AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्र्या काढाच आता ! राज्यात आजपासून पावसाच्या सरी, 19 ते 25 मे सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात 19 ते 25 मे दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर जास्त असेल. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अरबी समुद्रात 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

छत्र्या काढाच आता ! राज्यात आजपासून  पावसाच्या सरी, 19 ते 25 मे सतर्कतेचा इशारा
राज्यातील पावसाचे अपडेट्सImage Credit source: social media
| Updated on: May 19, 2025 | 8:17 AM
Share

कडक उन्हामुळ वैतागलेल्या, घामाच्या धारा, चिकचिक नकोशी झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तसेच 19 ते 25 मे दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण आणि घाट परिसरात अधिक पाऊस पडू शकतो. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

19 ते 25 मे दरम्यान रहा सतर्क

19 ते 25 मे दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी, 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे राज्यात आज,सोमवारपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकण, घाट परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक असू शकतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बुधवारी आणि गुरुवारी 35 ते 45 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांचा वेग 55 किलोमीटर प्रतितास एवढा होऊ शकतो.

राज्यात 19 ते 25 मे या कालावधीत पावसाचा जोर वाढून स्थानिक पातळीवर सखल भागामध्ये पाणी साचणे, अचानक पूरस्थिती निर्माण होणे, कमकुवत झाडे पडणे, झाडांच्या फांद्या तुटून पडणे, रस्ते, विमान वाहतूक, बोट वाहतूक, रेल्वे यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमकुवत बांधकाम, झाडे येथे पावसामध्ये आश्रय घेऊ नये, अशी सूचना मनपाने केली आहे.

अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्याला पुन्हा झोडपलं

दरम्यान वादळी वारा आणि अवकाळी पावसाने अमरावती जिल्ह्याला पुन्हा झोडपलं आहे. अमरावतीच्या वरूड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, धारणी तालुक्यासह इतरही भागात वादळीवारा आणि पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कांदा, केळी,संत्रा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झालं. मेळघाट मध्ये आणि वरूड मध्ये अनेक घरावरील तीन पत्रे उडाले. तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कांदा पिकांचेही मोठे नुकसान झाले.

गंगापूर धरणात पाच दिवसात वाढले 2टक्के पाणी

नाशिकच्या गंगापूर धरणात पाच दिवसात दोन टक्के पाणी वाढले. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली .गंगापूर धरणात सध्या 46.41% पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र आता उन्हाळ्यात झालेल्या पाणीसाठा वाढीमुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 44.40% पाणीसाठा होता. मान्सून वेळेत दाखल झाल्यास नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मात्र कश्यपी गौतमी गोदावरी आळंदी धरणात आणि साठा कमी असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.