
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या मतदानाचा महासंग्राम आज सुरू झाला असून सकाळी 7.30 पासून मतदानास सुरूवात झाली. आज संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार असून सामान्य नागिरकांसह अनेक सेलिब्रिटी, राजकारणी यांनीही मतदान केंद्र गाठून मतदानाचे कर्तव्य बजावले. यंदा बीएमसीमध्ये 227 वॉर्ड आहेत, तर सर्व महानगरपालिकांमध्ये मिळून 893 वॉर्ड आहेत. यामध्ये 2,869 समावेश आहे. महापालिका निवडणुकीत 15 हजार 908 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. राज्यभरात एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार मतदान करणार आहेत. निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी, कुठे किती मतदान झालं याचे अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिवसभर मिळतील.
शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार मिनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवारांमध्ये ठाण्यात प्रचंड राडा झाला. ठाण्यातील प्रभाग क्रमांक तीन येथे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या लोकांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाताना बसेस रोखल्या. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून जमाव पांगवण्याचे काम सुरू आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 20 वर्षानंतर पहिल्यांदाच युतीचं राजकारण केलं. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी कुणाशीही युती केली नव्हती. जी शिवसेना सोडली त्याच शिवसेनेसोबत त्यांना 20 वर्षानंतर युती करावी लागली. पण या युतीचा त्यांना फारसा फायदा होताना दिसत नाहीये. राज यांना अत्यंत कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. मनसेला मुंबईत केवळ 2 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत 5:30 वाजेपर्यंत अंदाजे 60 टक्के मतदान झालं आहे. महापालिकेत भरघोस मतदान झाल्याने सत्ता कुणाची येणार? हा प्रश्न विचारला जात आहे. महापालिकेवर आपलाच महापौर बसवण्यासाठी अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रचंड चुरस होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
आज झालेल्या निवडणुकीत मालेगावच्या मतदारांनी भरभरून मतदान केलं आहे. सकाळपासूनच मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा होत्या. त्यामुळे मालेगावात भरघोस मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. हा अंदाज खराही ठरला. मालेगावात आज 67 टक्के मतदान झालं. त्यामुळे मालेगावात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सांगली महापालिका निवडणुकीत 2018 साली 62.17% मतदान झालं होतं. तर तब्बल सात वर्षांनी 2026 ला सांगली महापालिकेच्या निवडणुकीत मतदान सरासरी अंदाजे 60 टक्के झाल असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याने सर्वच उमेदवाराची धाकधूक वाढली
भाजपला 42 टक्क्याहून अधिक वोट मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून आलं आहे. तर ठाकरेंच्या आघाडीला 32 टक्के मते मिळणार असल्याचं हा सर्व्हे सांगतो. इतरांनाही इतरांना 13 टक्के वोट मिळणार असल्याचं सर्व्हेत नमूद करण्यात आलं आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 च्या दत्तनगर येथील मतदान केंद्र 25 वर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाशिकमध्ये साडेचार वाजेपर्यंत 41 टक्के मतदान झाले आहे.
नांदेड महापालिका निवडणुकीसाठी दुपारी दोननंतर मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिसून आलं आहे. दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41.65 टक्के मतदान झालं असून एकूण 2 लाख 9 हजार 25 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
चंद्रपूर महानगरपालिका मतदान आकडेवारी
पुरुष – 58055
महिला – 56310
अन्य – 2
एकुण – 114367
टक्केवारी – 38.12%
अहिल्यानगर : दुपारी 3.30 पर्यंत 48.49 टक्के मतदान
पुरुष 77695
स्त्री 71133
इतर 30
एकूण 148858
टक्केवारी 48.49
जळगाव शहर महानगरपालिका दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
पुरुष मतदान = 79727
स्त्री मतदान = 70572
एकूण मतदान = 150299
टक्केवारी = 34.27%
जालना
जालना महानगरपालिका निवडणूक 2025 -26
दुपारी 3.30 वाजेपर्यंत 45.94%
मालेगाव
मालेगाव महापालिका 3:30 वाजेपर्यंत 45.50% मतदान
धुळे
धुळे महानगरपालिका निवडणूकीसाठी सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 36.49 % मतदान.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026
दिनांक 15 जानेवारी 2026
दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 41.08 %
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 26
मतदान दि. 15 जानेवारी 2026
सकाळी 7.30 ते 3.30
मतदान टक्केवारी-44 %
नांदेड महानगरपालिकेसाठी दुपारी 3.30 वाजे पर्यंत 41.65 टक्के मतदान
जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकासाठी 3.30 वाजेपर्यंत 45.94% मतदान
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत 3:30 वाजेपर्यंत 40.05 टक्के मतदान.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1.30 वाजेपर्यंत 30.75 टक्के मतदान झाले आहे.
जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक2025-26 दुपारी. 1.30 पर्यंत मतदान.
अहिल्यानगरमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 33.91 टक्के मतदान
पुरुष 55962
स्त्री 48145
इतर 3
एकूण 1,04,110
टक्केवारी 33.91
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 पर्यंत 30.19 टक्के मतदान झाले आहे. आता मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक2025-26 साठी दुपारी 1.30 पर्यंत मतदानाची टक्केवारी : 26.50 % इतकी नोंदवण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्येक प्रभागाच्या आढावा
प्रभागात कशा पद्धतीने मतदान सुरू आहे याची माहिती उद्धव ठाकरे यांनी घेतली.
शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सुधीर साळवी यांच्याकडून मतदानाच्या आढावा
उद्या ठाकरेंचा आवाज घुमणार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भावना
धुळे महानगरपालिका निवडणूक मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. सकाळी 7.30 ते 1.30 वाजेपर्यंतचा हा आकडा असून धुळ्यात 25.20 % मतदान झालं आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेत दुपारी 1.30 पर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे वसई-विरारमध्ये 33.00% मतदान झालंय.
नांदेड महानगरपालिकेसाठी आज सकाळी 7.30 वाजल्यापासून ते 1.30 वाजेपर्यंत 29.50 टक्के इतकं मतदान झालं आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसीच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान होत आहे. दुपारी 1.30 पर्यंत 29.96 % मतदान झालं आहे.
DMC निवडणूक : पहिल्या चार तासांत 17.53 % मतदान झालं आहे. केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी दिसत आहे. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 122 प्रभागांसाठी 31 पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
मतदारांची ओळख पुसली जात आहे का? लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न आहे. वन नेशन वन इलेक्शन मोदींना हवं आहे. काहीही करून सत्ता मिळवा हे त्यांचं मिशन आहे. आज काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं लक्षात येत आहेत. काहींची मतदान केंद्र गायब आहे. शाई पुसली जाते. ही शाई नाही, लोकशाही पुसली जात आहे. तुम्ही मार्करने करा की कशानेही करा. शाई पुसली कशी जातात. दोन नावे नोंदली तिथे हमी पत्र घेणार होते. किती हमीपत्रे घेतली. शाई पुसल्यावर मतदान करणार नाही याची काय खात्री देता असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. 11.30 पर्यंत 16.88 टक्के मतदान झालं.
11 लाख 18 हजार 284 पैकी 1लाख 88 हजार 759 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती समोर आली आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेची आतापर्यंत टक्केवारी समोर आली असून एकूण 20.16 टक्के मतदान झालंय.
पुरुष मतदार – 34775
स्त्री मतदार – 27103
इतर मतदार – 3
एकूण मतदार – 61881
टक्केवारी – 20.16
नागपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान होत असून सकाळी 11.30 वाजेपर्यंत 12% नागपूर वासियांनी मतदान केलं आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 11.30 पर्यंत एकूण 19 टक्के मतदान झालं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान सुरू असून सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.73 % मतदान झालं आहे.
जालना महानगरपालिका निवडणुकासाठी आज मतदान होत असून सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. सकाळी 11.0 पर्यंत एकूण 20.13% मतदान झालं आहे.
जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक2025-26 मध्ये सकाळी 11. 30 पर्यंत मतदान किती मतदान झालंय त्याची माहिती समोर आली आहे.
पुरुष मतदान = 33257
स्त्री मतदान = 25441
एकूण मतदान = 58698
एकूण टक्केवारी = 13.39% मतदान झालं आहे.
धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असून सकाळी 11.30 वाजेपर्यंतची टक्केवारी समोर आली आहे. 14.23 % मतदान झालं आहे.
पुरुष मतदान – 33677
महिला मतदान – 27568
एकूण मतदान – 61259
14.23 % मतदान
राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पार पडत असून पिंपरी चिंचवड – महापालिकेच्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारीही समोर आली आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेत सकाळी 11:30 वाजेपर्यंत 16.03 टक्के मतदान झालं आहे.
चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 -26 मध्ये आज ,सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 6.46 % इतकी होती.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
पुरुष मतदान = 14494
स्त्री मतदान = 9654
एकूण मतदान = 24148
वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 मध्ये सकाळी 9.30 पर्यंत एकूण 8.49% मतदान झालं आहे. मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढाना दिसत आहे.
नांदेडमध्ये सकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत सरासरी 7.16 % मतदान झाले आहे. एकूण 5 लाख मतदारांपैकी पहिल्या टप्प्यात दोन तासात 35 हजार 951 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.