महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: सासूबाईंविरोधात सूनबाई निवडणूक मैदानात उतरल्यामुळे नांदेडमधील दाभड ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. (Nanded Gram Panchayat Mother in law)

अनिश बेंद्रे

|

Jan 18, 2021 | 2:11 PM

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. (Nanded Dabhad Gram Panchayat Mother in law defeats Daughter in law)

सरपंचपद वाटून घेणारी सासू-सूनेची जोडी

सासू-सुनेचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असं म्हटलं जातं. विळा-भोपळ्याप्रमाणे असलेल्या या जोडीने खरंतर गेल्या वेळी सरपंचपद निम्मं-निम्मं वाटून घेतलं होतं, मात्र आता सासूबाईंविरोधात सूनबाई निवडणूक मैदानात उतरल्यामुळे ही ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली होती.

दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रेखा दादजवार आणि संगीता दादजवार या सासू-सूनेची जोडीने राजकीय रिंगणात एकमेकींना टफ फाईट दिली. परंतु या लढाईत सासूच प्रभावी असल्याचं पाहायला मिळालं.

सूनबाईंच्या स्वप्नांनाही सुरुंग

मागच्या टर्ममध्ये या दोघींनी अडीच अडीच वर्ष सरपंच पद भूषवले होते. वीज, पाणी, शाळेसाठी कुंपण अशी अनेक कामं केली, आता पुन्हा संधी मिळाली, तर काम करण्याची इच्छा असल्याचे सूनबाईंनी सांगितलं होतं. मात्र सासूबाईंनी सूनेच्या इराद्यांवर पाणी टाकलं.

सासरे विरुद्ध सूनही मुकाबला

अर्धापुर तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन पॅनल उतरल्याने रंगत आली आहे. विशेष म्हणजे या गावात काका विरोधात पुतण्या आणि सुनेविरोधात सासरा निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आंबेगावची ग्रामपंचायत निवडणूक जिल्ह्यात चर्चेत आली आहे. (Nanded Dabhad Gram Panchayat Mother in law defeats Daughter in law)

पूर्वी या गावावर काँग्रेसचे वर्चस्व होते, मात्र आता काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. तर युवा शक्ती ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून अमोल डोंगरे यांनी सर्व जागेवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आंबेगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या :

सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटीलवर गुलाल

(Nanded Dabhad Gram Panchayat Mother in law defeats Daughter in law)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें