याकडे राज्यचं लक्ष

  • 21 Sep 2021 04:31 PM (IST)

    ठाणे महापालिका कार्यालयात ठेकेदारांचे ठिय्या आंदोलन

    ठाणे : महापालिका कार्यालयात ठेकेदारांचे ठिय्या आंदोलन

    महापालिकेची कामं करूनही बील मिळत नसल्यामुळे ठेकेदार आक्रमक

    बिले अदा केली नाही तर प्रलंबित कामे बंद करण्याचा ठेकेदारांचा इशारा

    महापालिका कार्यालयात मोठ्या संख्येने ठेकेदरांची उपस्थिती

  • 21 Sep 2021 04:03 PM (IST)

    नांदगाव तसेच शहर परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस 

    मनमाड : नांदगाव शहर व परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस

    - लेंडी नदीला पुन्हा पुरसदृश परिस्थिती

    - शहरातून पुन्हा पाणी वाहू लागले

    -  नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे

    - नांदगाव नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन

    - रेल्वेचा सबवे पुन्हा पाण्याने भरला ; नागरिकांचे हाल

  • 21 Sep 2021 03:52 PM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु

    अर्ध्या तासापासून पाऊस सुरु

    विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

  • 21 Sep 2021 03:51 PM (IST)

    महिलांचा गाऊन घालून घरफोड्या करणारा चोर औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात 

    औरंगाबाद : महिलांचा गाऊन घालून घरफोड्या करणारा चोर पोलिसांच्या जाळ्यात

    घरफोडी करताना पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोराने लढवली अजब शक्कल

    औरंगाबादच्या गुन्हे शाखेची कारवाई

    नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा असे या चोरट्याचे नाव

    सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण कैद झालोच तर पोलिसांना कळू नये म्हणून चोराची नवी शक्कल

    नईमवर खून आणि मारहाणीचे गुन्हेही दाखल आहेत

  • 21 Sep 2021 12:54 PM (IST)

    चंद्रपुरात पावसाची मुसळधार हजेरी, मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरातील दैनंदिनी विस्कळीत

    चंद्रपुरात पावसाची मुसळधार हजेरी, मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरातील दैनंदिनी विस्कळीत

    आज सकाळपासून शहर जिल्ह्यात आकाश होते ढगाळलेले,

    गेले तासभर मुसळधार पावसाने रस्ते केले जलमय, कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची सकाळच्या पावसाने केली पंचाईत,

    जिल्ह्यातील वार्षिक पावसाची टक्केवारी आता 87 टक्‍क्‍यांवर, मागील वर्षी या तारखेपर्यंत केवळ 63 टक्के पावसाची होती नोंद,

    दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

  • 21 Sep 2021 12:54 PM (IST)

    सोलापुरात एका स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून फ्री स्टाईलने मारहाण

    सोलापुरात एका स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून फ्री स्टाईलने मारहाण

    कर्ज प्रकरणासाठी फाईल देणाऱ्या नागरिकास भर चौकात

    बँकेच्या भोसले नामक व्यवस्थापकाने काल रात्री शिवीगाळ केल्यामुळे जाब विचारण्यास गेलेल्या नागरिकास मारहाण

    स्मॉल फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या बाहेरच केली फ्री स्टाइल मारहाण

    कर्ज घेण्यास आलेल्या दोन नागरिकाना केली बेदम मारहाण

    अमर बोडा,चंद्रशेखर बोडा असे मारहाण झालेल्या नागरिकांचे नाव

  • 21 Sep 2021 12:53 PM (IST)

    कल्याण, बँक ऑफ बडोदाच्या शाखेला लागली आग

    कल्याण, बँक ऑफ बडोदाच्या शाखेला लागली आग

    कल्याण पश्चिम येथील मोहने परिसरात घडला प्रकार

    अग्निशमन च्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

    शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

    आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच

  • 21 Sep 2021 12:52 PM (IST)

    कोलशेवाडी पोलिसांची दबंगगिरी वादाच्या भोवऱ्यात, कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरातील घटना

    कोलशेवाडी पोलिसांची दबंगगिरी वादाच्या भोवऱ्यात

    कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरातील घटना

    नाका बंदी दरम्यान दुचाकीस्वाराच्या डोक्यात काठीने मारलं

    दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत

    विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी

  • 21 Sep 2021 12:51 PM (IST)

    लस घ्या अन्... पैठणी जिंका, लसीकरण वाढावे यासाठी येवल्यातील साईनाथ मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अनोखी आयडिया

    येवला

    - लस घ्या अन्... पैठणी जिंका

    - लसीकरण वाढावे यासाठी साईनाथ मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अनोखी आयडिया

    - दर एक तासाला पाच पैठणी, अशा पंचवीस पैठणीचे केले जाणार वाटप

    - आज येवल्यात मेगा लसीकरण

    - एक हजार जणांना दिली जाणारी लस

  • 21 Sep 2021 10:43 AM (IST)

    नागपूरसह परिसरात पडतोय मुसळाधार पाऊस

    - नागपूरसह परिसरात पडतोय मुसळाधार पाऊस

    - पुढील दोन दिवस नागपूसह विदर्भात मुसळाधार पावसाचा अंदाज

    - नागपूर हवामान विभागाने विभागाने वर्तवला अंदाज

    - शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता

  • 21 Sep 2021 10:42 AM (IST)

    वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीला सुरुवात

    पुणे -

    - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीला सुरुवात

    - बैठकीला शरद पवार,अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांची उपस्थिती

    - बैठकीनंतर अजित पवार मीडियाशी बोलणार

  • 21 Sep 2021 10:41 AM (IST)

    दुधात भेसळ करत विक्री, सिन्नरच्या पाथरे गावातील स्वामी समर्थ दूध संकलन केंद्रातील प्रकार

    नाशिक - दुधात भेसळ करत विक्री

    सिन्नरच्या पाथरे गावातील स्वामी समर्थ दूध संकलन केंद्रातील प्रकार

    अन्न व सुरक्षा विभागाने टाकलेल्या छाप्यात ३२० लिटर भेसळयुक्त दूध जप्त

    सोबायीन तेल आणि रंगहीन द्रव्य मिसळत केली जात होती भेसळ

    केंद्र चालक अक्षय गुंजाळ सह चार जणांवर वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    अक्षय गुंजाळ अटक, ईतरांचा शोध सुरु

  • 21 Sep 2021 08:53 AM (IST)

    चंद्रपूर घरकुलाच्या जागेसाठी '‘नागपूर पॅटर्न' वापरणार 

    चंद्रपूर -

    घरकुलाच्या जागेसाठी '‘नागपूर पॅटर्न' वापरणार

    त्यानुसार घरकुलासंदर्भात आलेल्या प्रस्तावांना त्वरीत निकाली काढून गरजूंना घरकुलाचा लाभ द्यावा,

    असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात घरकुल योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते.

  • 21 Sep 2021 08:39 AM (IST)

    दागिन्यांच्या हव्यासापोटी सासूचा काटा काढला, 12 तासांत सूनेला अटक

    बुलडाणा

    दागिन्यांच्या हव्यासापोटी सासूचा चुलत काढला काटा,

    अवघ्या 12 तासांत आरोपी सुनेला केली अटक,

    बीबी पोलिसांची कारवाई,

    वृद्ध महिला कासाबाई चौधरी हिचा आरोपीने केला होता गळा दाबून खून,

    आरोपी नंदाबाई चौधरी हिने दाबला होता गळा,

    आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल

  • 21 Sep 2021 08:38 AM (IST)

    औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली

    औरंगाबाद -

    ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली

    नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वीकारला पदभार..

    गणेशोत्सव पार पडताच निमित गोयल यांनी स्वीकारला पदभार..

    नवे पोलीस अधीक्षक म्हणून निमित गोयल यांनी स्वीकारला चार्ज

  • 21 Sep 2021 08:37 AM (IST)

    सोलापूर शहरातील गाळ्यांची सात दिवसात थकबाकी न भरल्यास होणार कारवाई

    सोलापूर -

    सोलापूर शहरातील गाळ्यांची सात दिवसात थकबाकी न भरल्यास होणार कारवाई

    शहरातील मेजर आणि मिनीगाळे भाडेतत्त्वावर घेतलेल्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात आहे थकबाकी

    महानगरपालिकेने थकबाकी संदर्भात बजावली नोटीस

    सात दिवसाच्या आत थकबाकी भरण्याचा इशारा

    अन्यथा कारवाई होणार

    पालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा इशारा

  • 21 Sep 2021 08:23 AM (IST)

    कोरोना नियमांचे पालन करत रविवारी होणार सेटची ऑफलाईन परीक्षा

    सोलापूर -

    कोरोना नियमांचे पालन करत रविवारी होणार सेटची ऑफलाईन परीक्षा

    शहरातील 12 केंद्रावर पाच हजार 400 उमेदवार देणार परीक्षा

    एका बेंचवर दोन उमेदवारांना  बसण्याची परवानगी

    पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणार परीक्षा

  • 21 Sep 2021 08:22 AM (IST)

    सिंहगड रस्त्यावर उभारणार नवा उड्डाणपूल

    - सिंहगड रस्त्यावर उभारणार नवा उड्डाणपूल

    - राजाराम पूल ते फन टाइम थिएटर पर्यंत असणार उड्डाणपूल

    - 2.6 किलोमीटर लांबीचा असणार उड्डाणपूल

    - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

    - पालकमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोर्हे राहणार उपस्थित

    - महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

    - पुण्यातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी उभारणार उड्डाणपूल

    - 24 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

  • 21 Sep 2021 08:21 AM (IST)

    सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आजपासून ठरविण्याची प्रक्रिया सुरु

    सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आजपासून ठरविण्याची प्रक्रिया सुरु

    संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दूध संस्थांचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू

    2021 ते 22 ते 26-27 या कालावधीसाठी निवडायचे आहे संचालक मंडळ

    सध्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर 8 मार्च 2021 पासून आहे प्रशासकीय मंडळ

    प्रशासकीय मंडळाला मंडळाला केवळ सहा महिन्यांची असलेली मुदत आठ सप्टेंबर रोजी झाली आहे पूर्ण

    त्यामुळे जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू

    जिल्ह्यात असलेल्या 754 दूध  संस्थांच्या आलेल्या ठरावातील व्यक्तींना मतदानाचा अधिकार

  • 21 Sep 2021 07:54 AM (IST)

    पुणे शहरात घरांच्या विक्रीत 8% इतकी वाढ

    पुणे -

    - शहरात घरांच्या विक्रीत 8% इतकी वाढ

    - यामध्ये घरांच्या विक्रीमूल्यात तब्बल 27% वाढ पहायला मिळाली

    - जानेवारी-जुलै 2021 मध्ये 53 हजार घरांची विक्री

    - तर जानेवारी-जुलै 2021 मध्ये 27 हजार 500 कोटी रुपये किंमतीच्या घरांची विक्री

    - क्रेडाई पुणे मेट्रोच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुणे हाऊसिंग रिपोर्टमध्ये ही माहिती समोर

  • 21 Sep 2021 07:47 AM (IST)

    पुण्यात महिनाभराच्या खंडानंतर कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा शंभराच्या आत

    पुणे -

    - महिनाभराच्या खंडानंतर कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा शंभराच्या आत

    - शहरात काल दिवसभरात ८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

    - याउलट २३७ जण कोरोनामुक्त झालेत,

    - तर शहरातील तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला,

    - आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या आज पाच लाखांच्या घरात पोचली आहे

  • 21 Sep 2021 07:47 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात आज महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम

    - नागपूर जिल्ह्यात आज महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम

    - तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमिवर महत्त्वपूर्ण निर्णय

    - नागपूर शहरात महानगरपालिकेच्या १५५ केंद्रांवर लसीकरणाची सोय

    - ग्रामिण भागातंही महिलांसाठी लसीकरण मोहिम

    - जास्तीत जास्त महिलांच्या लसीकरणाचा उद्देश

    - नागपूर जिल्हयात आतापर्यंत १६ लाख ४३ हजार महिलांचं झालं लसीकरण

    - आजच्या विशेष मोहिमेत सर्व स्तरातील महिलांच्या लसीकरणाचं उद्दीष्ट

  • 21 Sep 2021 07:46 AM (IST)

    कोल्हापुरातील सिपीआर रुग्णालयाला मिळणार आठ कोटींची यंत्रसामग्री

    कोल्हापूर

    सिपीआर रुग्णालयाला मिळणार आठ कोटींची यंत्रसामग्री

    खरेदी प्रक्रियेला राज्य शासनाची मान्यता

    कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी

    सीपीआर रुग्णालयात लहान मुलांसाठी उपलब्ध होणार 25 व्हेंटिलेटर

    तर म्युकरमायक्रोसिस उपचारासाठी ही येणार अत्याधुनिक सामग्री

  • 21 Sep 2021 07:46 AM (IST)

    ‘प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा’, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव

    - ‘प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा’

    - नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव

    - ‘मंत्री सुनील केदार यांची बदनामी केल्यामुळे आशिष देशमुखांच्या हकालपट्टीची मागणी’

    - जिल्हा परिषद पोटणीवडणूकीबाबत झालेल्या बैठकीत ठराव

    - निलंबीत गज्जू यादव यांना सोबत घेऊन फिरणाऱ्या पालकमंत्र्यांवरंही नाराजी

  • 21 Sep 2021 07:33 AM (IST)

    स्मार्ट सिटी प्रशासन आणि नाशिक महापालिकेची आज संयुक्त बैठक

    नाशिक -

    स्मार्ट सिटी प्रशासन आणि महापालिकेची आज संयुक्त बैठक

    शहरातील कामांबाबत नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने आज बैठकीचा निर्णय

    रस्त्यावरील खोदलेले रस्ते, गोदाघाटावरील कामांबाबत नगरसेवकांनी केल्या तक्रारी

    स्मार्ट सिटी चे सर्व अधिकारी,महापौर आयुक्त आणि नगरसेवक राहणार उपस्थित आज ची बैठक वादळी ठरण्याची शक्यता

  • 21 Sep 2021 07:33 AM (IST)

    नागपुरात 21 दिवसानंतरंही ‘सिरो’ सर्वेक्षणाची कीट नाही

    - नागपुरात 21 दिवसानंतरंही ‘सिरो’ सर्वेक्षणाची कीट नाही

    - कीट नसल्याने नागपुरात थांबलं सिरो सर्वेक्षण

    - 31 ॲागस्टला नागपुरात सुरु होणार होतं सिरो सर्वेक्षण

    - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भितीनं सिरो सर्वेक्षण लवकर करण्याचा प्रयत्न

    - नागपूरलाच सिरो सर्वेक्षणासाठी कीट का मिळत नाही?

    - आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ उपस्थित करत आहेत सवाल

  • 21 Sep 2021 07:22 AM (IST)

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न दडविल्याचा आरोप

    - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न दडविल्याचा आरोप

    - नागपूर, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकातामध्ये 30 ठिकाणी IT ने टाकले होते छापे

    - प्राप्तीकर विभागाच्या 17 सप्टेंबरच्या छाप्यांमध्ये महत्त्वाची कागदपत्रं जप्त

    - धाडसत्रात सापडलेल्या पुराव्यांवरून अनिल देशमुख यांनी 17 कोटींचं उत्पन्न दडवल्याचा आरोप

    - प्राप्तीकर विभागाने नागपूर, मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकातामध्ये 30 ठिकाणी टाकल्या होत्या धाडी

    - अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

  • 21 Sep 2021 07:22 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू तर एक बचावला

    नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू तर एक बचावला

    खिंडशी तलावात मासेमारी करत असताना बोट च्या बाजूला वीज पडली

    यात बोट मध्ये असलेला एक मच्छीमार बुडाला , तर एक बचावला

    बुडालेल्या मच्छिमारच नाव जटाशंकर नागपूर ,तर बचावलेल्या व्यक्तीच विष्णू नागपूर अस नाव

    दोन्ही भाऊ असून ते रोज मच्छीमारी साठी या तलावात जातात

    मात्र काल त्यांचा वीज पडल्याने घात झाला

  • 21 Sep 2021 07:21 AM (IST)

    प्रवक्ते शोधण्यासाठी युवक काँग्रेस घेणार वक्तृत्त्व स्पर्धा

    - प्रवक्ते शोधण्यासाठी युवक काँग्रेस घेणार वक्तृत्त्व स्पर्धा

    - जिल्हा आणि राज्य पातळीवर काँग्रेसची वक्तृत्त्व स्पर्धा

    - भाजपचा सामना करण्यासाठी प्रवक्त्यांची फळी तयार करणार काँग्रेस

    - प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांची माहिती

    - एक ॲाक्टोबरपासून स्पर्धेसाठी नाव नोंदणी होणार सुरु

  • 21 Sep 2021 07:21 AM (IST)

    मनसे नेते आज पासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

    नाशिक -

    मनसे नेते आज पासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

    आज मनसे नेते अमित ठाकरे नाशिकमध्ये

    तर उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे,बाळा नांदगावकर,अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर नाशिकमध्ये

    राज ठाकरेंच्या हस्ते उद्या शाखाध्यक्षांची नियुक्ती होणार

    गुरुवारी नाशिकमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना करणार संबोधित

    नाशिक महापालिका निवडणुकांची धुरा अमित ठाकरेंकडे सोपवल्या नंतर राज यांचा पहिलाच दौरा

  • 21 Sep 2021 07:20 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या अनेक घटना

    - नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या अनेक घटना

    - नागपूरात आठ महिन्यात ५७ अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार

    - अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच ५६ गुन्ह्यांत गुन्हेगारांना बेड्या

    - आधी प्रेमाचं जाळं, मग लग्नाचं आमिष आणि नंतर बलात्कार

    - अल्पवयीन मुलीनां पळवून नेण्याचेही अनेक प्रकार

  • 21 Sep 2021 07:15 AM (IST)

    पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची बदली अखेर स्थगित

    नाशिक - पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची बदली अखेर स्थगित

    सचिन पाटील यांच्या बदलीला मुंबई उच्च न्यायालयाचे स्थगिती

    कार्यकाळ पूर्ण नसताना झालेल्या बदलीला शेतकऱ्यांनी केला होता विरोध

    सप्टेंबर 2020 मध्ये पाटील यांनी घेतला होता चार्ज

    बदली विरोधात पाटील यांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव

  • 21 Sep 2021 07:15 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या अनेक घटना

    - नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या अनेक घटना

    - नागपूरात आठ महिन्यात ५७ अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार

    - अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच ५६ गुन्ह्यांत गुन्हेगारांना बेड्या

    - आधी प्रेमाचं जाळं, मग लग्नाचं आमिष आणि नंतर बलात्कार

    - अल्पवयीन मुलीनां पळवून नेण्याचेही अनेक प्रकार

  • 21 Sep 2021 07:14 AM (IST)

    आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा प्रयागराज येथे संशयास्पद मृत्यू

    नाशिक -

    आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा प्रयागराज येथे संशयास्पद मृत्यू

    अलाहाबादच्या गद्दी मठाच्या खोलीत आढळला मृतदेह

    गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

    सुसाईड नोटमध्ये मानसिक छळ होत असल्याचा आरोप

    त्रंबकेश्वर मध्ये 2015-16 च्या कुंभमेळ्यात झाली होती अध्यक्षपदी नियुक्ती

    नरेंद्र गिरी यांचे शिष्य महंत आनंद गिरी ताब्यात

    प्रकरणाची चौकशी सुरू

  • 21 Sep 2021 07:13 AM (IST)

    बँकेच्या विरोधात तरुणाने बँड वाजवत स्वतःचे डोके फोडून घेत केले आंदोलन

    औरंगाबाद -

    बँकेच्या विरोधात तरुणाने बँड वाजवत स्वतःचे डोके फोडून घेत केले आंदोलन

    औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील घटना

    मंगेश साबळे असं डोकं फोडून घेत आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव

    बँकेकडून शेतकऱ्याचा छळ होत असल्यामुळे केलं तीव्र आंदोलन

    बँकेच्या समोर बँड वाजवून डोक्यात दगड मारत फोडून घेतले डोके

    तरुणाने डोके फोडून घेतल्यानंतर तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    तरुणाला ताब्यात घेताना पोलीस आणि तरुणात झाली झटपट

  • 21 Sep 2021 06:50 AM (IST)

    दफ्तरी बियाणे कंपनीने केली भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक

    भंडारा

    - दफ्तरी बियाणे कंपनीने केली भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक

    - १००८ वाणाचा बियाणे १४५ दिवसात निघणारा धानाचा पिक निघाला ९० दिवसात, तोही अर्धवट

    - शेतकऱ्यांच्या शेतात जास्त कालावधीत निघणार धान लागवत करावा लागतो. पण आता धाणाचा पिक लवकर निघाल्याने कंपनीच्या बोगस सिड मुळे  शेतकऱ्यांना बसला फटाका.

    - शेतकऱ्यांना उत्पन्नात होणार घट.

    - कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार.कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी.

  • 21 Sep 2021 06:44 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

    औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

    नदी नाल्यांना आला महापूर

    तर राष्ट्यावरूनही वाहिले पुरासारखे पाणी

    अनेक ठिकाणी गावात आणि घरातही घुसले पाणी

    सोयगाव तालुक्यला तब्बल दोन तास पावसाने झोडपले

    अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Published On - Sep 21,2021 6:34 AM

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.