AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : राज्याला हुडहुडी, 11 डिसेंबरपर्यंत… हवामान खात्याचा मोठा इशारा; पुणे-मुंबईत काय स्थिती ?

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. धुळे, नाशिकमध्ये पारा ५-६°C पर्यंत खाली आला आहे. गहू-हरभऱ्यासाठी ही थंडी फायदेशीर असली तरी, द्राक्ष उत्पादकांना मात्र द्राक्षांना तडे जाण्याची भीती आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Weather Update : राज्याला हुडहुडी, 11 डिसेंबरपर्यंत... हवामान खात्याचा मोठा इशारा; पुणे-मुंबईत काय स्थिती ?
थंडीचा कडाका वाढला, पुढील तीन दिवस परिस्थिती कशी ?Image Credit source: social media
| Updated on: Dec 08, 2025 | 9:57 AM
Share

राज्यात काही दिवसांपासून थंडीसाह गारवा जाणवायला लागला आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस जरी थंडी दुपारी तापमान वाढलेलं दिसतं. मात्र जसजसा डिसेंबर हिना पुढे सरकत आहे, तसतसं राज्यातला तापमानाचा पारा खाली सरकताना दिसत असून आता वातावरणात हलका बदला जाणवायला लागणार आहे. गेले काही दिवस थंडी कमी झाली होती, मात्र आता पुन्हा हुडहुडी भरायला सुरूवात होणार आहे. मुंबई-पुण्यातही गारव्याचं वातावरण जाणवायला लागलं आहे. मुंबईत आज सकाळी बऱ्यापैकी गारवा जाणवेल, तर पुणेकरांनााही आता त्यांचे स्वेटर्स, जॅकेट्स बाहेर ठेवावे लागणार आहेत. राज्यात इतर छिकाणीही वातावरण गार असून पारा खाली सरकल्याने हुडहुडी वाढणार आहे.

सध्या पालघरमध्ये गारवा अधिक असून सकाळी तापमान 16–17°C नोंदवले जाईल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सकाळी 17–19°C पर्यंत थंडी जाणवेल, तर दुपारी तापमान 30–32°C राहील. कोकणात हवामान स्वच्छ, आणि कोरडे राहू शकते.

राज्यात विदर्भात बरीच आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट जाणवत आहे. दरम्यान हवामान विभागाने पूर्व विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याची शक्यता आहे.

धुळ्यात वाढली थंडी, तापमानाचा पारा घसरला

धुळे शहराचा, जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 5.4 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. त्याचा जनजीवनावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून तापमानात सतत घट होत आहे. थंडीमुळे धुळेकरांची त्रेधातिरपीट उडाली असूल तरी थंडीचा गहू आणि हरभरा पिकांना मोठा फायदा होत आहे.

तर नाशिकमध्ये निफाड येथेही थंडीचा पारा खाली सरकताना दिसत आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.4 अंश सेल्सिअस किमान तापमानची नोंद झाली. अचानक थंडीच्या लाटेत वाढ झाल्यामुळे पारा11 अंश सेल्सिअस वरून खाली घसरून 6.4 अंशावर आला. त्यामुळे ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दरम्यान थंडीत अचानक वाढ झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी मात्र वाढली असून फुगवणीच्या स्टेजला असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची द्राक्ष उत्पादकांना भीती.

तसेच गोंदियाही गारठलं असून तिथे पारा 8.2 अंशांवर पोहोचला आहे. हे यंदाचे सर्वांत कमी तापमान असून लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान .हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 11 डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट कायम राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....