AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election : मोठी बातमी, विधान परिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नाव जाहीर

MLC Election : महाराष्ट्रात विधान परिषद पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करताना कुठेतरी समतोल साधला आहे.

MLC Election : मोठी बातमी, विधान परिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नाव जाहीर
BJP MLC CandidatesImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 16, 2025 | 10:39 AM
Share

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्या अर्ज दाखल करायचा आहे. संदीप जोशी हे नागपूरमधून येतात. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे.

संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत. संजय केनेकर हे पक्षाचा ओबीसी चेहरा आहेत. दादाराव केचे हे आरवीचे माजी आमदार आहेत. विधान परिषद पोटनिवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांची मोठी भाऊगर्दी भाजपमध्ये पहायला मिळाली होती. संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भाजपने समतोल साधला का?

संजय केनेकर यांनी बूथ लेव्हलपासून पक्षासाठी काम केलं आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना महामंत्री पद देण्यात आलं होतं. केनेकर यांच्यासारख्या बूथ लेव्हलपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आमदारकी मिळणं हा त्यांचा एकप्रकारे सन्मान आहे. दादाराव केचे हे आर्वीचे माजी आमदार आहेत. सुमीत वानखेडे हे जे देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी होते. त्यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी दादाराव केचे यांना पक्षाकडून कुठतेरी थांबण्याचे निर्देश देताना विधान परिषदेचा शब्द दिला असावा. भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करताना कुठेतरी समतोल साधला आहे. भाजपमध्ये सुद्धा अनेक इच्छुकांनी विधान परिषद लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनपर्यंत त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.