AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…तर आमचं सरकार सत्तेत आलं नसतं”; महायुतीतील बड्या मंत्र्यांचे विधान

महाराष्ट्रातील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विजयाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या मते, या योजनेमुळे महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि सरकार सत्तेत आले.

...तर आमचं सरकार सत्तेत आलं नसतं; महायुतीतील बड्या मंत्र्यांचे विधान
devendra fadnavis
| Updated on: Mar 02, 2025 | 4:33 PM
Share

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात 1500 रुपये थेट जमा करण्यात आले. जर आमची सत्ता आली तर आम्ही लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देऊ, असेही सांगण्यात आले. या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. आता या योजनेवरुन एका महायुतीतील मंत्र्याने मोठा दावा केला आहे. लाडकी बहीण योजना आली नसती तर आमचे सरकार सत्तेत आले नसते, असे विधान महायुतीतील मंत्र्याने केले आहे.

पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं, पण आम्ही भगव्यासोबत निष्ठा राखली. लाडकी बहीण योजना आली नसती तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली असती. आमचे सरकार सत्तेत आले नसतं, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्ही शिवसेनेशी गद्दारी केली नाही, तर भगव्यासोबत निष्ठा राखली

आम्ही तत्त्वांची कधी फारकत घेतली नाही. ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्रात कशी आहे ते आपल्याला माहिती आहे, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आपण हिंदू आहे. याचा आपल्याला अभिमान आहे. या निवडणुकीत लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं. हे शिवसेनाप्रमुख यांच्या तालमीतले कार्यकर्ते नाहीत. यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. पण आम्ही शिवसेनेशी गद्दारी केली नाही. तर भगव्यासोबत निष्ठा राखली आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

“त्या दिवशी आम्ही ठरवलं की उठाव करायचा आहे…”

“एवढेच नव्हे तर लाडकी बहीण योजना आली नसती तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली असती. आमचे सरकार सत्तेत आले नसते, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. रक्ताचं पाणी करून आम्ही शिवसेना वाढवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला सांगायचे त्या आदेशाचे आम्ही पालन करायचा. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे ज्या दिवशी काँग्रेसची युती केली त्या दिवशी मी आपलं दुकान बंद करेल. ज्या दिवशी आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने काँग्रेसची युती केली. त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की आम्हाला उठाव करायचा आहे. त्यावेळी आम्ही सुरत गुवाहाटीमार्गे उठाव केला. अडीच वर्ष महायुतीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी दमदार काम केल्यामुळे महायुतीच्या 277 जागा विजयी झाल्यात”, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजना आली नसती तर…

“जिल्ह्यात विरोधकांचा एकही आमदार लोणचं घालण्यासाठी शिल्लक राहिला नाही. आम्ही शोपीस आमदार नाही. जनतेसाठी कधीही आमचे दरवाजे खुले असतात. मी सहज मंत्री झालो नाही. मी निवडून येईल का नाही, याचीही मला शाश्वती नव्हती. आमच्या शिवसेना प्रमुखांचं म्हणणं हेच होतं. महाराष्ट्रामध्ये मराठी, महाराष्ट्राच्या बाहेर आपण हिंदू म्हणून काम करू. आपण हिंदू आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. हिंदूस्थानामध्ये राहतो तो हिंदू महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठी. या भरोवसावर शिवसेना वाढली. त्याच माध्यमातून एकनाथराव शिंदे काम करत आहे. लाडकी बहीण योजना आली नसती तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली असती व आमच्या सरकार सत्तेत आले नसतं”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान