Maharashtra Budget 2022: अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांच्या विकासासाठी काय तरतूद?

महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असून यात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीनुसार तो सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या तसेच आरोग्य यंत्रणा सुधारणेसाठीही यंदा विशेष निधी देण्यात आला आहे.

Maharashtra Budget 2022: अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांच्या विकासासाठी काय तरतूद?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:53 PM

मुंबईः महाराष्ट्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार(Ajit Pawar)  यांनी 2022-23 या वर्षासाठीचा भरीव अर्थसंकल्प (Budget 2022) आज सादर केला. कोरोना संकटामुळे जेरीस आलेल्या शेती, आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण आदी सर्वच विभागांना नवसंजीवनी देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असून यात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीनुसार तो सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या तसेच आरोग्य यंत्रणा सुधारणेसाठीही यंदा विशेष निधी देण्यात आला आहे. याप्रमाणेच राज्यातील धार्मिक स्थळे विकसित करण्यावरही राज्य सरकारने भर दिला आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीपासून अष्टविनायक आणि पंढरपूरसाठी राज्य सरकारने काय तरतुदी केल्या आहेत, ते जाणून घेऊयात-

  1. कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराच्या विकास कामातील दुसऱ्या टप्प्याकरिता 25 कोटी रुपयांचा विकास आराखडा
  2. अष्टविनायक मंदिर विकास आराखड्याकरीता 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  3. पंढरपूर देवस्थान मंदिर विकासासाठी 73 कोटी 80 लाख रूपये रकमेचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
  4. वडाळ – जिल्हा चंद्रपूर, येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रामीण भागासाठी काय तरतूद?

  1. नियमित कर्जफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. भूविकास बँकेच्या 34 हजार 788 शेतकऱ्यांचे 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रुपयांची देणी देण्यात येणार आहेत.
  2. देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
  3. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील 5 लाख घरकुल बांधणीसाठी 6 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  4. जव्हार जिल्हा पालघर, फर्दापूर जिल्हा औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरिता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
  5. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत 10 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्याकरिता 7500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.6650 कि.मी लांबीच्या पंतप्रधान ग्रामस सडक योजना टप्पा 3 चा प्रारंभ करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

CBSE : दहावी बारावी संदर्भात सीबीएसईकडून मोठी घोषणा, दुसऱ्या टर्म परीक्षेच्या तारखा जाहीर

Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पातून विदर्भाला काय मिळाले? वाचा दहा महत्त्वाच्या घोषणा

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.