Diwali Guidelines 2020 | दिवाळी पहाट आणि फटाक्यांना बंदी, राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत (Maharashtra Government issues Guidelines for Diwali 2020).

Diwali Guidelines 2020 | दिवाळी पहाट आणि फटाक्यांना बंदी, राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 8:34 PM

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत (Maharashtra Government issues Guidelines for Diwali 2020). गृह विभागाकडून याबाबत परिपत्रक जारी करुन नागरिकांना यावर्षी साध्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करता येऊ शकतील, असं राज्य सरकारकडून सूचित करण्यात आलं आहे (Maharashtra Government issues Guidelines for Diwali 2020).

गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे :

1. यावर्षी दिवाळी सण कोरोना काळात साजऱ्या केलेल्या अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.

2. दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.

3. उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

4. फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाचं संक्रमन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.