Maharashtra News LIVE: शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदे यांच्याकडे

Maharashtra News LIVE: अभिनेते विजय हे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तमिळनाडूच्या नेहरू स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून बहुमतासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू होती.

Maharashtra News LIVE: शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदे यांच्याकडे
live blog
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 11, 2026 | 7:40 AM

तमिळगा वेत्री कझगमचे (टीव्हीचे) प्रमुख विजय यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन 120 सदस्यांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलं. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्याबळावरून सुरू असलेलं नाट्य अखेर संपुष्टात आलं. आज (रविवार) सकाळी दहा वाजता चेन्नई इथल्या नेहरू स्टेडियमवर विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हीसीके आणि आयएमयूएल या पक्षांनी पाठिंब्याचं पत्र सोपवल्यानंतर तमिळनाडू विधानसभेत सत्तारुढ सदस्यांचं संख्याबळ बहुमताच्या पलीकडे गेलं. गेल्या दोन दिवसांपासून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेची धावपळ सुरू होती. यासह राज्यातील, देश-विदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 May 2026 06:53 PM (IST)

    अमरावतीत दोन बहिण भावांसह चौघांचा बुडून मृत्यू

    अमरावतीच्या घातखेडा तलावात पोहायला गेलेल्या दोन बहिण भावांसह चौघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोनाली नरेंद्र जोशी ( १६), आदीत्य नरेंद्र जोशी (१२), पायल बबलू पंडीत( २१०, यश गजानन काकणे( १३ -अशी बुडून मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

  • 10 May 2026 06:35 PM (IST)

    वाशीममध्ये पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला

    वाशीममध्ये आज पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला असून आजचे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. पुढील काही दिवसात पारा ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवकाळी पावसानंतर आता पुन्हा उष्णता वाढली आहे. हवामान विभागाने उष्णतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 10 May 2026 06:13 PM (IST)

    शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदे यांच्याकडे

    शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. १६ मे पासून पुढील २ महिने श्रीकांत शिंदे एक्शन मोडवर राहणार आहेत. मनपा निवडणुकीपुर्वी राहूल शेवाळे यांच्याकडे मुंबईची जबाबदारी सोपवण्यात आली होती.आता मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रिंकात शिंदे आणि त्यापाठोपाठ राहूल शेवाळे , निलेश राणे आणि योगेश कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तिघांकडे प्रत्येकी दोन- दोन लोकसभेची जबाबदारी दिली आहे. राहूल शेवाळे – उत्तर मध्य मुंबई , दक्षिण मध्य मुंबई, निलेश राणे – ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई , योगेश कदम – मुंबई ऊत्तर, मुंबई ऊत्तर पश्चिम आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे सगळ्या लोकसभेचा चार्ज असणार आहे.

  • 10 May 2026 05:51 PM (IST)

    उल्हासनगरमध्ये पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाण्याची नासाडी

    उल्हासनगरमध्ये पाइपलाईन फुटली

    फुटलेल्या पाइपलाईनमधून लाखो लिटर पाणी वायाला

    एकीकडे पाणी कपात, दुसरीकडे उल्हासनगर पालिकेचा हलगर्जीपणा उघड

    शहाड पूर्वेतील उडाण पुलाजवळ पाइपलाईन फुटली

    पाण्याच्या उंच फवाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी

     

  • 10 May 2026 04:48 PM (IST)

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक प्रकरण, गुन्हा दाखल होताच मनसे कार्यकर्ते आक्रमक

    वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई फेक आणि सुपार्‍या फेकल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह त्यांच्या इतर तीन सहकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर मनसेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कोणी बोलत असेल तर अजिबात सहन करून घेणार नाही अन्यथा यापेक्षाही जोरदार पद्धतीने स्वागत करू असं मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटलं आहे.

  • 10 May 2026 04:38 PM (IST)

    माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ डिझेल टँकर पलटी

    बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ डिझेलने भरलेला टँकर अचानक पलटी झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले आहे. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सांडलेले डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडाली आहे.

  • 10 May 2026 04:15 PM (IST)

    वाशीममध्ये पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला, तापमान 42 अंश सेल्सिअसवर

    वाशीममध्ये पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला

    आजच तापमान ४२ अंश सेल्सिअसवर

    पुढील काही दिवस पारा ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता

    अवकाळी पावसानंतर पुन्हा वाढली उष्णता

    हवामान विभागाचा उष्णतेचा इशारा

    जिल्हा प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

  • 10 May 2026 03:54 PM (IST)

    बुलढाणा : मेहकर ते जानेफळ रोडवरील तीन दुकानांना आग

    बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर शहरातील जानेफळ रोडकडे जाणाऱ्या पावर हाऊस जवळील तीन दुकानांना आज अचानक आग लागली. या आगीमध्ये तीन दुकानाचे अतोनात नुकसान झाले आहे. यात कपड्याचे दुकान, हॉटेल, चहा पत्तीचे दुकान जळाले आहे.

  • 10 May 2026 03:40 PM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या रोहा दौऱ्यावर; विकास कामांचे भूमिपूजन

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या सकाळी साडेदहा वाजता रायगड जिल्ह्यातील रोहा दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रायगड दौरा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रोहा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

  • 10 May 2026 03:25 PM (IST)

    बीड : तालखेड फाट्याजवळ डिझेल टँकर पलटी

    बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ डिझेलने भरलेला टँकर अचानक पलटी झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले आहे. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सांडलेले डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडवली. कोणी बादल्या, कोणी कॅन, तर कोणी भांडी घेऊन डिझेल भरण्यासाठी धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

  • 10 May 2026 03:12 PM (IST)

    बुलढाणा : महामार्गाच्या कामाच्या धुळीमुळे नागरिक त्रस्त

    मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या चिखली ते जाफराबाद या महामार्गाचे काम सुरू आहे. गेले सहा महिन्यापेक्षा जास्त काळापासून हे काम सुरू असून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडताना दिसते आहे. तर महामार्गाच्या दोन्ही बाजूने नागरिकांची घर असल्याने धूळ उडाल्याने त्यांना मोठा सहन करावा लागतो. अनेक नागरिकांना आता या धुळीची अलर्जी होत असून श्र्वसनाचा त्रास ही सुरू झाला आहे.

  • 10 May 2026 02:55 PM (IST)

    चाकणकरांच्या चौकशीसाठी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते दाखल

    रूपाली चाकणकरांच्या चौकशीसाठी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते पोहोचल्या… रूपाली चाकणकर यांची SIT प्रमुखांकडून केली जाणार चौकशी…. महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी SIT प्रमुख दाखल

  • 10 May 2026 02:45 PM (IST)

    जालन्यात तापमानाचा पारा 42 अंशावर गेलाय.

    जालन्यात तापमानाचा पारा 42 अंशावर गेलाय…वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणीपातळी खालवत चाललीय… भोकरदन तालुक्यातील पद्मावती मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 28 टक्क्यावर आलाय.. यामुळे परिसरातील 12 ते 13 गावावर पाणीटंचाईचं संकट येण्याची शक्यता आहेत..

  • 10 May 2026 02:30 PM (IST)

    गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेकप्रकरणी गुन्हा दाखल

    गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेकप्रकरणी गुन्हा दाखल. सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल. काल गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक करणयात आली होती

  • 10 May 2026 02:15 PM (IST)

    विकास लवांडेंना काल शाईने अंघोळ घातली- नितेश राणे

    विकास लवांडेंना काल शाईने अंघोळ घातली. संतांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार. संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही- नितेश राणेंकडून संग्राम भंडारेंची पाठराखण

  • 10 May 2026 02:00 PM (IST)

    एक दिवस विदर्भ आत्महत्या मुक्त होईल- नितीन गडकरी

    जलसंवर्धन झालं नाही तर परिस्थिती कठीण होऊ शकते. हा तुमच्या आवडीचा राजकारणाचा विषय नाही पण शेतकऱ्यांचा जीवन बदलणार विषय आहे त्यामुळे याला प्रसिद्धी आवश्यक आहे. ही मूव्हमेंट बनली पाहिजे यात अनेक लोक सहभागी झाले पाहिजे ही महत्त्वाची मोहवमेंट आहे याचा मोठा फायदा होईल. विदर्भातील शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा तो समृद्ध व्हावा असा आमचा उद्देश आहे. एक दिवस विदर्भ आत्महत्या मुक्त होईल. आम्ही 25 वर्ष या क्षेत्रात काम केलं आहे त्यात बरंच यश मिळालं पण संपूर्ण उद्देश्यपूर्ती पासून आम्ही कोसोदुर आहो त्यात आणखी काम करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

  • 10 May 2026 01:50 PM (IST)

    तापमानाचा पारा वाढताच भाजीपाला दरात घट

    धुळे शहराचा तापमानाचा पारा वाढलेला असताना भाजीपाला दरात कमालाची घट झाली. दरवर्षी भाजीपाल्याच्या दरामध्ये उन्हाळ्यात मोठी वाढ होते. यंदा मात्र भाजीपाल्याची दर घसरले आहेत. भाजीपाल्याचे दर 50 ते 60 रुपये किलो दरम्यान आहेत.

  • 10 May 2026 01:40 PM (IST)

    ठाण्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई व्हावी-निरंजन डावखरे

    अनधिकृत शाळा उदयास कश्या येतात हे समजून घ्याला हवे. कायद्यात राहून या संस्थांना कसे सौरक्षण देऊन शकतो हे पहिले पाहिजे. विद्यार्थ्याना चांगले दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. चांगले शिक्षण आणि सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी शासनाने पाठपुरावा करावा . सरकारी कायदे पाळत नसतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु शासनाने या शाळेचा विचार करावा. शासनाने अनधिकृत शाळेवर कारवाई करावी अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केले.

  • 10 May 2026 01:30 PM (IST)

    तर मतीन पटेलवर कारवाई- राजेंद्र जंजाळ

    महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1947 ( 10 ड ) मध्ये स्पष्ट केलेले आहे की, एखादा नगरसेवक किंवा त्याचे आई, वडील, बहीण, भाऊ या पैकी कोणीही अनधिकृत बांधकाम केले असेल, त्याचे नगरसेवक पद निष्कशीत होऊ शकते. हा कायदा आहे आणि नियम आहे आणि हे 100 टक्के होणार अशी प्रतिक्रिया एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर शिंदे सेनेचे नेते राजेंद्र जंजाळ यांनी दिली.

  • 10 May 2026 01:20 PM (IST)

    सातपुते करणार चाकणकर यांची चौकशी

    एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते कार्यालयात दाखल झाल्या आहेत. रूपाली चाकणकर यांची एसआयटी प्रमुखांकडून चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी सातपुते या चाकणकर यांची चौकशी करत आहेत.

  • 10 May 2026 01:10 PM (IST)

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

    वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपार्‍या फेकल्या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. BNS 126(2),सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत रस्ता अडवने,गैर कायद्याची मंडळी जमवून घोषणाबाजी करणे त्याच बरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

  • 10 May 2026 01:00 PM (IST)

    “हा घ्या एक कांदा आणि एक रुपया… आता तरी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका!”

    पैठण तालुक्यातील एका संतप्त शेतकरी पुत्राने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतीकात्मक पार्सल पाठवत कांद्याच्या दरवाढीच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले आहे. या पार्सलमध्ये एक कांदा आणि एक रुपया पाठवण्यात आला आहे, कांदा विक्रीनंतर हमाली, तोलाई, वाहन भाडे, गोणी खर्च आणि इतर कपातींमध्ये सर्व रक्कम संपली. एवढेच नव्हे तर बाजार समितीला उलट एक रुपया भरावा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेले शेतकरी पुत्र सुधाकर रामकिसन सुलताने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत सरकारवर निशाणा साधला.

  • 10 May 2026 12:55 PM (IST)

    “चॉकलेट देऊन थांबवलं!” सुषमा अंधारेंवर शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल

    ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका करत निषेध आंदोलन केले. सुषमा अंधारे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना समजल्यानेच त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली नाही, असा दावा शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला.

  • 10 May 2026 12:41 PM (IST)

    ठाण्यात पुन्हा एकदा बिबट्याचा दर्शन, रहिवाशीयांमध्ये भितीचा वातावरण

    ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील हनुमान नगर येथे जनरल मुस्लिम कब्रस्तान-फॉरेस्ट ऑफिसजवळ बिबट्या पाणी पिताना दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मामा-भांजे दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या फॉरेस्ट चौकीजवळील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे.

  • 10 May 2026 12:25 PM (IST)

    नाना पटोले भीतीचं वातावरण निर्णाण करत आहेत- संजय शिरसाट

    नाना पटोले बेछूट आरोप करत आहेत, भीतीचं वातावरण निर्णाण केलं जातंय, तेलगी प्रकरण पाहा , त्याला काही झालं, कसाबला काही झालं, हे राज्य कायद्याचं आहे. चार मंत्र्यांची नावं असतील तर नानांनी ती नावे जाहीर करावी, अंदाजपंछी नावं सांगणं हा भाग वेगळा… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नावं द्यावी असे संजय सिरसाट म्हणाले.

  • 10 May 2026 12:15 PM (IST)

    सुनेचा खून करून फरार असलेल्या सासर्‍याला अटक

    पुण्यात सुनेचा खून करून फरार सासर्‍याला जळगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. भानुदास भास्कर चौधरी असे खून करणाऱ्या अटकेतील आरोपी सासऱ्याचे नाव आहे. 2 मे रोजी घरगुती कारणावरून त्याने डोक्यात वार करून सुने स्वाती चौधरी हिचा खून केला होता, त्यानंतर तो फरार होता

  • 10 May 2026 11:50 AM (IST)

    लोणावळा-खंडाळा घाटात बाईक स्टंटबाजीचा उच्छाद

    लोणावळा-खंडाळा घाटात बाईक स्टंटबाजीचा उच्छाद वाढताना दिसत असून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी धोकादायक प्रकार सर्रास घडत आहेत. महागड्या बाईक्सवरून वेगवान रेस, झिगझेंग ड्रायव्हिंग, तसेच व्हिली आणि स्टॉपीसारखे जीवघेणे स्टंट करत वाहन चालक इतर प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून कारवाई होत असली तरी पोलिसांची नजर चुकवत पुन्हा स्टंटबाजी सुरू होत असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

  • 10 May 2026 11:35 AM (IST)

    आदिशक्ती मुक्ताईच्या 729, व्या अंतर्धान समाधी उत्सव सोहळ्याला सुरुवात

    आदिशक्ती मुक्ताईच्या 729, व्या अंतर्धान समाधी उत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे.  पंढरपूर त्रंबकेश्वर आळंदी अशा विविध ठिकाणच्या संतांच्या पादुका या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्याचनिमित्त वारकरी संप्रदाय आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी या ठिकाणी रोज मांदियाळी पाहायला मिळत आहे. 12 मे रोजी मोठा उत्सव सोहळा याठिकाणी पार पडणार आहे.

     

  • 10 May 2026 11:25 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढला….

    आज तापमानाचा पारा थेट ४४° सेल्सिअसवर पोहोचला आहे.  यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. बर्फ, लिंबूपाणी आणि थंड पेयांची मागणी वाढत आहे.  नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

  • 10 May 2026 11:13 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर अंदाजे १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त…

    समृद्धी महामार्गावर अंदाजे १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.  कारंजा टोल नाक्यावर महामार्ग सुरक्षा पथकाने धडक कारवाई केली. ज्यामध्ये गुटख्याने भरलेला आयशर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. गुप्त माहितीच्या आधारे टोलनाक्यांवर नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली.  अमरावती येथील आरोपी शेख रहमान शेख रहीम पोलिसांच्या ताब्यात असून कारंजा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • 10 May 2026 10:50 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढला

    आज तापमानाचा पारा थेट ४४° सेल्सिअसवर. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद. वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यांवर शुकशुकाट. बर्फ, लिंबूपाणी आणि थंड पेयांना वाढती मागणी. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये प्रशासनाचे आवाहन. उष्णतेचा मानवी जनजीवनावर मोठा परिणाम….

  • 10 May 2026 10:40 AM (IST)

    SIT पथकातील वाहने गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण कार्यालयात दाखल

    याच ठिकाणी भोंदू अशोक खरात याची केली जात होती यासाठी कडून चौकशी. या अगोदर दोन वेळा बदलण्यात आली होती यासाठी कडून चौकशीची जागा. एसआयटी पथकातील अधिकारी आणि वाहने गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण कार्यालयात दाखल. एसआयटी कडून हालचाली सुरू

  • 10 May 2026 10:30 AM (IST)

    थलापती विजय याच्यासह 9 मंत्र्यांचा शपथविधी पार

    आज तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून अभिनेता विजय थलापती यांनी शपथ घेतली. विजय थलापती याच्यासह ९ मंत्र्याचाही शपथविधी पार पडला. तामिळनाडूच्या या शपथविधीकडे देशाच्या नजरा आहेत.

  • 10 May 2026 10:20 AM (IST)

    विजय थलापती तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री..

    विजय थलापती याने तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी लोकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. 121 आमदारांनी विजय थलापती याला पाठिंबा जाहीर केला.

  • 10 May 2026 10:18 AM (IST)

    राहुल गांधी शपथविधीसाठी उपस्थित तामिळनाडूमध्ये थलापती पर्व..

    विजय थलापती तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून काही वेळातच शपथ घेणार आहे. विजय थलापती याच्या शपथविधीसाठी राहुल गांधी उपस्थित आहे.

  • 10 May 2026 10:08 AM (IST)

    तामिळनाडूच्या राजकारणात थलापती पर्व..

    काही वेळातच अभिनेता विजय थलापती हा तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेईल. राहुल गांधी या थपथविधीसाठी पोहोचले आहेत.

  • 10 May 2026 09:59 AM (IST)

    नसरापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांकडून मूक मोर्चा

    पुण्यातील नसरापूर अत्याचारप्रकरणी पीडित चिमुकलीचं कुटुंब आक्रमक झालं  असून आज मूक मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं वडिलांनी आवाहन केलं आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवनपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आणि नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

  • 10 May 2026 09:50 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे तीव्र पाणीटंचाई

    वाशिम जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई तीव्र झाली असून जिल्ह्यातील 33 गावांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. 29 विहिरींचे अधिग्रहण तर 6 खाजगी बोअरवेलही प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. अधिग्रहित जलस्त्रोतांतून गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक 10 गावांमध्ये टंचाई आहे.

  • 10 May 2026 09:40 AM (IST)

    पावसाळ्यापूर्वी शाळांच्या इमारतींची तपासणी; 27 मुद्द्यांवर होणार स्ट्रक्चरल ऑडिट

    छत्रपती संभाजीनगर- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांच्या इमारतींच्या सुरक्षिततेची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तालुक्यातील सर्व शाळांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जुन्या व कमकुवत इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. धोकादायक वर्गखोल्या रिकाम्या करून विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची तपासणी बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांमार्फत केली जाणार आहे.

  • 10 May 2026 09:30 AM (IST)

    एल निनोचा प्रभाव; यंदा कमी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना मिश्र पिकांचा सल्ला

    छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या मान्सून हंगामात ‘एल निनो’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगत पीक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र पिके, आंतरपीक पद्धती तसेच कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा फटका उत्पादनावर बसू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीपासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे

  • 10 May 2026 09:20 AM (IST)

    महिला आणि बालकांच्या तक्रारींवर कारवाई करा; पोलीस ठाण्यांना आयुक्तांच्या सूचना

    महिला आणि बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये अधिक संवेदनशीलता आणि तत्परता राखण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. नसरापूर इथल्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे.
    अशा प्रकरणांमध्ये कोणताही विलंब होऊ नये याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

  • 10 May 2026 09:10 AM (IST)

    पुणे शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य

    वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचं महापालिकेनं निश्चित केलं आहे. या रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ते 30 पैकी 21 रस्त्यांसाठी भूसंपादनाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वाकड ते नवले पूल या दरम्यानच्या महामार्गालगत दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचा समावेश आहे.

  • 10 May 2026 09:07 AM (IST)

    राज्यातील तब्बल 487 शाळा अनधिकृत, मुंबई विभागात सर्वाधिक संख्या

    राज्यात तब्बल 487 शाळा अधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई केली आहे. तर 111 शाळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 325 शाळांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्यक्षात केवळ सोहळा प्रकरणात दंड वसूल झाला असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे.

  • 10 May 2026 09:05 AM (IST)

    पुण्यात अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे प्रवेशाला कात्री

    पुण्यात अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे प्रवेशाला कात्री लागली आहे. विद्यापिठाचा महाविद्यालयांना इशारा देण्यात आला असून माहिती भरण्यासाठी 18 मे पर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कठोर पाऊल उचललं आहे. शिक्षक भरतीचा आकडा गाठण्यात अपयशी ठरणाऱ्या महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार आहे. या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून माहिती भरण्यासाठी विद्यापीठाने 18 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

  • 10 May 2026 09:04 AM (IST)

    पुण्यातील धोकादायक 36 वाड्यांना नोटिसा

    पुण्यातील धोकादायक 36 वाड्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील जुने वाडे, जुन्या इमारती, धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्याने तिथं वास्तव्य करू नये, संबंधित इमारती वाढत तातडीने रिकामे करावेत, असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं. शहरातील 36 धोकादायक वाडे आणि इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.

  • 10 May 2026 09:03 AM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला अजय साळवे यांनी दिला चोप

    मीरा भाईंदरमध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख अजय साळवे यांनी चोप दिला. मीरा गावठाण इथं बस स्टॉपवर एका मुलीची छेड काढून रेस्टॉरंटजवळ तिच्याकडे ‘रेट’ विचारणाऱ्या विकृत इसमाला अजय साळवे यांनी भरचौकात धडा शिकवला. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना शाखाप्रमुख अजय साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला चांगलाच चोप दिला. भररस्त्यात बदडल्यानंतर त्या तरुणाने पीडित मुलीची माफी मागितली.

Follow Us