AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सरकारची सर्वात मोठी घोषणा; ‘या’ जिल्ह्यांतील आदिवासींना फायदा होणार?

राज्य सरकारने आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आला आहे.

एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सरकारची सर्वात मोठी घोषणा; 'या' जिल्ह्यांतील आदिवासींना फायदा होणार?
| Updated on: Jul 31, 2025 | 7:20 PM
Share

राज्य सरकारने आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आरक्षण उपसमितीने याबाबत केलेल्या शिफारशीनंतर ही बिंदूनामावली निश्चित करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या 8 आदिवासीबहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण विहित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषीमत्री माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक ऊईके आदींचा समावेश होता. या उपसमितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने निर्णय घेतला आहे.

या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ही आरक्षण बिंदूनामावली लागू करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमधील इतर मागास वर्ग, तसेच विमुक्त जाती/भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी आणि लोकसंख्या विचारात घेऊन गट-क आणि गट-ड संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर या सुधारित आरक्षणानुसार बिंदूनामावली देखील विहित करण्यात आली होती.

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) प्रवर्गास शासकीय सेवेतील सरळसेवा पदभरतीस तसेच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशास 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांसाठी आरक्षण

नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर या प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित जातींसाठी 10% , अनुसूचित जमातींसाठी 22% , विमुक्त जाती (अ) साठी 3% , भटक्या जमाती (ब) साठी 2.5% , भटक्या जमाती (क) साठी 3.5% , भटक्या जमाती (ड) साठी 2% , विशेष मागास प्रवर्गासाठी 2% , इतर मागास वर्गासाठी 15% , एसईबीसीसाठी 8% , ईडब्ल्यूएससाठी 8% आणि खुला प्रवर्गासाठी 24% आरक्षण विहित करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यासाठी आरक्षण

यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 12% , अनुसूचित जमातींसाठी 14% , विमुक्त जाती (अ) साठी 3% , भटक्या जमाती (ब) साठी 2.5% , भटक्या जमाती (क) साठी 3.5% , भटक्या जमाती (ड) साठी 2% , विशेष मागास प्रवर्गासाठी 2% , इतर मागास वर्गासाठी 17% , एसईबीसीसाठी 8% , ईडब्ल्यूएससाठी 8% आणि खुला प्रवर्गासाठी 28% आरक्षण लागू करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी आरक्षण

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 13% , अनुसूचित जमातींसाठी 15% , विमुक्त जाती (अ) साठी 3% , भटक्या जमाती (ब) साठी 2.5% , भटक्या जमाती (क) साठी 3.5% , भटक्या जमाती (ड) साठी 2% , विशेष मागास प्रवर्गासाठी 2% , इतर मागास वर्गासाठी 19% , एसईबीसीसाठी 8% , ईडब्ल्यूएससाठी 8% आणि खुला प्रवर्गासाठी 24 % आरक्षण विहित करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यासाठी आरक्षण

गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी १२% , अनुसूचित जमातींसाठी 24% , विमुक्त जाती (अ) साठी 2% , भटक्या जमाती (ब) साठी 2% , भटक्या जमाती (क) साठी 2% , भटक्या जमाती (ड) साठी 2% , विशेष मागास प्रवर्गासाठी 2% , इतर मागास वर्गासाठी 17% , एसईबीसीसाठी 8% , ईडब्ल्यूएससाठी 8 % आणि खुला प्रवर्गासाठी 21 % आरक्षण लागू करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यासाठी आरक्षण

रायगड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 12% , अनुसूचित जमातींसाठी 9% , विमुक्त जाती (अ) साठी 3% , भटक्या जमाती (ब) साठी 2.5% , भटक्या जमाती (क) साठी 3.5% , भटक्या जमाती (ड) साठी 2% , विशेष मागास प्रवर्गासाठी 2% , इतर मागास वर्गासाठी 19% , एसईबीसीसाठी 10% , ईडब्ल्यूएससाठी 9% आणि खुला प्रवर्गासाठी 28% आरक्षण विहित करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.