सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी, सोलापुरात तरुण पोलिसांच्या ताब्यात

आरोपी गणेश ज्ञानोबा बोड्डू वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे निराधार तक्रारी, नोटीसा, विविध अर्ज करत होता. सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांना बदनाम करून सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी त्याने दहा लाख रुपयांची मागणी केली होती

सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी, सोलापुरात तरुण पोलिसांच्या ताब्यात
प्रातिनिधिक फोटो

सोलापूर : सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणारा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. गणेश ज्ञानोबा बोड्डू असे खंडणी मागणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. निराधार तक्रारी आणि विविध अर्ज केल्यानंतर तक्रारी मागे घेण्यासाठी आरोपीने दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी गणेश ज्ञानोबा बोड्डू वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे निराधार तक्रारी, नोटीसा, विविध अर्ज करत होता. सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांना बदनाम करून सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी त्याने दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगार मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी

सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने बोड्डूने थेट राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचीच हकालपट्टी करण्याची मागणीही केली होती.

नागपुरातही खंडणीखोराला अटक

दरम्यान, ऑटोमोबाइल्स शॉपच्या मालकाच्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावत, तिला घरच्यांच्या हत्येचा धाक दाखवत घरातून 50 लाख आणण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच नागपूरमध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना अटक केली.

मो नईम अशरफ अब्दुल जब्बार हे पाचपावलीतील सिद्धार्थनगरात राहतात. त्यांचे गंगाबाई घाट मार्गावर ऑटोमोबाइल्स शॉप आहे. आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नईम यांच्याकडे पक्षांना दाणे टाकण्यासाठी 17 वर्षीय नोकर होता. महिनाभर काम करून त्याने तेथून काम सोडले. नईम यांची आर्थिक स्थिती भक्कम असून घरात मोठ्या प्रमाणात रोख आणि दागिने असते, याची त्याला कल्पना आली होती. त्यामुळे त्याने आपल्या दोन साथीदारांसह नईम यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता.

संबंधित बातम्या :

‘कारवाई टाळायची असेल तर पैसे दे’, परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

बिल्डरकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी, औरंगाबादेत आरोपी रंगेहाथ सापडला

पक्षांना दाणे टाकणाऱ्याचा 50 लाख लुटण्याचा प्रयत्न, अल्पवयीनसह दोघांना अटक

Published On - 11:55 am, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI