सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल

सरकारमधील नेत्यांकडून केवळ टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा सुरु आहे. | Devendra Fadnavis

सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 10:52 AM

हिंगोली: राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे नेते रोज प्रसारमाध्यमांच्या माईकसमोर येऊन बोलतात. पण प्रत्यक्षात निर्णय कोण घेणार? त्यामुळे आता सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. यानंतरही कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis criticise Mahavikas Aghadi govt over farmers aid)

देवेंद्र फडणवीस बुधवारी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले. शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तरी सरकारने आता जागे झाले पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे सर्व जण मीडियात येऊन माईकसमोर बोलतात. मग प्रत्यक्ष निर्णय कोण घेणार? सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी बिलकूल गांभीर्य नाही. सरकारमधील नेत्यांकडून केवळ टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा सुरु आहे. हे सर्व थांबवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे व तात्काळ कारवाई केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

जयंत पाटलांना फडणवीसांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला कोणताही अर्थ राहिलेला नाही. मुख्यमंत्री योग्यप्रकारे काम करत असल्याचे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आम्हाला जयंत पाटलांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्हाला खरखोटं ठरवण्यापेक्षा जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करावी. अजूनही अनेक भागांमध्ये पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांनी बोलघेवडेपणा सोडून कृतीवर भर द्यावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण आपण काय करणार आहात? ते सांगा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन

(Devendra Fadnavis criticise Mahavika Aghadi govt over farmers aid)
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.