Maharashtra, Mumbai Rains News LIVE : मुंबईच्या समुद्रात एकामागून एक दोन संशयित जहाजे आढळल्याने खळबळ

Maharashtra, Mumbai Rains News LIVE Updates In Marathi : राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 4 दिवसांपासून पाऊस अजिबात थांबत नाही. अतिवृष्टी झाली. त्यामध्येच आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

Maharashtra, Mumbai Rains News LIVE : मुंबईच्या समुद्रात एकामागून एक दोन संशयित जहाजे आढळल्याने खळबळ
Maharashtra News
| Edited By: | Updated on: Jul 08, 2026 | 10:13 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Jul 2026 10:13 AM (IST)

    मुंबईत पड’झाड’ सुरूच, लोअर परेल येथे जुनं झाड कोसळलं

    मुंबईत झाडं पडण्याच्या घटना सुरूच असून लोअर परेल येथे एक जुनं झाडं कोसळलं आहे.  पावसामुळे हे मोठं झाड कोसळून खाली पडलं. मात्र सुदैवाने कोणीतीह जीवितहानी झालेली नाही.

  • 08 Jul 2026 10:07 AM (IST)

    इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद

    आळंदीत आज पावसाचा जोर कमी झाला असला, तरी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने आज होणारा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

    इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी ओलांडल्याने शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.


  • 08 Jul 2026 09:59 AM (IST)

    एपीएमसी भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर साचलं पाणी

    नवी मुंबई- मुसळधार पावसामुळे एपीएमसी भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर पाणी साचलं असून व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांना मनस्ताप सहन करावा करतोय. नवी मुंबईतील आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या एपीएमसी भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे बाजाराच्या प्रवेशद्वारावर जलभराव झाल्याने व्यापारी, शेतकरी, ग्राहक तसंच इतर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • 08 Jul 2026 09:50 AM (IST)

    मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने

    नालसोपारा-वसई रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर आजही पाणी साचलेलंच आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा आज थोडं पाणी ओसरलं असलं तरी ट्रॅकवर अद्याप पाणी आहेच. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने धावत आहेत. तर मध्य रेल्वेवरील वाहतूकसुद्धा उशिराने आहे.

  • 08 Jul 2026 09:40 AM (IST)

    सोलापुरातील उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढली

    पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापुरातील उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. मागील चार दिवसांत झालेल्या पावसामुळे उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. उजनी धरणात 25 टक्के पाणीसाठा वाढल्याने सोलापूरकर सुखावले आहेत. काल उजनी धरणाची पाणी पातळी वजा 20 टक्के होती तर आज 5 टक्के प्लसमध्ये आलं आहे. गेल्या 24 तासांत 13.5 टीएमसी पाणीसाठा उजनीत वाढला आहे.


  • 08 Jul 2026 09:25 AM (IST)

    कर्जत तालुक्यातील पेठ आंबिवलीचा बंधारा फुटला

    कर्जत तालुक्यातील पेठ आंबिवलीचा बंधारा फुटला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंधारा फुटताच चिल्लर नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर आपत्ती व्यवस्थापन पथकं सज्ज करण्यात आली आहेत.

  • 08 Jul 2026 09:15 AM (IST)

    मुंबईच्या समुद्रात एकामागून एक दोन संशयित जहाजे आढळल्याने खळबळ

    मुंबईच्या समुद्रात एकामागून एक दोन संशयित जहाजे आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनोरी बीचनंतर आता मढच्या कोळीवाडा समुद्रकिनाऱ्याजवळही एक संशयित जहाज दिसून आलं आहे. हे जहाज काल दिसलं होतं. सध्या संबंधित यंत्रणा या जहाजाचा मालक कोण आहे आणि हे जहाज मढला कसं पोहोचलं याचा तपास करत आहेत. तीन दिवसांपूर्वी गोराईच्या मनोरी बीचवर एक संशयित जहाज सापडलं होतं. ते जहाज भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताब्यात आणि निगराणीत घेतलं आहे. आता काल संध्याकाळी मालाडच्या मढ कोळीवाडा जवळ समुद्रात आणखी एक हा संशयित जहाज दिसत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज किनाऱ्यापासून सुमारे 7-8 किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. हे जहाज नेमकं कुठून आलं, ते कोणत्या देशाचं आहे आणि त्यात काय सामान आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तटरक्षक दल आणि स्थानिक पोलीस मिळून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 08 Jul 2026 09:06 AM (IST)

    येवला-नांदगाव राज्य क्रमांक 25 वर दुधाचा टँकर पलटला

    येवला-नांदगाव राज्य क्रमांक 25 वर घाटात  दुधाचा टँकर पलटल्याने मोठा अपघात झाला आहे. येवल्याच्या मुळुबाई घाटात टँकरचा ब्रेक न लागल्यामुळे भीषण अपघात झाला. टँकर घाटात जाऊन पलटी झाल्याने टँकरचं मोठं नुकसान होऊन चालक जखमी झाला आहे. जखमी चालकावर येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 08 Jul 2026 08:55 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्हयास यलो अलर्ट ; जिल्हयात सर्वदूर पावसाची हजेरी

    दोन दिवसांपासून पावसाची संततधार. तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. भंडारदरा ‌, मुळा आणि निळवंडे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ. भंडारदरा 50% , मुळा 40 तर निळवंडेत 26 टक्के पाणीसाठा. खरिप पेरणीला मिळणार मुहूर्त. गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके रखडली…

  • 08 Jul 2026 08:50 AM (IST)

    त्र्यंबकेश्वरात पहाटेच्या मुसळधार पावसाने पूरसदृश परिस्थिती

    शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह. जोरदार पावसात रस्त्यांवर नदीसारखी स्थिती. पावसाच्या पाण्याचा निचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित. स्थानिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

  • 08 Jul 2026 08:40 AM (IST)

    पुणे मुंबई रेल्वे आजही बंद…

    घाट परिसरातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान झालेल्या भूस्खलामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीत होती रेल्वे मार्गाची दुरुस्ती न झाल्यामुळे मंगळवारी 14 रेल्वे गाड्या रद्द झाल्या आणि 13 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले रेल्वे सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले आज बुधवारी ही पुणे मुंबई रेल्वे बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

  • 08 Jul 2026 08:30 AM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यात पहाटेपासून पावसाची पावसाची रिपरिप सुरू

    शेती पिकांना मोठा जीवनदान शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 8 दिवसापासून पावसाच्या शेतकरी प्रतिशत होता. तालुक्यात हा पाऊस सर्वत्र होत आहे

  • 08 Jul 2026 08:25 AM (IST)

    24 तासात 140 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद..

    सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये संततधर पाऊस सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे,गेल्या 24 तासात 146 मिलिमीटर इतकया पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाण्यासाठी झपाट्याने वाढ झाली असून 34.40 टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणामध्ये आता पाणी साठा झाला असून धरण 52 टक्के भरले आहे.धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून धरणामध्ये 19 हजार क्यूसेक पाण्याचा आवक होत आहे.

  • 08 Jul 2026 08:23 AM (IST)

    पुण्यातील एकता नगर परिसरात मुठा नदीचे पाणी शिरले

    सोसायटीच्या पार्किंग मध्ये शिरले पाणी. अनेक चारचाकी आणि दुचाकी देखील पाण्याखाली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. खडकवासला धरणातून 270200 क्यूसेक्स सोडण्यात आलंय पाणी…

  • 08 Jul 2026 08:20 AM (IST)

    उल्हास नदी धोक्याच्या पातळी जवळ

    बदलापुरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीही कर्जत परिसरात पडणाऱ्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदीच्या प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. उल्हास नदी ही इशारा पातळीवरून वरून वाहत आहे . मात्र बदलापूरात पावसाचा जोर कमी असल्याने बदलापूर शहरात अजून कुठेही पाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या नाहीयेत , खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली आहे .

  • 08 Jul 2026 08:20 AM (IST)

    पुण्यातील मुख्य रस्ते उद्या राहणार बंद..

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे उद्या पुणे शहरात एकत्रित आगमन होत आहे या सोहळ्या दरम्यान शहरातील वाहतूक सुरक्षित आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून गुरुवारी पहाटेपासूनच पालखी आगमन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून आजही मोठा इशारा देण्यात आला. जून महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही त्यापेक्षा जास्त पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाला. मुंबई, पुणे, नाशिक, कोकणात पावसाने धुमाकूळ घातला. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. काही धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला. मुंबईत मोठ्या प्रमाणात झाड कोसळली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आजही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुढील काही तासात पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर आमदारांची बैठक घेतली. मोठी बंडखोरी ठाकरेंच्या शिवसेनेत झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाईल. तश्या घडामोडी दिल्लीत घडत आहेत. यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Follow Us