कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करा, उस्मानाबाद शिवसेना मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर मदत द्या, अशी मागणी उस्मानाबादमधील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

कोल्हापूरच्या धर्तीवर मदत करा, उस्मानाबाद शिवसेना मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

उस्मानाबाद: परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यावेळी कोल्हापूरच्या धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी उस्मानाबादमधील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते करणार आहेत. माजी जलसंपदामंत्री तानाजी सावंत, खासदार ओम राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील सध्या संपूर्ण जिल्ह्याची पाहणी करत आहेत. ते आज संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानाचा अहवाल मुख्यमंत्री ठाकरे यांना देणार आहेत. (Osmanabad shivsainik demands to help on the lines of kolhapur)

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं सोयाबीन, कापूस, भूईमुग, उसाचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अशावेळी कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी २५ हजार तर बागायतीसाठी हेक्टरी ५० हजाराची नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिक शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासह शिवसेनेचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे.

एकीकडे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे विमा कंपन्या सोयाबीनच्या नुकसानाची भरपाई देताना अनेक नियम घालत आडकाठी करत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा?

सकाळी 9.30 वाजता – सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण

सकाळी 10.15 वाजता – काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी आणि शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी

सकाळी 10.30 वाजता – काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण

सकाळी 11.15 वाजता – अपसिंगा येथे आगमन आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी

सकाळी 11.35 वाजता – अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव

दुपारी 12.20 वाजता – पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा आणि अभ्यागतांच्या भेटी राखीव

संबंधित बातम्या: 

CM Uddhav Thackeray Osmanabad Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर, थेट बांधावर जात बळीराजाचे अश्रू पुसणार

सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा, नुकसानीची पाहणी करणार

Osmanabad shivsainik demands to help on the lines of kolhapur

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *