Maharashtra News LIVE Update | गोरेगावात बिबट्याचा महिलेवर हल्ला, बिबट्याचा पंधरा दिवसात सहावा हल्ला

| Updated on: Sep 29, 2021 | 11:58 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | गोरेगावात बिबट्याचा महिलेवर हल्ला, बिबट्याचा पंधरा दिवसात सहावा हल्ला
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Sep 2021 09:58 PM (IST)

    गोरेगावात बिबट्याचा महिलेवर हल्ला, बिबट्याचा पंधरा दिवसात सहावा हल्ला

    आरेत बिबट्याची दहशत

    आरे कॉलनीत बिबट्याच्या महिलेवर हल्ला

    बिबट्याचा पंधरा दिवसात सहावा हल्ला

    मुंबईच्या गोरेगाव आरे कॉलनी मध्ये CEO च्या कार्यालयाबाहेर एक महिलेवर बिबट्याने हल्ला केलाय

    स्थानिकांच्या मदतीने जखमी महिलेला जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे

    गेल्या पंधरा दिवसांपासून आरे कॉलनी मध्ये 5 पेक्षा जास्त लोकांवर बिबट्यान हल्ला केला आहे

    बिबट्याचा हल्ला सतत सुरू असल्यामुळे आरे परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

    वन विभागाचे अधिकारी बिबट्याच्या ट्रॅप करण्यासाठी शोध घेत आहे

  • 29 Sep 2021 08:53 PM (IST)

    राज्य सरकारने महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांना पाठवला

    महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग पद्धत असणार

    अखेरीस अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला

    महापालिकेत तीन सदस्य

    नगरपालिकेत दोन तर नगर पंचायतीत एक सदस्य

    याबाबतचा अध्यादेश आज जारी करण्यात आला

    अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला

    अध्यादेशावर राज्यपाल स्वाक्षरी करणार का याकडे आता लक्ष

    महापालिकेत दोन सदस्यीय प्रभाग असावा अशी मागणी कोंग्रेस आणि राष्ट्रवादीची होती

    कालच्या कॅबिनेट बैठकीत ह्यात चर्चा झाली त्यानंतर तीन सदस्यीय प्रभागवरच शिक्कामोर्तब झाले होते

    आता त्याचा अध्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आला

  • 29 Sep 2021 08:51 PM (IST)

    राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : मुख्यमंत्री

    राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई केली जाईल या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले. आज वर्षा येथे काही राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांमधील पडलेल्या खड्ड्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपूर्ण आढावा घेण्यात आला.

    रस्ते दुरुस्तीच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञानाचा कटाक्षाने वापर करावा तसेच जास्त पावसाच्या भागात डांबरीकरणाएवजी काँक्रीटमधले रस्ते बांधण्यावर भर द्यावा असेही ते म्हणाले. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते

  • 29 Sep 2021 07:40 PM (IST)

    नागपुरला मोठा दिलासा, जिल्ह्यात दिवसभरात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण नाही

    नागपूरला आज मोठा दिलासा,  जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांनाची संख्या शून्य

    शून्य मृत्यू , तर 11 जणांनी केली कोरोनावर मात

    आज जिल्ह्यातील चाचण्या - 4,394

    ऐकून रुग्ण संख्या - 493288

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 483098

    एकूण मृत्यू संख्या 10120

  • 29 Sep 2021 07:38 PM (IST)

    नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीत आरटीओ कार्यालयाजवळ हत्या

    नागपूर :

    नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीत आरटीओ कार्यालयाजवळ हत्या

    आकाश मोरे नावाच्या युवकाची भर दिवसा झाली हत्या

    हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही

    मात्र हत्तेच्या घटनेने चांगलीच खळबळ

    वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल

  • 29 Sep 2021 06:40 PM (IST)

    मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्कसमोर गोळीबार, बाईकवरुन आलेल्या दोघांकडून फायरिंग

    मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्कसमोर गोळीबार, बाईकवरुन आलेल्या दोघांकडून गोळीबार, पोलीस घटनास्थळी दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरु, परिसरात भीतीचे वातावरण

  • 29 Sep 2021 06:32 PM (IST)

    कॅप्टन अमरिंदरसिंग गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला, पंजाबच्या राजकारणात नवा ट्विस्ट

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. यामुळं पंजाबच्या राजकारणात मोठ्या घडामोडी येत्या काळात घडण्याची शक्यता आहे.

  • 29 Sep 2021 06:23 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 189 नवे कोरोनाबाधित, 141 जणांना डिस्चार्ज

    पुणे :  दिवसभरात १८९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १४१ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. - १८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५००८४१. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४४२. - एकूण मृत्यू -९०२७. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९०३७२. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८२३७.

  • 29 Sep 2021 06:22 PM (IST)

    कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहा यांच्या भेटीला, पंजाबच्या राजकारणातील मोठी बातमी

    नवी दिल्ली :

    पंजाबच्या राजकारणातील मोठी बातमी

    कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहा यांच्या भेटीला

    नवी दिल्ली येथील अमित शहा यांच्या निवासस्थानी भेट

    कॅप्टन अमरिंदरसिंग पंजाबचे माजी मुख्यमंत्री

    अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

    अमित शहा आणि सिंग यांच्यात चर्चा सुरू

  • 29 Sep 2021 05:28 PM (IST)

    काँगेस खासदार रजनी पाटील यांचा अतिवृष्टी दौरा, केज तालुक्यातील नायगाव येथे पाहणी

    बीड: काँगेस खासदार रजनी पाटील यांचा अतिवृष्टी दौरा

    केज तालुक्यातील नायगाव येथे केली पाहणी

    बिनविरोध खासदार झाल्यानंतर पाटील पहिल्यांदाच जिल्ह्यात

    तात्काळ पंचनामा करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश

    महिलांशी साधला संवाद

    लवकरच मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन

  • 29 Sep 2021 04:26 PM (IST)

    ...तर तुमची दिवाळी सुखात साजरी करु देणार नाही, खासदार नवनीत राणांचा राज्य सरकारला इशारा

    खासदार नवनीत राणा यांचा राज्य सरकारला इशारा, प्रती हेक्टरी 30 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल, तर तुमची दिवाळी सुखात साजरी करु देणार नाही, असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या. मुख्यमंत्री आरोमात मातोश्रीत, शेतकरी मात्र त्रस्त, नवनीत राणांचा घणाघात

  • 29 Sep 2021 04:16 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात प्रचंड पाऊस, शेतीचं प्रचंड नुकसान, पंचनाम्याचे आदेश देण्यात आले : छगन भुजबळ

    नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    काल रात्रीपासून मी सर्व सरकारी आणि निमसरकारी यंत्रणेच्या संपर्कात आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागात प्रचंड पाऊस पडत आहे. गोदावरी नदीत 10 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आलं आहे. सर्व यंत्रणा याकडे लक्ष ठेवून आहे. रात्री लासलगाव, येवल्यात प्रचंड पाऊस पडला. रुग्णालयामध्ये रुग्ण, डॉक्टर, पारिचारिक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. दुकानांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात मुष्यहाणी झाल्याची बातमी नाही. पण चार-पाच जनावरांच्या मृत्यूची बातमी आहे. नुकसाण भरपाईसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण पावसामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचे प्रशानपुढे आव्हान आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. पुढचे दोन दिवस खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे

  • 29 Sep 2021 03:28 PM (IST)

    पावसामुळे 436 नागरिकांनी जीव गमावला, 196 जणांचे वीज पडून मृत्यू : विजय वडेट्टीवार

    विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

    गुलाब चक्रीवादळ आल्याने राज्यात अनेक भागात पाणी साचले.

    धरणे ओव्हरफ्लो झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे

    २२ लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त

    मराठवाड्यात ४५२ पैकी 381 महसूल क्षेत्रात अतिवृष्टी, त्यातील १२७ असे क्षेत्र जिथे ४-४ ते ८ वेळा अतिवृष्टी हे प्रचंड नुकसान आहे.

    शेतीचं वीजपंप वाहून गेलेत, ८१ टक्के पंचनामे पूर्ण झालेत

    रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले आहेत.

  • 29 Sep 2021 03:23 PM (IST)

    Vijay Wadettiwar live : राज्यात वीज पडून 196 जणांचा मृत्यू

    पावसामुळे राज्यात प्रचंड शेती आणि मालमत्तेचं नुकसान झालं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जनावरं वाहून गेल्याच्या आणि मृत्यूच्या घटना घडल्या. यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यांमध्ये 180 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अजूनही 436 पैकी 6 मृतदेह मिळालेले नाहीत. तसेच 136 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

    विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

    १० पैकी 7 जिल्ह्यात 180 टक्क्यांपर्यंत पाऊस पडला वीज पडून 196 जणांचा मृत्यू

    या पावसाळ्यात ४३६ लोकांचा मृत्यू झालाय

    गुलाब चक्रीवादळ आल्याने राज्यात अनेक भागात पाणी साचले.

    धरणे ओव्हरफ्लो झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे

    २२ लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त मराठवाड्यात ४५२ पैकी 381 महसूल क्षेत्रात अतिवृष्टी, त्यातील १२७ असे क्षेत्र जिथे ४-४ ते ८ वेळा अतिवृष्टी हे प्रचंड नुकसान आहे. शेतीचं वीजपंप वाहून गेलेत, ८१ टक्के पंचनामे पूर्ण झालेत रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले आहेत.

  • 29 Sep 2021 03:16 PM (IST)

    कोट्यावधी खर्च झालेल्या रस्त्याची दुरावस्था पाहून मनसे आमदार राजू पाटील संतापले

    कल्याणमध्ये रस्त्याची पाहणी दरम्यान मनसे आमदार राजू पाटील चांगलेच संतापले. रस्त्याची दुरवस्था बघून पाटील यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. सत्ताधारी वाघाच्या वाटा खात आहे.कल्याण-डोंबिवलीची वाट लावून ठेवली आहे. जर काही असेल तर पालकमंत्र्यांनी रस्त्याची पाहणी करावी असा आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांना केले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या अभियंता सह कल्याण मलंग गड रस्त्याची पाहणी केली.

  • 29 Sep 2021 02:26 PM (IST)

    मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका : मुख्यमंत्री

    मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका

    तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

    बचाव व मदत कार्याचा मुख्यमंत्र्यानी घेतला जिल्हानिहाय आढावा

  • 29 Sep 2021 12:56 PM (IST)

    Nashik Rain and weather update | गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

    - गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

    - दुतोंडया मारुतीच्या लागलं मानेला पाणी

    - रामसेतू ब्रिजला ही लागलं पाणी

    - सराफ बाजार ही पाण्याखाली जाण्याची शक्यता

    - व्यावसायिकांची उडाली धावपळ

    - दुकान हटवण्याची धावपळ सुरू

    - प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना

    - गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार

  • 29 Sep 2021 12:53 PM (IST)

    जळगाव गिरणा नदीवरील गिरणा धरण 90 टक्के भरले

    जळगाव

    जळगाव गिरणा नदीवरील गिरणा धरण 90 टक्के भरले

    धरण क्षेत्रात पुराचे पाणी वाढल्याने धरणाच्या जलसाठ्यात वाढ

    गिरणा धरणातून 25 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग

    नदी काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा ईशारा

  • 29 Sep 2021 11:39 AM (IST)

    जायकवाडी धरणाचे 4 दरवाजे उघडले, राजेश टोपे म्हणतात, नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क राहा

    जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे.धरणाचा जलसाठा 95% झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी,पुर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जिवीत हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं ट्वीट राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.

    गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळुन गावकऱ्यांची काळजी घ्यवी. कुठलीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना सतर्क राहून त्याबाबतच्या उपाययोजना त्वरेने करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

  • 29 Sep 2021 10:51 AM (IST)

    भिंत खचली, चूल विझलीः नाशिक जिल्ह्यात हाहाकार, दोघांचा बुडून मृत्यू; 3 हजार हेक्टरवरले पीक आडवे

  • 29 Sep 2021 10:51 AM (IST)

    Aurangabada Rains and Weather Update | जायकवाडी धरणातून थोड्याच वेळात सोडले जाणार पाणी

    औरंगाबाद -

    जायकवाडी धरणातून थोड्याच वेळात सोडले जाणार पाणी

    दरवाजे अर्धा फुटाणे उघडून सोडणार पाणी

    जवळपास 10 हजार क्यूसेक्स वेगाने सोडले जाणार पाणी

    गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

    जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित

    सध्या जायकवाडी धरणात 1 लाख 10 हजार क्यूसेक्स ने आवक सुरू

  • 29 Sep 2021 10:49 AM (IST)

    Latur Rains and Weather Update | भातखेडच्या पुला जवळून पाणी वाहू लागल्याने वाहतुकीसाठी पूल बंद

    लातूर -

    भातखेडच्या पुला जवळून पाणी वाहू लागल्याने वाहतुकीसाठी पूल बंद

    नांदेडकडून लातूरकडे येणारी वाहतूक काही वेळांसाठी बंद करण्यात आली आहे

    वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा, खबरदारी म्हणून केला भातखेडचा मांजरा नदी वरील पूल बंद, सीईटी ची परीक्षा द्यायला लातुरला निघालेले काही विद्यार्थी बसमध्ये अडकले

  • 29 Sep 2021 10:48 AM (IST)

    Yavatmal Rains and Weather Update | ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर

    यवतमाळ-

    ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे

    कयाधु नदीचे पाणी देखील पैनगंगेला मिळाले आहे

    त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे

  • 29 Sep 2021 10:47 AM (IST)

    Aurangabad Rains and Weather Update| औरंगाबादेत वळदगाव परिसरात खामनदी पुलावरुन दुचाकीस्वार कामगार गेला वाहून

    औरंगाबाद -

    वळदगाव परिसरात खामनदी पुलावरुन दुचाकीस्वार कामगार गेला वाहून

    खाम नदीच्या प्रवाहात गेला कामगार वाहून

    प्रवहात वाहून गेलेल्या कामगाराचा शोध सुरू

    आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली घटना

    सदरचा कामगार हा रात्री कंपनीतून काम करून सकाळी घराकडे परतत असताना घडला प्रकार

    नदी पत्रात कामगाराचा शोध सुरू

  • 29 Sep 2021 10:46 AM (IST)

    Nashik Rains and Weather Update | गोदावरीने केले रौद्र रुप धारण, गोदा काठच्या दुकानांना पाण्याचा वेढा

    - गोदावरीने केले रौद्र रूप धारण

    - गोदा काठच्या दुकानांना पाण्याचा वेढा

    - रामकुंड परिसरातील सर्व मंदिर पाण्याखाली

    - हळूहळू वाढतिये पाण्याची पातळी

  • 29 Sep 2021 08:42 AM (IST)

    Palghar Rains and Weather Update | पालघर जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार कायम

    पालघर जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार कायम असून धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पालघर ,  मनोर , बोईसर ,  डहाणू , तलासरी भागात रात्रभर मुसळधार तर रिमझिम असा पाऊस सुरू आहे.

  • 29 Sep 2021 08:41 AM (IST)

    Latur Rains and Weather Update | 24 तासात लातूर जिल्ह्यात 66.09 मिमी पाऊस

    लातूर -

    24 तासात लातूर जिल्ह्यात 66.09 मिमी पाऊस

    आतापर्यंत जिल्ह्यात 906 मिमी पाऊस

    वार्षिक सरासरीच्या 114 टक्के पाऊस

    लातूर तालुक्यात 82 उदगीर 67 अहमदपूर ते 83 चाकूर 72 जळकोट 75 निलंगा 48 तर देवणी तालुक्यात 46 मिमी पाऊस

  • 29 Sep 2021 08:40 AM (IST)

    Nandurbar Rains and Weather Update | नवापूर तालुक्यात रात्र भर सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित

    नंदुरबार -

    नवापूर तालुक्यात रात्र भर सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित

    नवापूर शहरातून जाणाऱ्या रंगवली नदीला पूर

    नदी काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा

    नवापूर शहराचा पाणी प्रश्न सुटणार

  • 29 Sep 2021 08:39 AM (IST)

    पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

    पुणे

    पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर,

    30 सदस्यदासाठी होणार नियोजन समितीची निवडणूक,

    आजपासून अर्ज दाखल करायला सुरुवात, 10 तारखेला होणार मतदान तर 12 तारखेला मतमोजणी,

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केला निवडणूक कार्यक्रम जाहीर ...

    पुणे , पिंपरी चिंचवड महापालिकेतून 22 नगरसेवक, नगरपरिषद क्षेत्रातून 1 तर ग्रामपंचायत सरपंचामधून 7 सदस्य

    अशा 30 सदस्यपदासाठी होणार निवडणूक

  • 29 Sep 2021 08:39 AM (IST)

    मांजरा नदीचा पूर वाढला

    लातूर -

    मांजरा नदीचा पूर वाढला

    महापूर येथील पुलाला खेटून वाहते आहे पाणी

    मांजरा नदी काठची शेकडो एकर शेती पाण्याखाली

  • 29 Sep 2021 08:16 AM (IST)

    Nandurbar Rains and Weather Update | नंदुरबार जिल्ह्यात रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरु

    नंदुरबार -

    जिल्ह्यात रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरु

    शहादा शहरातील नवीन वसाहती आणि वनविभाग कार्यालय पोलीस स्टेशनमध्ये पाणी

    वन विभागाच्या कर्मचारी वसाहतीत पाणी शिरले

    ब्रहानपूर अंकलेश्र्वर महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित

  • 29 Sep 2021 08:01 AM (IST)

    Aurangabad Rains and Weather Update | औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान

    औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान

    औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर परिसरात पपई आणि टोमॅटो बागांचे नुकसान

    पपई आणि टोमॅटोचा बगीचा पूर्णपणे उध्वस्त

    अजूनही टोमॅटो पपईच्या बागेत गुडघ्या इतका चिखल

    शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे नुकसान

  • 29 Sep 2021 06:59 AM (IST)

    नाशिक स्मार्ट सिटीच्या कामांवरुन महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं

    नाशिक स्मार्ट सिटीच्या कामांवरुन महापौरांनी धरलं अधिकाऱ्यांना धारेवर

    गोदावरी वरील फारशा वाहून गेल्याच्या घटनेवरून आयुक्त देखील आक्रमक

    अभ्यास न करता काम का केलं

    आयुक्तांचा स्मार्टसिटी अधिकाऱ्यांना सवाल

    झालेल्या कामाचा अहवाल आठवडा भरात सादर करा

    आयुक्तांचे स्मार्ट सिटी प्रशासनाला आदेश

  • 29 Sep 2021 06:58 AM (IST)

    Nashik Rains and Weather Update | नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

    नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

    रात्रभर झालेल्या पावसाने गोदावरीला पुन्हा पूर

    गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

    पाणी वाढल्याने गोदा घाटच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

    पुढे 24 तास पावसाचे असल्याचा वेधशाळेचा अंदाज

  • 29 Sep 2021 06:57 AM (IST)

    Beed Rains and Weather Update | बीडमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी पूल वाहून गेले

    बीड :

    पावसामुळे अनेक ठिकाणी पूल वाहून गेले

    जिल्ह्यातील अनेक खेड्यांचा संपर्क तुटलेलाच

    दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ

    माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील पूल वाहून गेला

    रस्सीच्या साह्याने दुधाच्या कॅडची ने आण

  • 29 Sep 2021 06:56 AM (IST)

    Marathwada Rains and Weather Update | मराठवाड्यात आठही जिल्ह्यात तब्बल सात दिवस अतिवृष्टी

    औरंगाबाद -

    मराठवाड्यात आठही जिल्ह्यात तब्बल सात दिवस झाली अतिवृष्टी

    अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील तब्बल 25 लाख हेक्टवरील पिके पाण्याखाली

    मराठवाड्यातील तब्बल 7 लाख शेतकऱ्यांवर कोसळले अस्मानी संकट

    25 लाख हेक्टरवर जवळपास 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान

    अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी

    शेतीला आले तळ्याचे स्वरुप

    शेतातील पाण्याबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच पाणी

  • 29 Sep 2021 06:56 AM (IST)

    Vasai Rains and Weather Update | वसई-विरार नालासोपाऱ्यामध्ये रात्रभर रिमझिम पाऊस सुरु

    विरार -

    वसई-विरार नालासोपाऱ्यामध्ये रात्रभर रिमझिम पाऊस सुरु

    पहाटे पासून पावसाने आपली उसंत घेतली आहे

    पूर्ण परिसरात आभाळ भरलेले असून आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे

    विरार पूर्व भागातील आज सकाळी 6.30 ची ही दृश्य आहेत

  • 29 Sep 2021 06:55 AM (IST)

    Aurangabad Rains and Weather Update | अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या ताह्न्या बाळासहित 12 नागरिकांना अखेर काढले बाहेर

    औरंगाबाद -

    अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या तहान्या बाळासहित 12 नागरिकांना अखेर काढले बाहेर

    गंगापूर तालुक्यातील शिरजगाव शिवना नदीच्या पाण्यात अडकले होते नागरिक

    कोबापूर गावाच्या शेत वस्तीवरील नागरिकांची सुटका

    पुराच्या पाण्यात अडकले होते लहान मोठ्यांसाहित 12 जण

    रात्री उशिरापर्यंत चालू होते बचाव कार्य

    जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

  • 29 Sep 2021 06:52 AM (IST)

    नागपुरातील काही महाविद्यालयांकडून 50 टक्के शुल्कमाफीला बगल

    - नागपुरातील काही महाविद्यालयांकडून 50 टक्के शुल्कमाफीला बगल

    - विद्यापीठाचा नियम धाब्यावर बसवत विद्यार्थांची आर्थिक लूट

    - करोनामुळे नागपूर विद्यापीठाने शिकवणी शुल्क वगळून इतर सर्व शुल्क माफ केलेय

    - नागपूरातील काही नामवंत महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारत त्यांची आर्थिक लूट करीत आहेत

    - विद्यार्थ्यांची लूट करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई कधी होणार?

    - संतप्त विद्यार्थ्यांचा पालकांना सवाल

  • 29 Sep 2021 06:51 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील कोराडीचे महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्सवात उघडणार

    - नागपूर जिल्ह्यातील कोराडीचे महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्सवात उघडणार

    - मंदिरात 7 ॲाक्टोबरपासून सुरु होणारा नवरात्रोत्सव साजरा होणार

    - 7 ॲाक्टोबरपासून कोराडी महालक्ष्मी मंदिरात दर्शन सुरु होणार

    - कोराडी संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

  • 29 Sep 2021 06:50 AM (IST)

    मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार इम्तियाज जलील आणि आमदार प्रशांत बंब यांची मागणी

    औरंगाबाद -

    मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा

    खासदार इम्तियाज जलील आणि आमदार प्रशांत बंब यांची मागणी

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून केली ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी

    अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे झाले अतोनात नुकसान

    फक्त पिकच नाही तर शेती सुद्धा खरवडून गेल्याचं चित्र

    त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

    आमदार प्रशांत बंब आणि खासदार इम्तियाज जलील यांनी पत्र लिहून केली मागणी

  • 29 Sep 2021 06:49 AM (IST)

    नागपूर जिल्हयात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये दुप्पटीने वाढ

    - नागपूर जिल्हयात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये दुप्पटीने वाढ

    - 25 दिवसांत 81 वर पोहोचले कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण

    - गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची भर

    - 24 तासांत 4718 चाचण्यांमधून 10 जण कोरोना पॅाझीटिव्ह

  • 29 Sep 2021 06:45 AM (IST)

    गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर आभाळ फाटले

    लातूर -

    गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर आभाळ फाटले

    तर  राज्यात पावसाचे 21 बळी

    गुलाबी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात दोन दिवस झाला होता मुसळधार पाऊस

    मराठवाड्यासह विदर्भ मुंबई कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात झाला होता मुसळधार पाऊस

    उस्मानाबादेत बचाव पथकाने बोटीवर हेलिकॉप्टरद्वारे ते तीस जणांची सुटका

    लातूर मधील मांजरा नदी काठावर अडकलेल्या 45 जणांची आपत्तीव्यवस्थापन टीमने केली सुटका

    बीड जिल्ह्यात 18 जणांची जिल्हा प्रशासनाने केली सुखरूप सुटका

  • 29 Sep 2021 06:44 AM (IST)

    नागपुरात मास्क न लावणाऱ्यांना वर्षभरात दीड कोटींचा दंड

    - नागपुरात मास्क न लावणाऱ्यांना वर्षभरात दीड कोटींचा दंड

    - मास्क घालणाऱ्यांवर वर्षभरात सर्वात जास्त कारवाई

    - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३५ हजार पेक्षा जास्त जणांवर कारवाई

    - महानगरपालिका प्रशासनाने दीड कोटींचा दंड केला वसूल

    - सार्वजनिक ठिकाणी कोवीड नियमांचं सर्रास उल्लंघन

Published On - Sep 29,2021 6:36 AM

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.