AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: नाणेफेकीचा कौल जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग 11 बाबत गिल म्हणाला की…

India vs Sri Lanka 1st Test Match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार शुबमन गिल याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्लेइंग 11 बाबत आपलं म्हणणं मांडलं आहे.

IND vs SL: नाणेफेकीचा कौल जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग 11 बाबत गिल म्हणाला की...
IND vs SL: नाणेफेकीचा कौल जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग 11 बाबत गिल म्हणाला की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 15, 2026 | 9:43 AM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचं ध्येय ठेवून टीम इंडिया मैदानात उतरली आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी आजपासून सुरू होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे करो या मरोची स्थिती असणार आहे. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. शुबमन गिलने खेळपट्टीचा अंदाज घेऊन लगेचच फलंदाजीचा निर्णय घेतला. कारण गॉलच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी मोठी धावसंख्या करण्याची संधी असते. तसेच तिसऱ्या दिवसापासून ही खेळपट्टी फिरकीला मदत करते. त्यामुळे नाणेफेकीचा टीम इंडियाच्या बाजूने लागल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. विशेष म्हणजे भारताचा हा 600 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालं आहे.

काय म्हणाला शुबमन गिल?

भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने प्लेइंग निवडताना स्पष्ट सांगितलं की मागच्या सामन्यात खेळलेला संघ मैदानात उतरेल. शुबमन गिल म्हमाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, खेळपट्टी चांगली दिसत आहे आणि हवामानही चांगले आहे, त्यामुळे आशा आहे की आजचा क्रिकेटचा दिवस आमच्यासाठी चांगला असेल. आम्ही मागच्या सामन्यात खेळवलेल्या त्याच 11 खेळाडूंना कायम ठेवले आहे. आमच्या संघात पाच गोलंदाज आहेत, दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाज. माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते, आणि या प्रसंगी तर ते अधिकच खास आहे. आमच्यासाठी स्वातंत्र्य दिन आणि 600वा कसोटी सामना, त्यामुळे आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.’

श्रीलंकेचा कर्णधार म्हणाला की…

श्रीलंकेकडून ऑफस्पिनर केशरा नुवान्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने त्याने सराव सामन्यात केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना बाद केलं होतं. श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा म्हणाला की, ‘आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. दोन वेगवान गोलंदाज, दोन फिरकी गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडू. हे एक प्रतिष्ठित मैदान आहे, या सामन्यात कर्णधारपद भूषवताना मला खूप आनंद होत आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): लाहिरू उदारा, निशान मदुष्का, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, अशिथा फर्नांडो.

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...