Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 वर, दिवसभरात 1,230 नवे रुग्ण

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 वर, दिवसभरात 1,230 नवे रुग्ण

राज्यात आज (11 मे) दिवसभरात 1 हजार 230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 401 वर पोहोचली आहे (Maharashtra Corona Update).

चेतन पाटील

|

May 11, 2020 | 10:46 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (Maharashtra Corona Update). राज्यात आज (11 मे) दिवसभरात 1 हजार 230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 401 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात आज (11 मे) दिवसभरात 587 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 4 हजार 786 रुग्ण बरे झाले आहेत (Maharashtra Corona Update).

राज्यात दिवसभरात 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील 21, सोलापूर शहरातील 5, पुण्याचे 3 तर ठाणे शहरातील 2 रुग्णांचा समावेश आहे. त्याचबरोबर अमरावती, औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी, वर्धा येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये 23 पुरुष तर 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 14,521 वर

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत चालला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा आता 14 हजार 521 वर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 947 वर पोहोचला आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांचा आकडा 902 वर पोहोचला आहे. तर ठाणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 927 वर पोहोचली आहे. यापाठोपाठ मालेगाव शहर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या वर गेला आहे. याशिवाय वसई-विरार, मीरा-भाईंदर, सोलापूर, नागपूर या शहरांमधील कोरोनाबाधितांचा आकडा 200 पेक्षाही जास्त आहे. तर कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांचा आकडा 366 वर पोहोचला आहे.

राज्यात 2 लाख 48 हजार 301 लोक होम क्वारंटाईनमध्ये

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 18 हजार 914 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 93 हजार 457 जणांचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 23 हजार 401 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 2 लाख 48 हजार 301 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 192 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्यावत आकडेवारी

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 14521 374 528
पुणे (शहर+ग्रामीण) 2642 938 154
पिंपरी चिंचवड मनपा 147 34 4
ठाणे (शहर+ग्रामीण) 1052 36 12
नवी मुंबई मनपा 898 80 4
कल्याण डोंबिवली मनपा 366 91 3
उल्हासनगर मनपा 30 0
भिवंडी निजामपूर मनपा 32 11 2
मीरा भाईंदर मनपा 214 143 2
पालघर 37 1 2
वसई विरार मनपा 249 105 10
रायगड 123 5 1
पनवेल मनपा 139 2
नाशिक (शहर +ग्रामीण) 100 2 0
मालेगाव मनपा 596 34
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 63 36 3
धुळे 54 6
जळगाव 180 1 19
नंदूरबार 22 2
सोलापूर 296 41 16
सातारा 121 3 2
कोल्हापूर 19 2 1
सांगली 37 29 1
सिंधुदुर्ग 6 2 0
रत्नागिरी 42 2 2
औरंगाबाद 584 14 14
जालना 14 0
हिंगोली 60 1 0
परभणी 2 1
लातूर 31 8 1
उस्मानाबाद 3 3 0
बीड 1 0
नांदेड 45 4
अकोला 162 14 11
अमरावती 83 13
यवतमाळ 97 22 0
बुलडाणा 25 8 1
वाशिम 1 0
नागपूर 259 84 2
भंडारा 1 0
गोंदिया 1 1 0
चंद्रपूर 4 1 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 42 9
एकूण 23401 4786 868

संबंधित बातम्या :

Pune Lockdown : पुण्यात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें