AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे की अजितदादा? नव्या सरकारमध्ये कोण वरचढ?, कुणाकडे मलईदार खाती? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय?

या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल, कोणाला किती मंत्रिपद मिळणार याबद्दलही चर्चा करण्यात आली.

एकनाथ शिंदे की अजितदादा? नव्या सरकारमध्ये कोण वरचढ?, कुणाकडे मलईदार खाती? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारImage Credit source: ANI
| Updated on: Nov 29, 2024 | 12:33 PM
Share

Maharashtra ministry Distribution : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासूनच राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी सुरु आहेत. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतंच दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीतील केंद्रीय नेतृत्व अमित शाह, जे.पी.नड्डा यांच्या महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत होते. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल, कोणाला किती मंत्रिपद मिळणार याबद्दलही चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रि‍पदाची ऑफर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री (२८ नोव्हेंबर) दिल्लीत पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. पण महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार देण्यात आला आहे. त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रि‍पदाची ऑफर देण्यात आली आहे. यासोबतच भाजपकडून अनेक महत्त्वाची खातीही शिंदेंना दिली जाणार असल्याचे बोललं जात आहे.

मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित?

महायुतीकडून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यानुसार 21-12-10 अशा पद्धतीने मंत्रिपदांची विभागणी केली जाऊ शकते, असे बोललं जात आहे. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रि‍पदे मिळू शकतात. त्यापाठोपाठ शिवसेनेला 10 ते 12 मंत्रि‍पदे आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रीपदे मिळू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण अद्याप यावर कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.

एकनाथ शिंदे आणि भाजपकडे कोणती खाती?

तसेच खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. त्यासोबतच नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदेंच्या पारड्यात पडणार आहेत. तर दुसरीकडे भाजप स्वत:कडे मुख्यमंत्रीपदासह गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृह निर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, सामान्य प्रशासन ही खाती ठेवणार आहे.

अजित पवारांना मिळणार ‘ही’ खाती

तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, महिला आणि बालविकास, अल्प संख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती दिली जाणार आहेत. यामुळे महायुती सरकारमध्ये गेल्यावेळेप्रमाणे आताही दोन उपमुख्यमंत्री असू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान सध्या मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित असणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रि‍पदावर चर्चा होणार आहे. तसेच अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....