कोरोनाच्या नव्या विषाणूची धडकी, पुन्हा निर्बंधाचे चक्र सुरू होण्याची भीती, सरकारची नवी नियमावली

कोरोनाच्या नव्या विषाणूने जगात पुन्हा एकदा हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही याबद्दल भीती व्यक्त केली आहे. शाळा सुरू करायच्या की नाही, यावर उद्या निर्णय होणार आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूची धडकी, पुन्हा निर्बंधाचे चक्र सुरू होण्याची भीती, सरकारची नवी नियमावली
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 5:39 PM

मुंबईः कोरोनाच्या (Corona) नव्या विषाणूने जगात पुन्हा एकदा हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही याबद्दल भीती व्यक्त केली आहे. शाळा सुरू करायच्या की नाही, यावर उद्या निर्णय होणार आहे. देशातही अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता राज्य सरकारने 27 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार काही सूचनाही दिल्या आहेत. त्या अशा…

1) आता आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केला जाईल. त्यानुसार सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना सामान्य वेळेनुसार किंवा स्थानिक किंवा इतर सक्षमांनी ठरविलेल्या नियमानुसार परवानगी दिली जाईल.

2) कोविडच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन नाही केल्यास मार्गदर्शक तत्त्वानुसार योग्य तो दंड आकारला जाईल आणि कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार एखादा मेळावा अथवा कार्यक्रम आयोजित केला. तिथे येणाऱ्यांची संख्या 1 हजार व्यक्तींपेक्षा जास्त असेल, तर त्याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी लागेल. हा विभाग अशा ठिकाणी ही माहिती खरी आहे की खोटी आहे, यासाठी आपले प्रतिनिधी पाठवू शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होईल.

3) आपत्ती व्यवस्थापन आयोजन कायद्यानुसार निर्बंध कडक करता येतील. मात्र, त्यानुसार 48 तास अगोदर माहिती देण्यात येईल. लोकल, सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीकरणाच्या दोन डोसचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस होऊन 14 दिवस झालेल्या व्यक्तीचेच लसीकरण झाल्याचे समजण्यात येईल. त्यात दुसऱ्या डोस काही वैद्यकीय कारणामुळे घेतला नसेल, तर त्यासाठी मान्यता प्राप्त डॉक्टरांचे प्रमाणपत्र लागेल. यात फक्त 18 वर्षांखालील व्यक्तीला लसीकरणातून सूट असेल.

4) मास्कचा वापर करावा लागेल. रिक्षा किंवा टॅक्सीत मास्क नाही वापरल्यास संबंधितास 500 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल, तर त्यास 500 तर संबंधित दुकानदाराने मास्क घातला नसेल तर 10 हजारांचा दंड आणि मॉल्स मधील शॉप मालकाने मास्क घातला नसल्यास 50 हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. राजकीय कार्यक्रमांना, सभांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नियम पाळले जात नसतील तर संबंधित आयोजकांवर 50 हजारांचा दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला आहे.

5) आपल्या संस्था, कॅम्पस आणि इतर ठिकाणीही कोणत्याही ठिकाणी साऱ्यांनी कोविड नियमाचे पालन करावे लागेल. ते जर नियमाचे पालन करत नसतील, तर त्यासाठी संस्थेला सुद्धा जबाबदार धरण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेचा हा निर्णय

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या करोनाच्या नव्या आणि सर्वाधिक धोकादायक विषाणूमुळे मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करावे, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या प्रवाशांची चाचणी केल्यानंतर आलेले नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले आहे.

इतर बातम्याः

Nashik| जिल्ह्यात 457 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमध्ये 85, सिन्नरमध्ये 81

पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.