Maharashtra News LIVE : तटकरेंच्या भेटीवर शरद पवार यांचे माैन..

Maharashtra News LIVE : आज मनोज जरांगे हे जालना, अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला संबोधित करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी बैठक होणार आहे त्याठिकाणी पोलिसांकडून बॉम्ब शोध पथकाकडून,तपासणी करण्यात आली आहे. यासह महत्वाच्या बातम्यांचे अपडेट जाणून घ्या या ब्लॉगमध्ये..

Maharashtra News LIVE : तटकरेंच्या भेटीवर शरद पवार यांचे माैन..
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 10:19 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 16 May 2026 10:30 AM (IST)

    शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे रात्री पासून ठिय्या आंदोलन..

    आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून दिला ठिय्या..  शिष्यवृत्ती भत्ता, शैक्षणिक खर्च तसेच निर्वाह भत्ता वेळेत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या वसतिगृह झोपण्या ऐवजी आदिवासी विभागाचा कार्यालयाचा परिसरात मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात केली.

  • 16 May 2026 10:20 AM (IST)

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरणार?

    मराठा आंदोलक मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. सकाळी १० वाजता होणाऱ्या या बैठकीत ते समाजाशी संवाद साधणार असून पुढील आंदोलनाची भूमिका निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत, अशा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांनी आंदोलन केले होते.

     

  • 16 May 2026 10:03 AM (IST)

    तटकरेंच्या भेटीवर शरद पवार यांचे माैन..

    शरद पवार आज बारामतीत आहेत. यावेळी त्यांनी तटकरे यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी तटकरेंच्या भेटीबद्दल माैन बाळगले.

  • 16 May 2026 09:50 AM (IST)

    पंढरपूर – भाविकांकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर मंदिर समितीची कारवाई

    पंढरपूर – भाविकांकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर मंदिर समितीने कारवाई केली.  मोफत ई-रिक्षा सेवेसाठी भाविकांकडून पैसे घेतले  संत नामदेव पायरीजवळ रात्री उशिरा प्रकार उघड झाला, मंदिर समितीच्या सीसीटीव्हीत गैरप्रकार कैद झाला होता.

    पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वृद्ध, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी सुरू असलेल्या मोफत ई-रिक्षा सेवेत गैरप्रकार समोर आला आहे. कंत्राटी कर्मचारी कुणाल राजेंद्र घोडके याने भाविकांकडून पैसे घेतल्याचे सीसीटीव्हीत आढळले.  कुणाल घोडके या संबंधित कर्मचाऱ्याची विठ्ठल मंदिरातील सेवा कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

  • 16 May 2026 09:40 AM (IST)

    नाशिक – कारागृहात असूनही खरातची कमाई सुरूच

    नाशिक –  कारागृहात असूनही खरातची कमाई सुरूच आहे. रिंग रोड साठी भूसंपादनातून सुमारे तीन कोटी रुपये मिळणार . गवळणे परिसरात अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांना 82 लाख 83 हजार रुपये मिळणार  आहेत. तर पाथर्डी परिसरात तृप्तबाला आणि सृष्टी खरातला एक कोटी 82 लाख मिळणार आहेत. सोबत निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपये मिळणार.  खरात खरेदीप्रक्रियेत उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याने दर कमी होऊ शकतात.  भूसंपादनाचा फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींना उपस्थित राहणे आवश्यक आहे.

  • 16 May 2026 09:30 AM (IST)

    अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका, नीट पेपरफुटी प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानीने व्यक्त केला संताप

    अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका, विचार करून मतदान करा असं म्हणत नीट पेपरफुटी प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानीने संताप व्यक्त केला.  तसेच त्याने परीत्रा व्यवस्थेत मोठ्या सुधारणांचीही मागणी केली आहे.

  • 16 May 2026 09:20 AM (IST)

    हिंगोली-कार्यवाहीसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्याला वाळू माफियांकडून जीवे मारण्याची धमकी

    हिंगोलीत कार्यवाहीसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्याला वाळू माफियांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गोरेगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सेनगाव तालुक्यातील गोरेगांव चौफुलीवर हा प्रकार घडला.

  • 16 May 2026 09:10 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत NCP नेत्यांची पुढील आठवड्यात महत्वाची बैठक

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत NCP नेत्यांची पुढील आठवड्यात महत्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित अंतर्गत कलहावर या बैठकीत चर्चा होणार असून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे समजते.

  • 16 May 2026 09:08 AM (IST)

    नीट पेपर फुटी प्रकरण – CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची चौकशी

    नाशिक – CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी करण्यात येत आहे.  नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकच्या शुभम खैरनार याला CBI ने ताब्यात घेतलं आहे. पेपर फुटीच्या संपूर्ण प्रक्रियेत टेलिग्राम ॲपचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड झालं आहे.  टेलिग्रामवर मोठ्या फाइल्स सहज पाठवता येत असल्याने ,ते ॲप वापरण्यात आलं. अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे यांच्या सोबत देखील शुभमचे कनेक्शन उघड झालं असून शुभमशी संबंधित काही लोकांचे जाब जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. आज ते पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. शिंदे समिति रेकॉर्ड शोधत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज असून दक्षिण बंगालच्या उपसागरात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. केरळ येथे 26 मे रोजी मोसमी पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूरमध्ये पनीरच्या नावाखाली चीज अनालॉग देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या हॉटेल्स वर अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. 25 हॉटेल्सना नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूरमध्ये शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीपासूनच ठिय्या दिला आहे. यासह महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, कीरिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…

Follow Us