AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातापायाला मुंग्या, श्वास घेताना अडचण अन्… GBS आजार नक्की काय? लक्षण कोणती? कशी घ्याल काळजी?

महाराष्ट्रात गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा दुर्मिळ आजार विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. थकवा, झिणझिण्या आणि पाय-हातांमधील कमजोरी ही प्रमुख लक्षणे आहेत. स्वच्छता, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी आहार यांच्याद्वारे GBS पासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हातापायाला मुंग्या, श्वास घेताना अडचण अन्... GBS आजार नक्की काय? लक्षण कोणती? कशी घ्याल काळजी?
GBS Symptoms Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 27, 2025 | 2:52 PM
Share

GBS Symptoms Treatment And Care : राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराने धुमाकूळ घातला आहे. सध्या महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळले आहेत. यातील 14 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. तर पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे सध्या भीतीदायक वातावरण पाहायला मिळत आहे. गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे GBS रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. सध्या हा आजार नेमका काय? या आजाराची लक्षणं काय? कशी काळजी घ्याल? याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.

गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) कशामुळे होतो?

गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजेच GBS हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. काही हजारो लोकांपैकी एकाला हा आजार होतो. एखादा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे हा आजार होत असल्याचा अंदाज आहे. बहुतांश आजारात जर एखाद्या रोगाने हल्ला केला, तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण GBS रोग हा असा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. GBS या रोगाची लागण झाल्यानतंर तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यात नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाहीत. तसेच मेंदूला सूचनांचं पालन करणंदेखील स्नायूंना शक्य होत नाही आणि तसेच इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात.

दूषित पाणी, अस्वच्छता हे या आजाराला कारणीभूत ठरते. मात्र वेळीच उपचार केल्यावर याची तीव्रता कमी होऊ शकते. काहीही लक्षणं दिसल्यास लवकर डॅाक्टरांकडे जावे. तसेच घाबरून जाऊ नये, असा सल्ला महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) ची लक्षण काय?

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं या आजाराची लक्षणं आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दल एक पत्रक शेअर केले आहे. या पत्रकात संपूर्ण आजाराबद्दलची नोंद करण्यात आली आहे. थकवा किंवा हातापायाला मुंग्या येणं, झिणझिण्या येणं हे या आजाराचे प्राथमिक लक्षण असल्याचे बोललं जात आहे. याची सुरुवात पायांपासून होते आणि नंतर ही लक्षणं हातापासून चेहऱ्यापर्यंत पसरतात. काहींना पाठदुखी होते. तसेच काहींना श्वास घ्यायला – गिळायला त्रास होतो.

अचानक पाय किंवा हाताला कमजोरी येणे

लकवा मारणे.

अचानकपणे चालताना त्रास होणे

शरीर कमजोर झाल्यासारखे वाटणे

खूप दिवस डायरियाचा त्रास होणे

हातापायाला मुंग्या येणे

स्नायू कमकुवत होतात

हाता- पायांतलं त्राण जातात

श्वास घेताना किंवा गिळायला त्रास होतो.

GBS हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तींना होतो. यात जास्त वय असलेल्या व्यक्ती, त्यातही प्रामुख्याने पुरुषांना या आजाराचा धोका संभवतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे.

काय काळजी घ्याल?

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा आजार फारच दुर्मिळ असल्याने याबद्दल सतर्क राहणं गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांने पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. दररोज पिण्याचे पाणी बदलावे. तसेच पाणी उकळून प्यावं. यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खावं. यामुळे तुम्हाला पोषकतत्त्व मिळतात. तसेच वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या. अस्वच्छ ठिकाणी, रस्त्यावरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे. शिजवलेले आणि कच्चं अन्न एकत्र ठेवू नये, या उपयांद्वारे तुम्ही गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) लागण होणे टाळू शकता.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.