Nanded Gram Panchayat Election Results 2021: भाजप आमदार राजेश पवारांना धक्का, आलूवडगावात विरोधकांची सत्ता

Maharashtra gram panchayat election results 2021: आमदार राजेश पवारांच्या आलूवडगावातील 9 पैकी केवळ 3 जागांवार भाजपचा विजय झाला आहे. (Rajesh Pawar Aluvadgaon BJP)

Nanded Gram Panchayat Election Results 2021: भाजप आमदार राजेश पवारांना धक्का, आलूवडगावात विरोधकांची सत्ता
राजेश पवार, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 1:14 PM

नांदेड:जिल्ह्यातील नायगांव विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राजेश पवार यांना त्यांच्या आलूवडगाव या गावात आपल्या गटाचा पराभव बघावा लागला आहे. आलूवडगावातील 9 पैकी केवळ 3 जागांवार भाजप आमदारांच्या गटाचा विजय झाला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 BJP MLA Rajesh Pawar lost Gram Panchayat Election in Aluvadgaon)

आमदार राजेश पवारांच्या गटाचा पराभव

आलूवडगावमध्ये यापूर्वी स्थानिक आघाडीची सत्ता होती. भाजप आमदार राजेश पवार यांच्या गटानं 9 जागांपैकी 3 जागांवर विजय मिळवला. शिवाजी पवार यांच्या गटानं तब्बल 6 जागांवर विजय मिळवत आमदारांच्या गटाला सत्ते पासून दूर ठेवलं आहे. शिवाजी पवार यांच्या गटानं आलूवडगावात सत्ता मिळवली आहे. आलूवडगावातील भाजपचा पराभव राजेश पवारांना विचार करण्यास प्रवृत्त करायला लागणारा आहे.

नांदेड जिल्ह्यातील महत्वाच्या ग्रामंपचायत निकालांचे अपडेटस

  1. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या कोंढा गावात 9 पैकी आठ जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे.
  2. बिलोली तालुक्यातील जिगळा गावात भाजपच्या गटानं सत्ता मिळवली.
  3. माहुर तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायत 9 पैकी 9 जागेवर काँग्रेस प्रणित पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
  4. हदगाव तालुक्यात शिवसेना बंडखोर बाबुराव कदम यांच्या गटाकडे बारा ग्रामपंचायती गेल्या आहेत. महाविकास आघाडी एकत्र येऊनही मतदारांनी बंडखोर बाबूराव कदम गटाला पसंती दिली.
  5. माहुर तालुक्यातील हरडप ग्राम पंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत.
  6. लोहा तालुक्यातील नांदेड दक्षिण मतदार संघातील सायाळ गावात काँग्रेसनं सत्ता मिळवली आहे.
  7. धर्माबाद तालुक्यातील चोंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या 7 उमेदवारांसह संपूर्ण पॅनल विजयी झालं आहे.

ग्रामपंचायत निकालातील महत्वाच्या अपडेटस

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या गावातही सत्तांतर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. खानापूरमध्ये शिवेसना आमदार प्रकाश आबिटकरांन चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यातील खानापूर ग्रामपंचायत खेचून आणली आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | पाटणमध्ये शिवसेना नेते शंभूराज देसाई यांची बाजी, तर राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची पिछाडी

Mhaisal Gram Panchayat Election Results 2021 : मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!

माळशिरस ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मोहिते पाटील गटाचं वर्चस्व कायम, भाजपची घौडदौड

(Maharashtra gram panchayat election results 2021 BJP MLA Rajesh Pawar lost Gram Panchayat Election in Aluvadgaon)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.