Maharashtra Municipal Election Result 2026 : गड गमावला, ठाकरेंचा मोठा गेम, शिंदेंनाही धक्का, छत्रपती संभाजीनगरात एमआयएम…
महापालिका निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागत असून, छत्रपती संभाजीनगरातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

गुरुवारी महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडलं, आज आता मतमोजणी सुरू आहे, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात भाजप सध्या तब्बल 905 जागांवर आघाडीवर असून, सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर असून, शिवसेना शिंदे गट 223 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसचे उमेदवार 187 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. छत्रपती संभाजीनगर हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा गड मानला जातो, मात्र यावेळी या महापालिकेत कमळ फुललं आहे. तर दुसरीकडे एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला आणखी एक गड गमावला आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार छत्रपती संभाजीनगरात भाजप तब्बल 23 जागांवर आघाडीवर आहे. तर एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली असून, एमआयएमचे उमेदवार 15 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार देखील 15 जागांवर आघाडीवर असून, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केवळ 8 जागांवर आघाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडीला देखील या महापालिकेत चांगलं यश मिळालं आहे, वंचित बहुजन आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत.
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election Results 2026 : भाजपाचा गड गेला, मोठी खळबळ...
Latur Nagarsevak Election Results 2026 : लातूर महापालिकेतून हैराण करणारी अपडेट...
Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 166, 73 चा निकाल काय?
Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 147, चारचा निकाल काय?
Pune Election Results 2026 : पुण्यात भाजपच ठरतोय सरस, राष्ट्रवादीलाही मोठा फटका
Solapur Election Results 2026 : सोलापूरमध्ये प्रभाग 24 चा निकाल समोर, कोण जिंकलं ?
छत्रपती संभाजीनगरात शिवसेना शिंदे गटाला आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर हा सुरुवातीपासून शिवसेनेचा गड मानला जातो. यावेळी मात्र या गडाला भाजपानं सुरुंग लावला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांची या महापालिकेत प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाहीये, याउलट एमआयएमने मात्र या महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. तब्बल 15 जागांवर एमआयएमचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपने आता महापौर पदाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे.
