Maharashtra News LIVE : शिंदेच्या शिवसेनेत जाणार, ओमराजे निंबाळकर यांची घोषणा

Maharashtra News LIVE : आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. खासदार ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News LIVE : शिंदेच्या शिवसेनेत जाणार, ओमराजे निंबाळकर यांची घोषणा
Breaking-news
Image Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 22, 2026 | 8:20 AM

Maharashtra News LIVE : वीस वर्षांनंतर पवनराजे हत्याकांड खटल्याचा निकाल लागला आहे. या खटल्यातील आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे ओमराजेंनी आता वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, ओमराजेंनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बंडखोरी आणि ऑपरेशन टायगरबाबत मी नंतर निर्णय जाहीर करणार आहे. मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच मी माझा राजकीय निर्णय जाहीर करेन, असं त्यांनी म्हटलं आहे. शिंदे गटात प्रवेशाची शक्यता असतानाही त्यांनी मतदारसंघात चर्चा करण्याची भूमिका घेतली. यामुळे त्यांच्यासोबत फूटून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेल्या ५ खासदारांची खासदारकी धोक्यात आली आहे. ठाकरे गटाच्या व्हीपमुळे त्यांचे भविष्य अनिश्चित बनले आहे. या राजकीय घडामोडींमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jun 2026 08:44 PM (IST)

    नितीश कुमार जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष

    बिहारची राजधानी पाटणा येथील जेडीयूच्या राज्य कार्यालयात झालेल्या राष्ट्रीय आणि राज्य परिषदांच्या संयुक्त बैठकीत नितीश कुमार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित करण्यात आली. या बैठकीत आरोग्य मंत्री निशांत कुमार यांच्या सक्रिय सहभागावर चर्चा झाली.

  • 21 Jun 2026 08:29 PM (IST)

    आम्ही इराणवर जोरदार हल्ला चढवू: ट्रम्प

    “इराणने लेबनॉनमधील आपल्या मोठ्या प्रमाणात निधी मिळवणाऱ्या हस्तकांना अराजकता माजवण्यापासून तात्काळ थांबवले पाहिजे. जर त्यांनी तसे केले नाही, तर आम्ही गेल्या आठवड्यात केल्याप्रमाणेच, किंबहुना त्याहूनही अधिक जोरदारपणे इराणवर पुन्हा हल्ला करू,” असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.


  • 21 Jun 2026 08:26 PM (IST)

    गद्दारी झाली तिथे जाऊन मी मतदारांची माफी मागतो- उद्धव ठाकरे

    खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत म्हणाले की,  ‘मला तुम्ही नुसते शिवसैनिक दिसत नाहीये तर पेटलेल्या मशाली दिसत आहात. गद्दार आणि गद्दारांच्या बापाला धन्यवाद देईन. तुम्ही मशाली पुन्हा पेटवल्या. परवा मी जे बोललो ते करणार आहे. सुरुवात इथून करणार आहे. गद्दारी झाली तिथे जाऊन मी मतदारांची माफी मागतो. तुम्ही माझा आदेश मानून उमेदवार आणि मशाल पाहून रक्ताचं पाणी केलं आणि निवडून दिलं. उमेदवार मी दिले. चूक माझी आहे. मी माफी मागतो.’

  • 21 Jun 2026 08:23 PM (IST)

    शिंदेच्या शिवसेनेत जाणार, ओमराजे निंबाळकर यांची घोषणा

    ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पक्षांतराच सस्पेन्स अखेर संपवला आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ओमराजे म्हणाले की, सत्तेचा उपयोग कसा केला जाऊ शकतो आम्ही निश्चितपणे धाराशिव मतदारसंघातील लोकांना दाखवू. आम्ही वचन देत आहे.

  • 21 Jun 2026 06:56 PM (IST)

    पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीर सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद

    पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीर सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद

    पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

    विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधकांचा जोरदार समचार

  • 21 Jun 2026 06:40 PM (IST)

    सचिन घायवळ टोळीशी संबंधित दोन आरोपींना अटक

    सचिन घायवळ टोळीशी संबंधित दोन आरोपींना अटक

    अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    रोहित भोळेकर आणि ज्ञानेश्वर तोंडे जेरबंद

    दोन्ही आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई

    पुण्यातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग

    रोहित भोळेकरवर खर्डा येथे खंडणीचा गुन्हा दाखल

    गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी केली अटक

  • 21 Jun 2026 06:30 PM (IST)

    विधान परिषद निकालापूर्वीच बार्शीत राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर

    विधान परिषद निकालापूर्वीच बार्शीत राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर

    बार्शीतील ग्रामदैवत भगवंत मंदिर परिसरात समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी

    महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यात लढत

    उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात

    मात्र निकालापूर्वीच राऊत समर्थकांनी विजयाच्या शुभेच्छा देणारे लावले बॅनर

  • 21 Jun 2026 06:10 PM (IST)

    परभणीत बोगस डॉक्टराचा तरुणावर उपचा? तरुणाचा मृत्यू

    परभणी जिल्ह्यातील बनवस येथे उपचारानंतर 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

    हात पाय दुखत असल्याने गावातील एका डॉक्टरकडे घेतले होते उपचार

    इंजेक्शन सलाईन लावल्यानंतर काही वेळेतच अचानक बेशुद्ध अवस्थेत तरुणाचा झाला मृत्यू

    गणेश राजले असं मृत तरुणाचं नाव

    डॉक्टर बोगस असल्याचा मृत मुलाच्या वडिलांचा आरोप

    डॉक्टरांवर कारवाई करण्याची मृत मुलाच्या कुटुंबीयांची मागणी

    मृतदेह उत्तरीय तपासणी साठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल

  • 21 Jun 2026 05:53 PM (IST)

    बंडखोर खासदार उद्या दिल्लीहून खाजगी विमानाने नांदेडला येणार

    हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव , यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे उद्या दिल्लीला खाजगी विमानाने नांदेडला येणार आहेत. उद्या दुपारी चार वाजता खाजगी विमानाने नांदेडला येणार असल्याचे सूत्रांची म्हटले आहे.  नांदेड विमानतळावरून पोलीस बंदोबस्तात हे खासदार आपापल्या मतदारसंघात जाणार आहे.

  • 21 Jun 2026 05:33 PM (IST)

    नांदेड येथे काल मध्यरात्री एका 41 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली

    नांदेड शहरातील वाघी रोड परिसरात काल मध्यरात्री एका 41 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन दुचाकींवरुन आलेल्या चार आरोपींनी शेख शमीम यांच्यावर गोळ्या झाडल्या नंतर तलवार आणि खंजीरने अनेक वार करुन त्यांची हत्या केली.

  • 21 Jun 2026 05:11 PM (IST)

    खासदार ओमराजे निंबाळकर जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील – कार्यकर्ते

    गोवर्धनवाडी येथील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर जो निर्णय घेतील तो  योग्यच घेतील असे कार्यकर्ते म्हणत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा निर्णय योग्यच असेल आणि आम्हाला आशा आहे दादांना मंत्रिपद मिळेल असे कार्यकर्ते म्हणत आहेत.

     

  • 21 Jun 2026 04:58 PM (IST)

    बीडच्या केज तालुक्यातील कदमवाडी फाटा येथे तरुणाची हत्या

    बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले नामक तरूणाची कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे काल रात्रीच्या सुमारास चाकूने भोकसून खून करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावे या मागणीसाठी नातेवाईकांसह गावकरी मोठ्या संख्येने केज पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

  • 21 Jun 2026 04:45 PM (IST)

    परभणीत विधानपरिषदेच्या निकालाआधीच महायुतीच्या उमेदवावाराचे आमदार म्हणून बॅनर झळकले

    परभणीत विधानपरिषदेच्या निकालाआधीच महायुतीच्या उमेदवावाराचे आमदार म्हणून बॅनर झळकलेले आहेत. शिवसेना उमदेवार सईद खान यांचे परभणीत अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. उद्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवार स्पष्ट होणार होणार  आहे.

  • 21 Jun 2026 04:24 PM (IST)

    खासदार ओमराजे निंबाळकर गोवर्धन वाडी येथे दाखल

    धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर गोवर्धन वाडी येथे दाखल झाले आहेत. ओमराजे निंबाळकर यांचे वडील कै. पवन राजे निंबाळकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहेत.थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे.

     

  • 21 Jun 2026 04:05 PM (IST)

    नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, कडेगामध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

    नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा,या मागणीसाठी सांगलीच्या कडेगामध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव शहरातून निघालेल्या मोर्चामध्ये हजारो शक्तीपीठ बाधित शेतकरी सहभागी झाले होते.

  • 21 Jun 2026 03:54 PM (IST)

    कल्याण : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप

    कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप करण्यात आला आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपींनी घरी बोलावून दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही नराधमाला ताब्यात घेत दोघांवर गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरूवात केली आहे.

  • 21 Jun 2026 03:40 PM (IST)

    बुलढाणा : खामगाव शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील काही भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही शहरातील काही भागांमध्ये नळांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आपल्या प्रभागात पाणी उपलब्ध नसल्यामुळे महिलांना दूर अंतरावर असलेल्या लिकेज झालेल्या वॉल्व्हवरुन पाणी भरावे लागत आहे.

  • 21 Jun 2026 03:26 PM (IST)

    पावसाअभावी गोंदियात खरीप पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत

    गोंदिया जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतांची मशागत करून पेरणीची संपूर्ण तयारी केली असली, तरी पुरेशा पावसाअभावी पेरणीला सुरुवात होऊ शकलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • 21 Jun 2026 03:12 PM (IST)

    पावसाळी अधिवेशन : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

    पावसाळी अधिवेशनाच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ‘विश्वासघातकी सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही. प्रत्येक घटकाचा विश्वासघात करणारे हे सरकार आहे. लाडकी बहीण योजनेतून 81 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान चुकीचे फॉर्म भरण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करावी. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम हे सरकार करत आहे.’

  • 21 Jun 2026 02:55 PM (IST)

    पुणे-बेंगलोर महामार्गावर मिनी ट्रॅव्हल आणि ट्रकचा भीषण अपघात

    पुणे-बेंगलोर महामार्गावर मिनी ट्रॅव्हल आणि ट्रकचा भीषण अपघात. साताऱ्याजवळच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली

  • 21 Jun 2026 02:45 PM (IST)

    सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवरून मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

    सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवरून मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. फोटोसोबत छेडछाड करून फोटो व्हायरल केले. फोटो व्हायरल करणाऱ्याची सायबरकडे तक्रार केली- महाजनांची माहिती

  • 21 Jun 2026 02:30 PM (IST)

    पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक

    पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक सुरु आहे. बैठकीला शिवसेनेचे भास्कर जाधव,अनिल परब, अंबादास दानवे काँग्रेस पक्षाचे सतेज पाटील,अमीन पटेल राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित.  शिवालय इथे गेल्या अर्धा तासापासून बैठक सुरु आहे

  • 21 Jun 2026 02:15 PM (IST)

    3 बंडखोर खासदार उद्या आपल्या मतदारसंघात जाणार, सूत्रांची माहिती

    3 बंडखोर खासदार उद्या आपल्या मतदारसंघात जाणार, संजय जाधव, नागेश आष्टीकर, संजय देशमुख मतदारसंघात येणार. मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार.  नांदेड विमानतळावर तिन्ही खासदारांचं आगमन होणार, सूत्राची माहिती

  • 21 Jun 2026 01:52 PM (IST)

    विकास काम होत नसल्याने मी हे पाऊल उचललंय-नागेश पाटील आष्टीकर

    बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण येतंय. मी उद्धव साहेबांवर नाराज होऊन गेलो नाहीये, त्यांनी माझ्यावर मोठ प्रेम केल आहे.राऊत साहेब माझ्या वडिलांप्रमाणे आहेत,त्यांनी काही बोललं तर काही फरक पडत नाही, हा त्यांचा हक्क आहे. पण हे सगळं होत असताना 18 तारखेपर्यंत आम्ही कोणीच कुठ गेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं आमच्यावर गैरविश्वास दाखवण्यात आला बोलण्याचा अतिरेक झाला. त्यामुळे आम्ही विचार केला तिथे थांबून आता काही फायदा नाहीये. विकास काम होत नसल्याने मी हे पाऊल उचललंय, असे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले.

  • 21 Jun 2026 01:45 PM (IST)

    जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी

    जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. अल्पबचत भवन येथेच गेल्या तीन दिवसांपासून स्ट्रॉंग रूमच्या इमारतीच्या चौफेर सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये तसेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतपेट्यांची सुरक्षा करण्यात येत आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून सर्व सुसज्ज अशी अवस्था करण्यात आली आहे. महायुतीचे भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन व महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे शरद तायडे यांच्यात थेट लढत पार पडली. उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या होणार असून निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागला आहे.

  • 21 Jun 2026 01:35 PM (IST)

    खासदार ओमराजे निंबाळकरांनी सत्तेसोबत जावे-समर्थक

    खासदार ओमराजे निंबाळकरांनी सत्तेसोबत जावे असे वाटते. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. ओमराजेंनी एकनाथ शिंदे गटात जावे असे आम्हाला वाटते. खासदार निंबाळकरांना मंत्रीपद मिळायला पाहिजे. आत्ता धाराशिव जिल्ह्याला एकदाही केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही. प्रत्येक कामात आमच्या मतदारांना, कार्यकर्त्यांना अडवणूक केली जातेय.त्यामुळे आपल्याला लोकांची कामे करायची असतील तर आपल्याला सत्तेत जावे लागेल यात शंका नाही. सोशल मीडियावर जे टीका करत आहेत ते धाराशिव जिल्ह्यातील किंवा आमचे मतदार नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.

  • 21 Jun 2026 01:21 PM (IST)

    मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच निष्ठेने काम करेल- राजुल पाटील

    खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे आणि निष्ठेने काम करेल अशी प्रतिक्रिया राजुल पाटील यांनी दिली.

  • 21 Jun 2026 01:12 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका आमदार प्रवीण स्वामी यांची ओमराजे यांना विनंती

    ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे शिवसेने सोबत राहावे ही फक्त धाराशिवरांची नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांची भावना आहे अशी विनंती आमदार प्रवीण स्वामी यांनी केली आहे.

  • 21 Jun 2026 01:00 PM (IST)

    तानाजी सावंत ही धाराशिवकडे

    खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठोपाठ आमदार तानाजी सावंत ही धाराशिव कडे निघाले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर पक्ष प्रवेशाबद्दल कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी धाराशिव मध्ये दाखल होत आहेत. त्याचबरोबर आमदार तानाजी सावंत ही धाराशिव जिल्ह्यात येणार आहेत. तानाजी सावंत भूम परंडा मतदार संघात दाखल होत आहेत खासदार ओमराजे निंबाळकर यांचीही तानाजी सावंत भेट घेणार असल्याची चर्चा होत आहे.

  • 21 Jun 2026 12:55 PM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांची पक्ष नेतृत्वांशी आज पहाटे अर्धा तास चर्चा- सूत्र

    ओमराजे निंबाळकर यांची पक्ष नेतृत्वांशी आज पहाटे अर्धा तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पिता पवनराजे निंबाळकर यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाली नाही यामुळेही ते मानसिक त्रासात असल्याची माहिती आहे. त्यात वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर केलेल्या रिल स्टार आणि भंपक माणूस या टिकेनंतर ओमराजे निंबाळकर उद्वीग्न झाल्याचं समजतंय. आधी टिका करायची मग समजूत काढायला माणसं पाठवायची या भूमिकेवर ते नाराज असल्याचं कळतंय.

     

  • 21 Jun 2026 12:45 PM (IST)

    नाशिकमधल्या नीट परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    नाशिकमधल्या नीट परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पहायला मिळतोय. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच आत केंद्रात प्रवेश दिला जात आहे. बायोमेट्रिकनंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात आहे. पेपरफुटीच्या घटनेनंतर नाशिकमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीसह स्थानिक प्रशासन देखील परीक्षेसाठी सज्ज झालं आहे.

  • 21 Jun 2026 12:43 PM (IST)

    सोमवारी मातोश्रीवर येतो, ओमराजेंचा ठाकरेंना निरोप- सूत्र

    काल झालेल्या बैठकीत ओमराजे निंबाळकर यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर येतो, असं आश्वासन ठाकरेंना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मातोश्रीवर येऊन वैयक्तिक भूमिका मांडतो, असा निरोप त्यांनी दिल्याचं कळतंय.

  • 21 Jun 2026 12:35 PM (IST)

    अजूबा ब्रिजचं उद्घाटन अखेर पार पडलं; नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

    मनसेचे शहराध्यक्ष संदिप राणे यांनी प्रशासनाला ४८ तासांचा इशारा दिला होता, ज्यानंतर रखडलेल्या पुलाचं उद्घाटन आज करण्यात आलं. ​
    या अजूबा ब्रिजच्या उद्घाटनामुळे परिसरातील नागरिकांना भेडसावणारी मोठी वाहतूक कोंडीची समस्या आता सुटणार आहे. ​
    पुलाच्या विशिष्ट (बॉटल नेक) रचनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात यावर जोरदार टीका झाली होती, ज्यामुळे आधी कोणीही याचे श्रेय घेण्यास पुढे येत नव्हते.

  • 21 Jun 2026 12:20 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रांवर 4 हजार 716 विद्यार्थी देत आहेत नीटची परीक्षा

    जळगाव जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रांवर 4 हजार 716 विद्यार्थी आज नीटची परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रवेश देताना प्रत्येक विद्यार्थ्याची कसून तपासणी केली जात आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना 100 मीटरच्या अंतरात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची तपासणी केली जात असल्याचा पाहायला मिळत आहे. सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका या दाखल झाल्याचा पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांसाठी उन्हाचा कडाका लक्षात घेता मंडपाची तसेच पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 21 Jun 2026 12:07 PM (IST)

    खासदारांच्या बंडखोरीनंतर संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

    ठाकरे गटाच्या खासदारांच्या बंडखोरीनंतर संजय राऊत पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. राज ठाकरेंच्या भेटीसाठी ते शिवतीर्थवर पोहोचले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणानंतर आता पुढे काय केलं पाहिजे, त्यातून आपण कसं सावरलं पाहिजे आणि एकंदर पुढील वाटचालीबाबत या भेटीमध्ये राऊत आणि राज ठाकरे यांच्याच चर्चा होऊ शकते.

  • 21 Jun 2026 11:52 AM (IST)

    सर्पदंश झाल्याने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू,जालन्याच्या सावंगी तलाव गावातील घटना

    जालना जिल्ह्यातील सावंगी तलाव या गावांमध्ये मध्यरात्री सर्पदंश झाल्यामुळे एका 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली,साईनाथ गिरगुले असं या लहान बालकाचे नाव असून मध्यरात्रीच्या सुमारास तो झोपलेला होता त्याचवेळी त्याला सर्पदंश झाला,मात्र रात्री ही बाब कुणाच्याही लक्षात न आल्याने त्याला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नाही आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला,या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • 21 Jun 2026 11:37 AM (IST)

    मालेगाव शेतकी संघाच्या निवडणुकीदरम्यान गोंधळाचे वातावरण

    दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव वाढला. गेल्या 15 वर्षांपासून शेतकी संघावर हिरे कुटुंबीयांचे वर्चस्व कायम होते. यंदाच्या निवडणुकीत अद्वय हिरे प्रत्यक्ष मैदानात नसले तरी त्यांच्या समर्थकांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. या पॅनलविरोधात मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांच्या पॅनलची थेट लढत होत आहे. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही काळ वातावरण तापले होते.

  • 21 Jun 2026 11:25 AM (IST)

    लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून शिवसेनेतून फुटलेल्या ६ जणांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे रिलिज केले जातील

    आज संध्याकाळपर्यंत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून शिवसेनेतून फुटलेल्या ६ जणांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे रिलिज केले जातील. पुढील दोन ते तीन दिवसांत हे सहा खासदार आपली भूमीका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता.

  • 21 Jun 2026 11:17 AM (IST)

    श्री विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनावरून नवा वाद…

    रासायनिक लेपन की पारंपरिक वज्रलेप? यावर उद्या  निर्णय होणार. २३ आणि २४ जूनला श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे,  पुरातत्त्व विभागाच्या रासायनिक प्रक्रियेला वारकरी संप्रदायाचा विरोध आहे. पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपाची मागणी करत न्यायालयात धाव घेतली. संवर्धन प्रक्रियेबाबतच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार. न्यायालयाच्या निकालानंतरच मूर्ती संवर्धनाचा अंतिम मार्ग स्पष्ट होणार..

  • 21 Jun 2026 10:50 AM (IST)

    गेवराईचे तहसीलदार संदिप खोमणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबन प्रस्ताव

    गेवराई चे तहसीलदार संदिप खोमणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून निलंबन प्रस्ताव, घरकुल वाळू घोटाळ्यानंतर होणार कारवाई. तहसीलदार संदिप खोमणे सिंडिकेट चालवत होते अशा आमदार विजयसिंह पंडित यांच्या आरोपानंतर तहसीलदारांची कुंडली उघड. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गेवराईचे तहसीलदार संदिप खोमणे यांच्याविरोधात गंभीर गैरव्यवहार केल्याप्रकरणी निलंबनाचा प्रस्ताव पाठवला आहे. तहसीलदार खोमणे यांनी वाळू माफियांच्या फायद्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने 6 खोटे आदेश काढले आणि त्यांना मिळालेल्या 6 कारणे दाखवा नोटिसांना केराची टोपली दाखवली.

  • 21 Jun 2026 10:40 AM (IST)

    जाफराबाद शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

    जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेत वेगवेगळ्या प्रकारचे योगासने केली, सकाळपासूनच या कार्यक्रमाला जाफराबाद तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सहभाग नोंदवलाय,

  • 21 Jun 2026 10:30 AM (IST)

    सांगोला तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत लक्ष्मी मातेच्या मंदिरात धाडसी चोरी

    मंदिरातील देवीचा चांदीचा मुखवटा, सोन्याचे डोळे, सोन्याचे मनी मंगळसूत्र तसेच पितळेच्या धातूचा मोठा घोडा चोरट्यांनी केला लंपास. विशेष म्हणजे संपूर्ण घटना सीसीटीव्हीत झाली कैद . काल माध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके रवाना. या परिसरात पुरातन आणि नवसाला पावणाऱ्या देवीच्या मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली असून देवही आता सुरक्षित राहिले नाहीत का अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत…….

  • 21 Jun 2026 10:23 AM (IST)

    संजय राऊत यांची जोरदार टीका..

    संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश आहेत का? असा मोठा सवाल राऊत यांनी केला. अमित शहा एक व्यापारी असल्याचेही त्यांनी म्हटले.

  • 21 Jun 2026 10:20 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात आज 12 केंद्रावर पाच हजाराच्या आसपास विद्यार्थि नीटची परीक्षा

    शासकीय वाहनाद्वारे सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर रवाना झाल्या आहेत. राज्यात नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर जळगाव मध्ये देखील जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. माहितीनुसार जळगावात प्रश्नपत्रिका विमानाने आल्यानंतर शहरातील एका बँकेत बंदोबस्तात ठेवण्यात आल्या होत्या. प्रश्नपत्रिकाचे मोठ्या पोलीस बंदोबस्तात शासकीय वाहनातून परीक्षा केंद्रांवर वितरण करण्यात आले..

  • 21 Jun 2026 10:05 AM (IST)

    Re-NEET (UG) परीक्षा साठी प्रशासन सज्ज,परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त

    धाराशिव येथे होणाऱ्या Re-NEET (UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. धाराशिव शहरातील परीक्षा केंद्र बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
    जिल्ह्यातील ५ परीक्षा केंद्रांवर एकूण २०७२ विद्यार्थी परीक्षा देणार असून परीक्षा दुपारी २ ते ५.१५ या वेळेत होणार आहे. परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी CCTV, जॅमर, बसवण्यात आले आहेत या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी

  • 21 Jun 2026 09:45 AM (IST)

    हमनुमान मंदिर दुर्घटनेबाबत मंदिराच्या ट्रस्टची स्पष्ट भूमिका

    यशवाडी येथील हमनुमान मंदिर दुर्घटनेत मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष महंत शिवेंद्र चैतन्य स्वामी यांनी बांधकाम निकृष्ट दर्जाच झाल्याचे आरोप फेटाळले. मंदिरात भाविकांना दर्शनासाठी पाठवण्यासंधर्भात कंत्राट दाराकडून सुरक्षेबाबद कुठलीही सूचना देण्यात आली नसल्याचा मंदिर अध्यक्ष यांचा दावा. ठेकेदाराकडून मंदिराच्या बांधकामा संदर्भात विलंब झाल्याचं मंदिर ट्रस्ट यांच्याकडून स्पष्ट.

  • 21 Jun 2026 09:30 AM (IST)

    पेपरफुटीनंतर आज नीटची फेरपरीक्षा; परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा कडक पहारा

    देशभरात यापूर्वी नीट परीक्षेसंदर्भात पेपरफुटी, गैरप्रकार आणि पारदर्शकतेबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदाची फेरपरीक्षा अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि शिक्षण विभागाने संयुक्तपणे विशेष नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख, ओळखपत्रांची काटेकोर तपासणी, प्रवेशद्वारांवर सुरक्षा तपासणी तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

  • 21 Jun 2026 09:21 AM (IST)

    आता कुठे ना कुठे ‘ऑपरेशन तुडवा’- आदित्य ठाकरे

    राज्यात सध्या एकच खरी शिवसेना आहे, तर दुसरी केवळ गुलामांची टोळी आहे. एका चोराला मुख्यमंत्री बनवायचे आहे, म्हणूनच हा सगळा खेळ सुरू आहे. संजय राऊत यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे, आता कुठे ना कुठे ‘ऑपरेशन तुडवा’ नक्कीच पाहायला मिळणार आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 21 Jun 2026 09:20 AM (IST)

    पोलिस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा

    जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. पोलिस कवायत मैदानावर योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम पार पडला. स्वतः पोलिस अधीक्षक यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमात मोठ्या संखेने सहभागी झाले. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतः योग प्रात्यक्षिक करत कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे.

  • 21 Jun 2026 09:18 AM (IST)

    पंकजा मुंडेंनी साजरा केला योग दिवस

    मी योगा करते मध्ये थोडे दिवस माझा व्यायाम बंद होता परत सुरू केला आहे. जगान योगा स्वीकारलेला आहे त्यामुळे आपल्याला त्याची किंमत जास्त कळते पंतप्रधान मोदींनी एक वेगळा संकल्प केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या आवाजाला दर 21 तारखेला योगा दिवस करतो दररोज तो केला पाहिजे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

  • 21 Jun 2026 09:15 AM (IST)

    मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात

    गेल्या अनेक दिवस मुंबईकर नागरिक प्रतीक्षा करत असलेल्या पावसाला आज सुरुवात झाली आहे. रविवार असल्याने मुंबईतील रस्त्यावरती आज गर्दी कमी पाहायला मिळत आहे. परंतु आज सकाळपासून सुरू झालेल्या या पावसामुळे मुंबईकर नागरिकांना उकाडापासून दिलासा मिळालेला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us