Maharashtra Municipal Election Result 2026 : राज्यात पुन्हा भाजपची लाट; किती महापालिकेत कमळ फुललं?
Municipal Election Result : गुरुवारी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पार पडलं, आज आता मतमोजणीला सुरुवात झाली असून, राज्यात भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. धक्कादायक निकाल हाती येत आहे.

गुरुवारी राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी मतदान पार पडलं, आज आता मतमोजणीला सुरुवात झाली असून, जसा जसा निकाल हाती येत आहे, तस तशी भाजप राज्यात जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीत देखील भाजपला मोठं यश मिळालं आहे. पुण्यामध्ये भाजपनं राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला चांगलाच धक्का दिला आहे. तर मुंबईमध्ये ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती पिछाडीवर आहे. भाजप शिवसेना शिंदे गटाची युती आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यातील 29 महापालिकांपैकी तब्बल 26 महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, सांगली, कल्याण डोंबिवली अशा अनेक महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे.
भाजप कुठे -कुठे आघाडीवर
Municipal Election 2026
BMC Election Results 2026 : मुंबईत एकनाथ शिंदे यांना थेट धक्का, दोन...
भाजपाची मुंबई महापालिकेत विजयी वाटचाल, तब्बल 80 जागांवर आघाडी..
Mumbai Election Results Live 2026 : मतमोजणीच्या 2.30 तासानंतर मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
Mumbai Election Results Live 2026 : मुंबईच्या सायनमधून भाजपसाठी टेन्शन वाढवणारी बातमी
Pune Election Results 2026 : पुणे मनपा निवडणूक - प्रभाग क्रमांक 36 चा निकाल हाती
Sangli Election Results 2026 : सांगली - महापालिका निवडणूक निकाल
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 741 उमेदवार आघाडीवर आहेत, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. तर 190 जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असून, शिवसेना शिंदे गट राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार 154 जागांवर आघाडीवर आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार मुंबई महापालिकेमध्ये भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे. तर नवी मुंबईमध्ये देखील भाजप 66 जागांवरच आघाडीवर आहे. ठाण्यात मात्र शिवसेना शिंदे गट आघाडीवर असून, शिवसेना शिंदे गटाचे 20 उमेदवार पुढे आहेत, तर भाजपचे 15 उमेदवार आघाडीवर आहे. नाशिकमध्ये देखील भाजप आघाडीवर असून, 10 उमेदवरा पुढे आहेत. पुण्यात पुन्हा एकदा भाजपानं एकहाती सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली असून, तब्बल 48 जागांवर भाजप आघाडीवर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप तब्बल 70 जागांवर आघाडीवर आहे. तर पनवेलमध्ये देखील भाजपानं मुसंडी मारली असून, पनवेलमध्ये 22 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये 17 जागांंवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. मिरा भाईंदरमध्ये भाजपचे उमेदवार 32 जागांवर आघाडीवर आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपचे उमेदवार 14 जागांवर आघाडीवर आहे. तर भिवंडी निजामपूरमध्ये देखील भाजपच आघाडीवर असून, 9 जागांवर भाजप उमेदवार पुढे आहेत.
