AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Curvv EV घरी नेण्यासाठी किती Down Payment द्यावे लागेल? जाणून घ्या

टाटा कर्व्ह इलेक्ट्रिक वाहनाला सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कूप अनेक फीचर्सनी सुसज्ज आहे. ही कार 3 लाखांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करता येणार आहे. जाणून घ्या.

Tata Curvv EV घरी नेण्यासाठी किती Down Payment द्यावे लागेल? जाणून घ्या
Tata Curvv Ev
| Edited By: | Updated on: Sep 04, 2025 | 7:30 AM
Share

टाटा कंपनी ही लोकांची पसंती लक्षात घेऊन अनेक इलेक्ट्रिक वाहने ऑफर करते, त्यापैकी एक म्हणजे टाटा कर्व्ह. हा एक इलेक्ट्रिक एसयूव्ही कूप आहे ज्यात अनेक उत्तम फीचर्स आहेत, ज्यामुळे लोक याची भरपूर खरेदी करतात. तुम्हाला ईव्ही खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा.

आता तुम्हाला  3 लाख रुपये डाऊन पेमेंट आणि उर्वरित पैशांचे कर्ज भरून ही ईव्ही ही कार घरी आणता येईल. इलेक्ट्रिक वाहनांना सध्या मोठी मागणी आहे. कमी देखभाल आणि कमी खर्चामुळे या कारला लोकांची पहिली पसंती असते.

जर तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी याची आर्थिक माहिती असणे महत्वाचे आहे. त्याविषयी ची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

गाडीची किंमत किती आहे?

टाटा कर्व्ह ईव्हीची किंमत 17.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 22.24 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम दिल्ली) जाते. आम्ही तुम्हाला याच्या बेस व्हेरियंट क्रिएटिव्ह 45 बद्दल माहिती देणार आहोत ज्याची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 17,49,000 रुपये आहे. इलेक्ट्रिक कार असल्याने त्याचा रोड टॅक्स (RTO) खूपच कमी असून त्यासाठी तुम्हाला फक्त सात हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर विम्यासाठी 73 हजार 460 रुपये आणि इतर खर्चासाठी 17 हजार 490 रुपये मोजावे लागणार आहेत. या सर्व खर्चासह कारची ऑन रोड किंमत 18,46,950 रुपये असेल. जाणून घ्या फायनान्स डिटेल्स

आता आम्ही तुम्हाला कारची फायनान्स डिटेल्स सांगतो. 3 लाख रुपये डाउन पेमेंट करून बँकेकडून 15 लाख 46 हजार 950 रुपयांचे कर्ज मिळू शकते, त्यासाठी तुम्हाला दरमहा हप्ते भरावे लागतील. जर सात वर्षांसाठी कर्ज घेतले असेल आणि व्याजदर 9 टक्के असेल तर तुम्हाला दरमहा 24,889 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. हा मासिक हप्ता सात वर्षांचा असेल आणि तुम्हाला सुमारे 5,43,000 रुपये व्याज म्हणून भरावे लागेल. यामुळे कारची एकूण किंमत सुमारे 23,90,000 रुपये होईल.

टाटा कर्व्ह ईव्हीमध्ये 45 किलोवॅटची बॅटरी

टाटा कर्व्ह ईव्हीमध्ये 45 किलोवॅटची बॅटरी देण्यात आली आहे, जी 430 किमीची रेंज देते. ही कार 148 बीएचपी पॉवर आणि 215 एनएम पॉवर जनरेट करते आणि टॉप स्पीड 160 किमी प्रति तास आहे. या कारमध्ये अ‍ॅडजस्टेबल स्टीअरिंग, हाइट अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर, कीलेस एंट्री, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटन असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), ईबीडी, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, स्पीड अलर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.