Maharashtra News LIVE : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला, मनोज जरांगेंवर केला आरोप
Maharashtra News LIVE : आज मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, राज्यभरातील मराठा समाजाने 12 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आंतरवालीत यावे. आम्हाला अडवले तर अख्खा महाराष्ट्र ठप्प करू.

LIVE NEWS & UPDATES
-
गणेशोत्सवत मुंबईत आंदोलन करणं कठीण – चंद्रशेखर बावनकुळे
गणेशोत्सवत मुंबईत आंदोलन करणं कठीण असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
-
विद्यानंद बापट एकटे नाहीत, कायदेशीर टीम सोबत – वकील असीम सरोदे
वकील असीम सरोदे म्हणाले, विद्यानंद बापट एकटे नाही त्यांच्या सोबत सर्व कायदेशीर टिम त्यांच्या सोबत आहे. ध्वनिप्रदूषण कोणा एकाचा विषय नाही. सर्वांनी एकत्रित येऊन काम करुयात. कायद्याची अंमलबजावणी व्हावी. सणांमध्ये पण कारवाई झाली पाहिजे. सामाजिक प्रबोधन सर्व मार्गांनी झालं पाहिजे. सदानंद दाते यांनी कठोर पावले उचलली तर नक्कीच परिवर्तन होईल’.
-
-
नागपुरात फडणवीस-बावनकुळे यांच्यात बैठक
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्य पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहावे लागेल.
-
कल्याण-डोंबिवली मनपाच्या महासभेत पाणी प्रश्न पेटला
गणेशोत्सवातील पाणी नियोजनावर नगरसेवक आक्रमक झाले आहेत. MIDCच्या पाण्याचे प्रेशर वाढवा, टंचाईग्रस्त भागात वाढीव टँकरने पाणीपुरवठ्याचा ठराव मंजूर झाला आहे. कमी पाणी येणाऱ्या भागांसाठी विशेष नियोजन करण्याच्या प्रशासनाला महासभेत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
-
मुलांच्या वस्तीगृह मधील जुनी पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत
पुणे स्टेशन नजीक बी.जे वैद्यकीय महाविद्यालय मुलांच्या वसतीगृह आवारातील जुनी पाण्याची उंच टाकी धोकादायक झाली असून पडण्याच्या स्थितीत असल्याचे समोर आले आहे. येथील रहिवाशी, बै.जी.प्रशासन, सुरक्षारक्षक यांना खबरदारीची सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दल, मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिस विभाग दाखल झाले आहेत
-
-
एमपीएससी अध्यक्षांवर रोहित पवारांचा निशाणा
एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एमपीएससीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांचे मित्र असल्याचा दावा करत, त्यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याचे रोहित पवार म्हणाले.
-
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झाला
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर तीन ते चार तरुणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा हल्ल्याच्या माध्यमातून प्रयत्न होता असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करताना जरांगे पाटील दिसत आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, राज्यभरातील मराठा समाजाने 12 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता आंतरवालीत यावे. आता सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. आम्हाला अडवले तर अख्खा महाराष्ट्र ठप्प करू. आज मुंबईत त्यांचा मोर्चा धडकणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीन ते चार तरूणांनी हॉटेलमध्ये हाकेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या न्यायासाठी हाके यांनीही आंदोलन केले. हल्ल्यानंतर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा हल्ल्याच्या माध्यमातून प्रयत्न होता. हा माझ्यावर झालेला अकरावा हल्ला होता आणि तो भ्याड हल्ला होता हे सगळे कार्यकर्ते जरांगेचे होते.
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं, याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचा दावा केला. जबाब नोंदवताना त्यांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काही व्यक्तींची नावं घेतल्याचं सांगितलं.