Maharashtra Corona Patient | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारच्या उंबरठ्यावर, मुंबई, पुण्यासह कुठे किती रुग्णांची वाढ?

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असून तो 26 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला (Maharashtra Corona Infected Patient) आहे.

Maharashtra Corona Patient | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारच्या उंबरठ्यावर, मुंबई, पुण्यासह कुठे किती रुग्णांची वाढ?
Follow us
| Updated on: May 13, 2020 | 9:05 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला (Maharashtra Corona Infected Patient) आहे. आज (13 मे) राज्यात नव्या 1 हजार 495 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात 54 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार 922 वर पोहोचली आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत आज 800 नवे रुग्ण आढळले (Maharashtra Corona Infected Patient) आहेत. तर दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 15 हजार 747 वर पोहोचली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित एकूण मृतांची संख्या 975 वर पोहोचली आहे. आज झालेल्या 54 मृत्यूंपैकी मुंबईतील 40, पुण्यात 6, जळगाव 2,सोलापूर शहर 2, औरंगाबाद 2, वसई विरार  आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 33 पुरुष तर 21 महिला आहेत.

आज झालेल्या 54 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 29 रुग्ण आहेत. तर 21 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण हे 40 वर्षांखालील आहे. या 54 रुग्णांपैकी 36 जणांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार होते.

दिवसभरात 422 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज 422 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. सुदैवाने आतापर्यंत राज्यभरात 5 हजार 547 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आतापर्यंत 2 लाख 30 हजार 857 नमुन्यांपैकी 2 लाख 03 हजार 439 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 25 हजार 922 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 14 हजार 627 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

(Maharashtra Corona Infected Patient)

संबंधित बातम्या :

Pune Corona Discharge | पुण्यात कोरोनाबाधित डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या वाढली, 12 दिवसात 937 जणांना डिस्चार्ज‬

Kolhapur Corona | मुंबई-पुणेकरांनी कोल्हापूरची धाकधूक वाढवली, गावी परतणाऱ्यांचा लोंढा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.