AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशखबर! आता 100 टक्के टोलमाफी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील 3 महामार्गांवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी दिली आहे.

खुशखबर! आता 100 टक्के टोलमाफी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
devendra fadnavis and electric vehicle
| Updated on: Sep 04, 2025 | 8:45 PM
Share

Electric Vehicle Toll Free Decision : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. याच निर्णयांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील 3 महामार्गांवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी दिली आहे.

कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळणार?

राज्य सरकारचा हा निर्णय आता लागू झाला असून तीन महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल म्हणून एकही रुपया द्यावा लागणार नाही. अनेक लेक्ट्रिक वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बाबत माहिती दिली आहे. मोटार व्हेइकल अॅक्ट 1958 अंतर्गत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत M2, M3 आणि M6 श्रेणीच्या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना तसेच राज्य परिवहन महामंडळ (STU) आणि खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना ही टोलमाफी लागू असेल. सरकारची ही टोलमाफी 22 ऑगस्ट 2025 रोजीपासून लागू झालेली आहे.

सरकारचे मत काय?

सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन असणाऱ्यांना प्रवास स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना मिळेल, असे सरकारचे मत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगांनाही यामुळे चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे पर्यावरणपुरक वाहनांतही वाढ होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. या एका निर्णयामुळे आता इलेक्ट्रिक वाहनधारकांचे हजारो रुपये वाचणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहन असल्याने काय फायदा होतो?

इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे या वाहनांमुळे प्रदूषण कमी होते. तसेच इंधनाचा खर्चही कमी होतो. सर्वसामान्य वाहणांना चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेलची गरज असते. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना मात्र पेट्रोल, डिझेलची गरज नसते. ही वाहनं पर्यावरण पुरक असल्याचे म्हटले जाते. इलेक्ट्रिक वाहनांमुळे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण होत नाही. त्यामुळेच जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरावीत असे आवाहन केले जाते. 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.