Maharashtra News Live Update : कर्जतमधील तरुणावर हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक

| Updated on: Aug 06, 2022 | 6:58 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : कर्जतमधील तरुणावर हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक
मोठी बातमी

आज शनिवार दिनांक 6 ऑगस्ट जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज देखील राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. आजपासून दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्येच मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच गेले काही दिवस राज्यातून अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्याच्या काही भागात रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. पावसाचे अपडेट्स देखील आपण जाणून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Aug 2022 06:58 PM (IST)

    नागपूर विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी झाल्या रूजू

    विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.

    प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.

  • 06 Aug 2022 02:36 PM (IST)

    कर्जतमधील तरुणावर हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक

    प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या तरुणावर गुरुवारी झाला होता हल्ला

    हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक

    अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

    घडलेल्या घटनेची चौकशी सुरू असल्याची पोलिसांकडून माहिती

    सनी पवार याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार

  • 06 Aug 2022 02:11 PM (IST)

    बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद

    युपीएच्या काळात अनेक महत्त्वाची कामं झाली - थोरात

    रोजगार,बालहक्क,अन्न सुरक्षा कायद्यांबाब महत्त्वाचे निर्णय घेतले - थोरात

    सध्या सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - थोरात

    दूध,दही यांच्यावरही कर लावला

    बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका

    सध्या देशात  लोकशाही राहते की नाही अशी परिस्थिती - थोरात

    काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचारधारा - थोरात

    आज विचारधारेलाच दिवस कठीण आले आहेत - थोरात

  • 06 Aug 2022 01:57 PM (IST)

    अडीच वर्ष जम्बो मंत्रिमंडळ पण काही उपयोग नाही, मंत्रिमंडळ विस्तारावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

    अडीच वर्ष जम्बो मंत्रिमंडळ पण काही उपयोग झाला नाही

    पूर्वीच्या मंत्रिमंडळाने जे काम केले नाही ते दोन मंत्री असलेलं सरकार करत आहे

    सरकारमध्ये केवळ दोनच मंत्री असले तरी घटनेची दखल तातडीने घेतली जाते

    मंत्रिमंडळ विस्तारावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

  • 06 Aug 2022 01:09 PM (IST)

    नितेश राणेंची पत्रकार परिषद लाईव्ह

    नितेश राणेंची पत्रकार परिषद लाईव्ह

  • 06 Aug 2022 01:07 PM (IST)

    नितेश राणेंची पत्रकार परिषद

    अमरावती कोल्हे प्रकरणासारखी घटना नगरच्या कर्जतमध्ये घडली

    भाजप आमदार नितेश राणेंचा आरोप

    मविआचं सरकार आता रहिलेलं नाही - नितेश राणे

    कर्जमधील पोलिसांकडून प्रकरण दाबण्यााचा प्रयत्न - नितेश राणे

    असे हल्ले वारंवार होत असतील तर आमचेही हात बांधलेले नाहीत - राणे

    हिंदूंचा अपमान आता सहन केला जाणार नाही - राणे

  • 06 Aug 2022 12:59 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कणकवली- वरवडे मार्गावरील वाहतूक ठप्प

    सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपले असून, कणकवली - बावशी गावात घर पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाणी साचल्याने कणकवली- वरवडे मार्गावरील वाहतूक ठप्प  झाली आहे. रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू  आहे.

  • 06 Aug 2022 12:41 PM (IST)

    अडीच वर्षांत महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंनी बुडवलं; नवनीत राणांचा हल्लाबोल

    अडीच वर्षांत महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंनी बुडवलं

    नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

    ठाकरेंनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला - राणा

    संजय राऊतांचा आवाज स्वतःच्या स्वार्थासाठी

    नवनीत राणांचा संजय राऊतांवरही निशाणा

  • 06 Aug 2022 12:14 PM (IST)

    चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; खैरेंच्या आरोपांना संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

    चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - संजय शिरसाट

    चंद्रकांत खैरेंच्या आरोपांना संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

    लोकांनी एकनाथ शिंदेंची भूमिका स्विकारली

    जनतेचा शिंदे यांच्यावर विश्वास - संजय शिससाट

  • 06 Aug 2022 12:09 PM (IST)

    मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव - अजित पवार

    मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव

    राज्य सरकारच्या निर्णयावर अजित पवारांचं टीकास्त्र

    मंत्रीमंडळाचा विस्तार करण गरजेचं - अजित पवार

  • 06 Aug 2022 11:55 AM (IST)

    अमित ठाकरे इगतपुरीत दाखल

    अमित ठाकरे इगतपुरीत दाखल

    अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत

    थोइयवच वेळात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

  • 06 Aug 2022 11:52 AM (IST)

    वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे उमेदवार शिंदे गटाने पळवले - चंद्रकांत खैरे

    चंद्रकांत खैरे यांनी वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाला मिळालेल्या विजयावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाला भरपूर रसद मिळाली, रसद वापरून शिंदे गटाने ग्रामपंचायतमध्ये विजय मिळवला. शिंदे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पळवले त्यामुळे त्यांचा विजय झाल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.

  • 06 Aug 2022 11:35 AM (IST)

    ईडीच्या कारवाया केवळ शिवसेनेवरच झाल्या असं नाही, संजय राऊत प्रकरणावर दानवेंची प्रतिक्रिया

    ईडीच्या कारवाया शिवसेनेवरच झाल्या असं नाही

    काँग्रेसच्या काळात काँग्रेस नेत्यांच्याही चौकशा सुरू होत्या

    आमच्या लोकांवर कारवाई झाली तेव्हा आम्ही कायद्याने लढलो

    मात्र शिवसेनेतील लोक तोंडाने लढतात

    ईडीची कारवाई कायद्याने झाली असून, त्यामागे राजकारण नाही

    संजय राऊत प्रकरणावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

  • 06 Aug 2022 11:09 AM (IST)

    संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - सुनिल राऊत

    गोरेगाव पत्राचाळ प्रकरण

    संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - सुनिल राऊत

    संजय राऊत बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक  - सुनिल राऊत

    संजय राऊत भ्रष्टाचार करणे शक्य नाही - सुनिल राऊत

  • 06 Aug 2022 10:44 AM (IST)

    धक्कादायक! भंडारा जिल्ह्यात महिलेवर सामूहिक अत्याचार, दोन संशयितांना अटक

    भंडारा जिल्ह्यात महिलेवर सामूहिक अत्याचार

    मदत करण्याच्या बहान्याने आरोपींचा महिलेवर अत्याचार

    दोन संशयित आरोपींना अटक, एक फरार

    नागपुरातील एका रुग्णालयात पीडितेवर सुरू आहे उपचार

  • 06 Aug 2022 10:27 AM (IST)

    संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत इडी चौकशीसाठी रवाना

    संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत इडी चौकशीसाठी रवाना

    वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता

    ईडीचे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स

    वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे.

    आज ईडी करणार चौकशी

  • 06 Aug 2022 09:52 AM (IST)

    केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार यांचा कोकण दौरा लांबणीवर

    केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार यांचा कोकण दौरा लांबणीवर

    7  ऑगस्टपासून अजयकुमार होते रत्नागिरी, सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर

    मात्र दौऱ्याला तुर्तास स्थगिती

    आता दहा ऑगस्टपासून केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याला सुरुवात

  • 06 Aug 2022 09:39 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्ल्यूची साथ, गेल्या आठ दिवसांत 14 रुग्णांची नोंद

    पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्ल्यूची साथ आल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 14 जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली आहे. तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, योग्य ते खबरदारीचे उपाय राबवण्यास सुरुवात झाली आहे.

  • 06 Aug 2022 09:04 AM (IST)

    फडणवीस, शिंदेंचा दिल्ली दौरा

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यातून मुंबई इयरपोर्टकडे रवाना

    फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंसह दोन दिवसांचा दिल्ली दौरा

    राज्यपाला भगतसिंह कोश्यारिही जाणार दिल्लीला

  • 06 Aug 2022 08:51 AM (IST)

    संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी

    संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी

    वर्षा राऊत आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार

    सकाळी 11 वाजता वर्षा राऊत बेलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात पोहोचणार

    ईडीने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स

    माधुरी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यामधील बँक व्यवहारांबाबत चौकशी

  • 06 Aug 2022 08:33 AM (IST)

    धुळे शहरामध्ये गोळीबारात तरुणाचा मृत्यू

    धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कुमार नगर परिसरात करण्यात आलेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे. चिनू उर्फ चंदन राजेंद्र पोपली असे मृत तरुणाचे नाव आहे. आर्थिक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

  • 06 Aug 2022 08:06 AM (IST)

    दिलासादायक बातमी! राज्यातील मंकीपॉक्सचे 17 संशयित निगेटिव्ह

    राज्यातील मंकीपॉक्सचे 17 संशयित निगेटिव्ह

    एन.आय व्ही. पुणे, कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी

    तपासणीनंतर सर्व नमुने निगेटिव्ह असल्याची नोंद

  • 06 Aug 2022 08:00 AM (IST)

    पश्चिम विदर्भातल्या 27 मध्यम प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प ओव्हरफ्लो

    पश्चिम विदर्भातल्या 27 मध्यम प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प ओव्हरफ्लो

    तर दोन प्रकल्पांमध्ये 95 टक्क्यांच्यावर जलसाठा

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण 87 टक्के भरले

    पश्‍चिम विदर्भात अकोला ,अमरावती यवतमाळ, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात एकूण 27 लघुप्रकल्प

  • 06 Aug 2022 07:47 AM (IST)

    नागपुरात स्वाईन फ्लूचा कहर, 75 रुग्णांची नोंद; 5 जणांचा मृत्यू

    नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूची दहशत वाढली असून, आतापर्यंत  75 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 46 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे.  एकीकडे कोरोनाचं संकट कमी झालं नसताना दुसरीकडे आता जिल्ह्यात स्वाईन फ्लूची साथ आल्याने नागपूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

  • 06 Aug 2022 07:23 AM (IST)

    उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

    उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

    सकाळी नऊ वाजल्यापासून होणार मतदानाला सुरुवात

    एनडीएकडून जगदीप धनखड आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा या उमेदवार

    राष्ट्रपतीपदासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा यांना पाठिंबा

Published On - Aug 06,2022 7:17 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.