कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन

ज्यांच्याकडे घरात खायला काही नाही ते कर्ज कसे फेडणार? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं. तसेच अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन

हिंगोली: अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेलेला असताना बँकांकडून शेतकऱ्यांना रोज फोन येत असून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. ज्यांच्याकडे घरात खायला काही नाही ते कर्ज कसे फेडणार? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं. तसेच अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (devendra fadnavis visits flood-hit areas in hingoli)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आज हिंगोलीतील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा आहेत. हिंगोलीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्याकडे केल्या. त्यावर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही बाब निदर्शनास आणून दिली. बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जासाठी तगादा लावला जात आहे. दिवसातून तीन चार वेळी शेतकऱ्यांना फोन केला जात आहे. अधिकारीही घरी येऊन कर्जासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला असून सरकारने अतिवृष्टग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घ्यावा. सरकारने अतिवृष्टी भागात कर्ज वसुली न करण्याचा पहिला आदेश काढावा. तसेच कर्ज वसुली करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

राज्यातील सर्व मंत्री फक्त येऊन माइकमध्ये बोलत आहेत. पण निर्णय कोण घेणार? शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णयच घेतला जात नाही. सरकारला गांभीर्य दिसत नाही. केवळ टिंगल टवाळी सुरू असून डायलॉगबाजीही सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

जयंतराव, बोलघेवडेपणा सोडा

यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावरही टीका केली. जयंत पाटलांनी आम्हाला खरं खोटं ठरवण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. बोलघेवडेपणा सोडून थेट कृती करून दाखवावी, असा टोलाही त्यांनी लगावला. इथे रस्त्यावरच शेत आहे. दहा दिवस झाले तरी या शेताचा अजून पंचनामा झालेला नाही. पालकमंत्रीही पाहणी करायला आले नसल्याच्या तक्रारी आहेत. पालकमंत्री आले नसतील तर त्यांनी या भागात यावं, असंही त्यांनी सांगितलं. (devendra fadnavis visits flood-hit areas in hingoli)

संबंधित बातम्या:

Live Update : मराठवाड्यात अतिवृष्टीत तब्बल 593 जनावरांचा मृत्यू

कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करा, उस्मानाबाद शिवसेना मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

मुख्यमंत्री माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्षबिक्ष येऊच शकत नाही

(devendra fadnavis visits flood-hit areas in hingoli)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *