AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक कार्यकर्त्यांची, पण उमेदवारी अर्जासाठी रेट ठरले; कोणता पक्ष किती रक्कम घेतो?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षांकडून उमेदवारी अर्जासाठी शुल्क आकारले जात आहे. भाजप, मनसे, काँग्रेस मोफत अर्ज देत आहेत. कार्यकर्त्यांकडूनच शुल्क आकारल्याने इच्छुकांमध्ये नाराजी आहे, तर राजकीय वर्तुळात यावर चर्चा सुरू आहे.

निवडणूक कार्यकर्त्यांची, पण उमेदवारी अर्जासाठी रेट ठरले; कोणता पक्ष किती रक्कम घेतो?
maharashtra parties
| Updated on: Nov 27, 2025 | 2:57 PM
Share

पवन येवले, टीव्ही 9 मराठी नाशिक : निवडणुका म्हटल्या की ते नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या देखील असतात. सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते, असे म्हटले जाते. मात्र याच निवडणुकीत गोरगरीब कार्यकर्त्यांकडून इच्छुक म्हणूनच हजारो रुपयांची रक्कम घेतली जाते. ज्या पक्षाच्या सतरंज्या उचलल्या, त्याच पक्षाकडून अर्जासाठीची हजारो रुपयांची रक्कम घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आता आपण कोणता पक्ष किती रक्कम घेतो, हे पाहणार आहोत.

राज्यभरात लोकसभा, विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणूक सुरू झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र या कार्यकर्त्यांना पक्षाचा एबी फॉर्म फॉर्म किंवा थेट उमेदवारी अर्जच न देता इच्छुकांचा अर्ज दिला जात आहे. त्यासाठी देखील हजारो रुपये घेतले जात आहेत. एकीकडे भाजपमध्ये इच्छुकांची अधिक संख्या वाढत असताना भाजपासह मनसे आणि काँग्रेसकडून इच्छुकांना मोफत उमेदवारी अर्ज दिला जात आहे. तर शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट यांच्याकडून इच्छुकांना उमेदवारी अर्ज देताना त्यांच्याकडून शुल्क आकारले जात आहे.

शिवसेनेकडून तब्बल पाच हजार रुपये

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून तब्बल पाच हजार रुपये इच्छुक उमेदवाराकडून घेतले जात आहेत. या संदर्भात बोलताना ठाकरेंच्या सेनेने हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून आमचे आमदार पक्ष चिन्ह चोरले असा आरोप करत थेट भाजपवरच निशाणा साधला. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांना आम्ही तीन हजार रुपये शुल्क घेत असून जे उमेदवार खरंच निवडून येण्यासारखे आहेत. कर्तबगार आहेत, त्यांच्याकडून आम्ही शुल्कही घेत नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर दुसरीकडे अर्जासाठी शुल्क आकारणे हे अन्यायकारक असल्याची भावना अनेक इच्छुकांमध्ये असली तरी निवडणुका डोळ्यासमोर असल्याचे पाहून अनेकांनी माध्यमांसमोर बोलणं टाळल आहे. तर अनेक पक्षातील आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज खरेदी केले आहेत.

कोणाकडून किती पैसे?

ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्जासाठी इच्छुकांकडून 5 हजार रुपये आकारले जात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून ३ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून २ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जनरल कॅटेगरीसाठी 2500 रुपये तर ओबीसीसाठी 1500 रुपये शुल्क आकारला जातो. त्यासोबत भाजप मनसे आणि काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांसाठी मोफत अर्ज आहेत

भाजपसह काँग्रेस, मनसे आपल्या इच्छुक उमेदवारांना मोफत उमेदवारी अर्ज देत आहे. भाजपकडून जवळपास 700 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर मनसेने 160 उमेदवारांना निशुल्क उमेदवारी अर्ज दिल्याची माहिती मनसे नेते दिनकर पाटील यांनी दिली आहे. आम्ही गोरगरीब सर्वसामान्य उमेदवारांचा विचार करून उमेदवारी अर्ज देत असल्यास दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.

केवळ अर्जासाठी शुल्क

दरम्यान नेत्यांच्या निवडणुका झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. यातच अनेक पक्ष आपला कार्यकर्ता असलेल्या इच्छुक उमेदवाराकडून केवळ अर्जासाठी शुल्क घेत आहे. त्यामुळे पक्षाची ही पैसे घेऊन केवळ अर्ज देण्याची भूमिका अन्यायकारक असल्याची चर्चा सध्या राजकीय चावडींवर रंगू लागली आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.