
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार आहे. ज्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला आहे त्यासाठी 30 हजार, तसेच वाहून गेलेल्या प्रत्येक जनावरासाठी 37 हजार रुपये दिले जाणार आहे. कोणत्या नुकसानीसाठी किती रुपये दिले जातील ते सविस्तर जाणून घेऊयात.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही मदत दिली जाणार आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ही दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पंजाब, तामिळनाडू कर्नाटकपेक्षा जास्त निधी आपण दिला आहे. पीक विम्याचीही मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व निकष आणि अटी-शर्थी बाजूला ठेवून मदत केली जाणार आहे.’