VIDEO | डहाणूत फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट, आग भडकून दहा जण होरपळले

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात डेहणे-पळे येथील फटाका फॅक्टरीमध्ये वेल्डिंग करताना ठिणगी उडून आग लागल्याचा अंदाज आहे.

VIDEO | डहाणूत फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट, आग भडकून दहा जण होरपळले
Palghar Dahanu Firecracker Factory Fire


मोहम्मद हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : डहाणू तालुक्यात फटाक्याच्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी एकामागून एक स्फोटाचे जोरदार आवाज झाल्यानंतर फॅक्टरीत आग भडकली. या दुर्घटनेत दहा जण भाजले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Palghar Dahanu Series of explosions at firecracker factory causes Fire)

पाच-सहा किमीवरुनही स्फोटाचे आवाज

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात डेहणे-पळे येथील फटाका फॅक्टरीमध्ये आग लागली. वेल्डिंग करताना ठिणगी उडून आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. गुरुवारी सकाळी एकामागून एक स्फोटाचे जोरदार आवाज झाले. पाच ते सहा किलोमीटर अंतरावरुनही स्फोटाचे आवाज ग्रामस्थांना ऐकू येत होते. आग आणि स्फोटाची दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत.

अग्निशमन दलाच्या चार गाड्या

या घटनेमध्ये दहा जण भाजले असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे . जखमींना डहाणू आशागड येथील सेवा नर्सिंग होम या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलासह तहसीलदार आणि संबंधित खात्यांचे अधिकारी घटनेची चौकशी आणि अहवाल घेण्यासाठी दाखल झाले आहेत

पाहा व्हिडीओ :

 

(Palghar Dahanu Series of explosions at firecracker factory causes Fire)