AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Gram Panchayat Election Results 2021: क्रिकेटच्या मैदानात जीव गमावलेल्या ढवळीच्या अतुल पाटलांचा 57 मतांनी विजय

Maharashtra gram panchayat election results 2021: सांगलीतील ढवळी गावातील अतुल पाटील यांनी 57 मतांनी विजय मिळवला, त्यांचा शनिवारी मृत्यू झाला होता. (Atul Patil Sangli)

Sangli Gram Panchayat Election Results 2021: क्रिकेटच्या मैदानात जीव गमावलेल्या ढवळीच्या अतुल पाटलांचा 57 मतांनी विजय
अतुल पाटील
| Updated on: Jan 18, 2021 | 8:35 PM
Share

सांगली: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. सागंली जिल्ह्यातील ढवळी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार अतुल पाटील यांचं रविवारी क्रिकेट खेळता ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल पाटील यांचा विजय झाला आहे. ग्रामस्थांनी अतुल पाटील यांच्या विजयानंतर गड आला पण सिंह गेला अशी भावना व्यक्त केली.(Maharashtra gram panchayat election results 2021Sangli Atul Patil won election after death)

57 मतांनी विजय

अतुल पाटील यांच्या निधनानं ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अतुल पाटील यांना क्रिकेट खेळताना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचं शनिवारी निधन झालं होते. अतुल पाटील यांनी ढवळी ग्राम पंचायत निवडणुकीत 57 मतांनी विजय मिळवला आहे. ढवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अतुल पाटील हे सदस्यपदी विजयी झाले. मात्र, विजय जाहीर होण्या पूर्वीच त्यांचं निधन झालं, त्यामुळे, ढवळी ग्राम पंचायत निवडणुकीत गड आला पण सिंह गेला अशी भावना ग्रामस्थांची आहे.

क्रिकेटच्या मैदानात मृत्यू

अतुल पाटील हे ढवळी गावचे उपसरंपचपदावर कार्यरत होते. तासगाव व ढवळी येथील केमिस्ट, सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे विद्यमान संचालक, अतुल पाटील यांचा क्रिकेट खेळत असताना शनिवारी मृत्यू झाला होता. आटपाडी येथे संघटनेच्या क्रिकेट मॅचेस सुरू असताना ग्राउंडवर क्रिकेट खेळत असतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने अतुल पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

सांगलीत काँग्रेस आघाडीवर

सांगली जिल्ह्यात एकूण 152 ग्रामपंचायतची निवडणूक होती. सांगली जिल्ह्यात आजचे निकाल आणि अगोदर बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत अशा एकूण निकाल जाहीर करण्यात आले. यात काँग्रेसच्या पॅनलने सर्वाधिक ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. यात काँग्रेस – 49, राष्ट्रवादी 34, स्थानिक आघाडी 34, भाजपा 20, शिवसेनेनं 15 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

सांगली ग्रामपंचायत निकाल काँग्रेस पॅनल – 49 राष्ट्रवादी पॅनल – 34 स्थानिक आघाडी – 34 भाजपा पॅनल – 20 शिवसेना पॅनल – 15

संबंधित बातम्या:

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | ‘भाजप सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल’, चंद्रकांत पाटलांचा दावा

बीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरशी, जिल्ह्यात मनसेनेही खातं उघडलं, भाजपला मोठा झटका

(Maharashtra gram panchayat election results 2021Sangli Atul Patil won election after death)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.