Maharashtra News LIVE : जळगावात शरद पवार गटाचे शासकीय गाड्या अडवण्याचे आंदोलन
Maharashtra News LIVE : पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याने नागरिक हैराण आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पेट्रोल पंपाबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Maharashtra News LIVE : राज्यातील अनेक भागात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहेत. पेट्रोल पंपावर लांबच लांबा रांगा लागल्या आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यात डिझेलचा टँकर पोहचताच हातात कॅन घेऊन लोकांची धावपळ होताना दिसली. देशात कॉक्रोच पार्टीने धुमाकूळ घातला आहे. या पार्टीचे अकाऊंट सस्पेन्ड करण्यात आले असले तरी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युझर्स या पक्षाच्या समर्थनार्थ समोर आल्याचे दिसले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. ठाणे आणि पुण्यात शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे. तर शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची हमी सरकारने दिली आहे. तोपर्यंत बँकांनी वसुलीचा तगादा लावू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी 30 मे हा अल्टिमेटम दिला आहे. तर आज भाजप आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट घेणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
जळगावात शरद पवार गटाचे शासकीय गाड्या अडवण्याचे आंदोलन
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने शासकीय गाड्या अडवण्याचे आंदोलन सुरु केले आहे. प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी 25% डिझेल राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारावर शासकीय गाड्या अडवून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन केले जात आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन केले जात आहे.
-
पंढरपुरात सोशल मीडिया कमेंटवरुन दोन गटात हाणामारी
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गाव येथे सोशल मीडियावरील कमेंट्सच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही गटातील काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.
-
-
अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, बनावट कांदा बियाणे विक्रीचा प्रकार उघड
अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार
देहरे आणि शिंगवे नाईक येथे बनावट कांदा बियाणे विक्रीचा प्रकार उघड
उन्हाळी कांद्याच्या बियाण्यामध्ये खरीप हंगामातील लागवडीसाठी असलेल्या बियाण्यांची भेसळ केल्याचा आरोप
दोन शेतकऱ्यांचे आठ ते दहा लाखांचे नुकसान; शेतकरी हवालदिल
या प्रकरणात गुन्हा दाखल
महाबीज आणि कृषी विद्यापीठाच्या पाहणीत सदोष बियाणे असल्याचे स्पष्ट
-
भीमाशंकरच्या हद्दीवरून खेड, आंबेगाव आमनेसामने; मोहिते पाटील आक्रमक, वळसे पाटलांचा पलटवार
भीमाशंकर मंदिर खेड की आंबेगाव तालुक्यात, यावरून राजकीय वाद पेटला असून खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे.
-
पिंपरी चिंचवड शहरात अवकाळी पावसाची हजेरी
पिंपरी चिंचवड शहरामध्ये दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहराच्या विविध भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. दुपारपासूनच शहरात अनेक भागांमध्ये ढग जमा होऊ लागले होते. ढग जमा झाल्यामुळे संपूर्ण शहरात अंधारमय परिस्थिती निर्माण झाली आहे,अखेर चारच्या सुमाराला पावसाने हजेरी लावत उकड्यापासून नागरिकांना दिलासा दिला आहे.
-
शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सणसवाडी परिसर अक्षरशः पावसाने झोडपून निघाला आहे. यावेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली . वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे सणसवाडी परिसरात पाणीच पाणी झाले आहे. सकाळपासून वातावरण उकाडा जाणवत होता या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
-
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये तीन नव्या भव्य दालनांची सुरुवात
सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी आणि इतिहास संशोधकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संग्रहालयामध्ये नव्याने वस्त्र दालन, संकीर्ण दालन आणि चित्र दालन अशी तीन भव्य दालने सुरू करण्यात आली आहेत. या नव्या दालनांमुळे आता संग्रहालयाची एकूण दालन संख्या ७ झाली आहे, अशी माहिती संग्रहालयाचे व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी दिली. -
मुक्ताईनगरात पेट्रोल, डिझेल पुरवठा सुरळीत, लोकांना दिलासा
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा परिसरातील एस आर पेट्रोल पंपावर आणि द्वारका किसन पंपावर पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. काल एस आर पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी एक ते अर्धा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. -
शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून द्यावे, अहिल्यानगरात मागणी
अहिल्यानगर : राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असताना शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांना प्राधान्याने इंधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये महासंघाचे पदाधिकारी बाबासाहेब सानप यांनी ही मागणी केली आहे. सध्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी आणि वाहतूक व्यवसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघाच्या वतीने पेट्रोल पंप चालकांना शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. -
पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करु देऊ नका-फडणवीस
‘काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झालीय’…. पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करु देऊ नका… इंधन तुटवड्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना….
-
विकास लवांडेंची 2017च्या गुन्हा क्रमांक 32मधून निर्दोष मुक्तता
विकास लवांडेंची 2017च्या गुन्हा क्रमांक 32मधून निर्दोष मुक्तता…. पोलिसांनी लवांडेंवर गुन्हा क्रमांक 33 दाखवला… गुन्हा क्रमांक 33 नजरचुकीने झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय…
-
रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद
रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद… साडेतीन हजार नौका धक्क्याला लागणार… माशांच्या प्रजनन काळाच्या संरक्षणासाठी शासनाचा निर्णय… नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा…
-
ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण
ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण. दोन्ही पालक IAS अधिकारी असल्यास मुलांना आरक्षणाचा हक्क का मिळावा? ‘पालक चांगली नोकरी करतात तरी मुले आरक्षणाची मागणी करतच राहतात’- कोर्ट. ‘क्रिमी लेयर’साठीच्या आरक्षणासंदर्भातील याचिकेवर सुनावणी पार पडली
-
पेट्रोल-डिझेल कॅन मध्ये दिल्यास कारवाई
जळगाव जिल्ह्यात आजपासून पेट्रोल पंपांवर कॅन तसेच बॉटलमध्ये पेट्रोल-डिझेल न देण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश. पेट्रोल-डिझेल कॅन मध्ये दिल्यास पेट्रोल पंप चालकावर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून इशारा. कॅन व बॉटलमध्ये पेट्रोल-डिझेल मिळणार नाही असे जळगावातील पेट्रोल पंपांवर लागले फलक.
-
वांद्रे दगडफेक प्रकरणात आणखी तीन आरोपींना अटक
वांद्रे गरीब नगर दगडफेक प्रकरणात आणखी तीन आरोपींना अटक. दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 19 जणांना अटक केली आहे. ड्रोन आणि व्हिडिओच्या मदतीने दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आली.
-
रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद
रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद… साडेतीन हजार नौका धक्क्याला लागणार… माशांच्या प्रजनन काळाच्या संरक्षणासाठी शासनाचा निर्णय… नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा…
-
मनोज जरांगेंवर पुन्हा उपोषणाची वेळ येऊ देणार नाही – प्रसाद लाड
मनोज जरांगेंवर पुन्हा उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर. 29 तारखेला पुन्हा जरांगेंच्या भेटीला येईन असं प्रसाद लाड म्हणाले.
-
यवतमाळ जिल्ह्यातील डिझेल तुटवड्यावर खासदार संजय देशमुख ॲक्शन मोडमध्ये
खासदार संजय देशमुख यांची जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासोबत मोबाइलवरुन तातडीची चर्चा. पेरणीपूर्व मशागतीमुळे जिल्ह्यात डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक पेट्रोल पंपांवर शेतकरी व नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र. ‘शेतकऱ्यांना डिझेल कमी पडू देणार नाही’ जिल्हाधिकारी विकास मीना यांचा दिलासा. संबंधित विभागाशी समन्वय साधून अतिरिक्त पुरवठ्याच्या प्रशासनाकडून सूचना.
-
उल्हासनगर गोळीबार प्रकरण : दोन जणांना अटक
उल्हासनगरच्या कैलास कॉलनी मध्ये झालेल्या गोळीबारात दोन जणांना अटक. जुन्या वादातून गोळीबार झाला होता. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव याला पोलिसांनी अटक केली. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली .
-
डिझेल टंचाईचा मालेगावच्या कापड उद्योगाला मोठा फटका
डिझेल टंचाईचा मालेगावच्या कापड उद्योगाला मोठा फटका बसला आहे. वाहतूकदारांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत असून ट्रान्सपोर्ट व्यवस्था विस्कळीत झाली आहे. डिझेल अभावी अनेक ट्रक आणि मालवाहू वाहने ठप्प झालीत, तयार कापडाची वाहतूक थांबल्याने ट्रान्सपोर्टरकडे मोठ्या प्रमाणात माल अडकला आहे. रोज धावणारी शेकडो वाहने इंधनाअभावी बंद पडल्याने उद्योग क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे.
-
जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपावर लागले नो स्टॉकचे फलक
जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक लागलेत. इंधन नसल्यामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहने बदनापूर शहरातल्या पेट्रोल पंपावर उभे असल्याच चित्र दिसत आहे. ऐन खरीप हंगामात डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. तर कॅन आणि ड्रम मध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
-
पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करू नका – मुख्यमंत्री फडणवीस
पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, पण साठेबाजी होऊ देऊ नका, असं ते म्हणाले.
-
गोंदिया काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष, अमर वऱ्हाडे यांच्या नियुक्तीची जोरदार चर्चा
गोंदिया काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष. अमर वऱ्हाडे यांच्या नियुक्तीची जोरदार चर्चा. वऱ्हाडे यांच्या नियुक्तीने काँग्रेस वर्तुळात खळबळ माजली असून राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू आहे. संघटन सृजन अभियानांतर्गत बदल करण्यात आला. गोंदिया काँग्रेसच्या नेतृत्वात नवा चेहरा समोर आला..
-
मराठा समाजामुळे आमदार झालो. तुमच्यामुळे समाजाला देशात मान मिळाला – प्रसाद लाड
मराठा समाजामुळे आमदार झालो. तुमच्यामुळे समाजाला देशात मान मिळाला. तुमचा मला व्यक्तिगत सत्कार करायचा होता. तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा द्वेष दूर करायचा होता. आंदोलन करताना काही विषय मांडले जातात, काही विषयांची ग्वाही दिली जाते. काही विषय अडून राहतात ते अडलेले विषय काय आहेत? माझ्या माध्यमातून आपल्याला काही मदत होऊ शकते का? मी तुमचा दूत बून शकतो का?” असं प्रसाद लाड म्हणाले.
-
ठाण्यातील गावदेवी भाजी मंडई आग प्रकरणी मोठी अपडेट
ठाण्यातील गावदेवी भाजी मंडई या ठिकाणी काल पहाटे मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली होती.. मोठं नुकसान व्यापारी वर्गांचे झाले आहे ..या भाजी मंडई मध्ये 60 ते 70 टक्के गाळे कपडे चप्पल इतर वस्तूंनी भरलेले होते या संदर्भात अनेकांनी आक्षेप घेतला होता… या आगीमध्ये एक सुरक्षारक्षक आणि एक अग्निशमन जवान यांचं निधन झाले असून महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी दखल घेत कुटुंबीयांना 10 लाखांची मदत केली आहे… 31 मे पर्यंत 155 दुकानदारांना उपायोजना केली जाणार असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील सांगितले आहे.
-
सरकारने फक्त एकदा सांगावं की याला १ रुपया दिला – जरांगे पाटील
मी पैशाने, पदाने फुटत नाही. मला कोणी दाखवून द्यावं की मी एक रुपया तरी घेतला, मी उद्या सकाळी फाशी घेतो, नाही घेतला तर दोन बापाचा औलाद. सरकारने फक्त एकदा सांगावं की याला १ रुपया दिला, ७०० रुपयाचं काम दिलंय, हे कोणीही सांगावं… असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.
-
राज्यातील ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली – जरांगे पाटील
राज्यातील ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. मी गेल्या ८ महिन्यांत विखे पाटील यांना अनेकदा फोन करून हा विषय त्यांच्या कानावर घातला. महामंडळाच्या विषयात परतावे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तब्बल ६०० कोटी रुपये थकले आहेत…. असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.
-
सरकारला जे सत्य आहे ते करावंच लागणार – जरांगे पाटील
सरकारला जे सत्य आहे ते करावंच लागणार… हैदराबादचा जीआर काढला, आता प्रमाणपत्र का देत नाही? असा प्रश्न देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
-
पुन्हा मालेगावात सार्वजनिक नागरी सुविधा समितीने उपसले आंदोलनच शस्त्र
मालेगावात मोसम नदी पात्रात वारंवार रक्त मिश्रीत सोडले जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन तापले आहे. गेल्या १५ ते २० वर्षापासून वारंवार आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस अजून आंदोलकांची तब्बेत खालावली आहे. थेट जिल्हाधिकारी दखल घेत नाहीत तोपर्यंत आंदोलक आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेण्यात आली आहे. मनपा आणि प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे वर्षानुवर्षाचा प्रश्न प्रलंबित आहे. निर्णय न झाल्यास आंदोलनाच्या ठिकाणी गायी बांधणार आंदोलकांचा निर्धार…
-
आमच्या माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या, तेव्हा आम्ही गप्प का बसावं? – जरांगे पाटील
“त्या दिवशी आमच्या माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या, तेव्हा आम्ही गप्प का बसावं? रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस तयार नव्हते. छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्ताने मारलं होतं. तुम्ही हे सहन करून दाखवला का ? “असा सवाल त्यांनी विचारला. आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये? असा थेट सवालही जरांगे यांनी यावेळी लाड यांना विचारला.
-
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का नाही दिलं? – जरांगे पाटील
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र का नाही दिलं? अंतरवारी सराटीत आमच्यावर का अन्याय केला… मुख्यमंत्री आमच्यासाठी शत्रू नाहीत, आम्ही समाजासाठी भांडतोय… 83 नंबरला मराठा, कुणबी असा जीआर तो का रद्द केला… असा प्रश्न देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
-
वांद्रे स्टेशन गरीब नगर तोडक कारवाईबाबत बांद्रातील मशिदींवर आज मुंबई पोलिसांचं विशेष लक्ष
वांद्रे स्टेशन गरीब नगर तोडक कारवाईबाबत बांद्रातील मशिदींवर आज मुंबई पोलिसांचं विशेष लक्ष आहे. दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे पोलिसांना संकेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आधी शुक्रवारच्या नमाज नंतर मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर वांद्रेतील स्थानिक खासदार, आमदारांवर अनेकांची नाराजी आहे. मुंबई पोलीस हाय अलर्ट मोडवर आहेत.
-
गोंदियात उष्णतेचा भीषण कहर, सलग दुसऱ्या दिवशी तापमानात मोठी वाढ
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर वाढलेल्या उष्णतेने आता भीषण रूप धारण केले आहे. सलग दुसऱ्या दिवशी तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून पारा तब्बल ४५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, अति उष्णतेचा फटका बसून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने आगामी काळात तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, प्रशासनाने नागरिकांना उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
-
मी समाजासाठी मरायला तयार, कुठे येऊ सांगा, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड स्पष्टच बोलले
प्रसाद लाड यांनी नुकतंच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. येत्या ३० मे पासून आंदोलन करु नका, आता हत्ती गेलंय शेपूट राहिलंय. मनोज दादांच्या ७ ते ८ मागण्या समजून घेणार, मी समाजासाठी मरायला तयार आहे, मी कुठे येऊ सांगा तिथे येतो, असे प्रसाद लाड म्हणाले.
-
पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, १० वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याची झडप
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळ मॉर्निंग वॉक करत असलेल्या काव्या महेंद्र वाकचौरे या १० वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने अचानक झडप घातली. काव्या आपल्या बहिणीसोबत चालत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यावेळी काव्याने केलेल्या आरडाओरड्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांचा वाढता गोंधळ पाहून बिबट्याने मुलीला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्या गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे ओतूर परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
परळीत मध्यरात्री थरार, तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, एकाला अटक
बीड जिल्ह्यातील परळीमध्ये मध्यरात्री आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारभारी नारायण आंधळे असे मृत तरुणाचे नाव आहे. बस स्टँड ते घरणीकर रोडवर असलेल्या वाहन तळाच्या परिसरात रात्री उशिरा दोन जणांनी कारभारी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या कारभारी यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
-
सोलापुरात पहाटेपासून ढगाळ वातावरण; हलक्या पावसामुळे तापमानाचा पारा घसरला
मागील दीड महिन्यांपासून ४० अंश सेल्सिअसच्या पार गेलेल्या तापमानामुळे आणि तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोलापूर शहरात आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सकाळच्या सुमारास शहरातील विविध भागांमध्ये हलक्या ते रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, कडक उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना काही प्रमाणात तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
-
जळगावात डिझेलच्या तुटवड्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय कोलमडला; मालवाहू वाहनांची चाके थांबली!
डिझेलच्या तीव्र तुटवड्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट आणि मालवाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातून देशभरात १,००० पेक्षा जास्त वाहनांच्या माध्यमातून मालवाहतूक केली जाते; मात्र डिझेल नसल्यामुळे यातील जवळपास ५०० मालवाहू वाहने जागेवरच थांबून आहेत. ट्रान्सपोर्ट व्यवसायातून रोज होणारी ४ ते ५ कोटी रुपयांची उलाढाल यामुळे पूर्णपणे ठप्प झाली असून व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, बाहेरील जिल्ह्यातून माल घेऊन येणारी-जाणारी वाहने रस्त्यातच अडकल्याने त्यातील नाशवंत माल खराब होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने आणि विनाअडचण डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष जसपाल सिंह बग्गा यांनी केली आहे.
-
वांद्रे गरीब नगर परिसरातील पाडकाम ९० टक्के पूर्ण, चौथ्या दिवशीही रेल्वेची कारवाई सुरूच
वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात रेल्वे प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा आज चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली ही पाडकाम कारवाई आता जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली असून, ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आज शुक्रवार म्हणजेच ‘जुम्मा’चा दिवस असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन आणि पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
-
पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जळगावातील तीन पेट्रोल पंप बंद…
आकाशवाणी चौकातील जैन ब्रदर्स, जिल्हा पेठ परिसरातील पोलिसांच्या मालकीचा दक्षता पेट्रोल पंप व पांडे चौकातील इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप बंद. या तीनही पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा पूर्णपणे संपल्यामुळे दोन दिवसांपासून पेट्रोल पंप बंद आहे. पंप बंद असल्यामुळे नागरिकांना लक्षात यावे म्हणून तीनही पंप आवारात बॅरिगेटिंग करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. डिझेल बरोबरच जळगाव शहरात आता पेट्रोलचे देखील टंचाई तसेच तुटवडा जाणवत असल्याचा पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंप बंदमुळे नागरिकांना वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पेट्रोल डिझेल साठी शोधाशोध करावे लागत आ
-
नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी संजय येनपुरे यांची नियुक्ती
प्रवीण पडवळ यांची अवघ्या पाच दिवसांतच बदली. पडवळ यांची दादर येथील व्हीआयपी सुरक्षा विभागात नियुक्ती. दत्तात्रय कराळे यांच्या बदलीनंतर पडवळ यांच्याकडे देण्यात आली होती जबाबदारी. आता व्हीआयपी सुरक्षा विभागातून संजय येनपुरे नाशिक परिक्षेत्रात दाखल होणार. राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
-
आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन..
आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन देण्यात आला. हॉटेलमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. प्रसाद लाड हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी असताना त्यांना हा धमकीचा फोन आला.
-
अमरावती जिल्ह्यात उद्यापर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट कायम..
अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून उष्णतेचा कहर. अमरावतीच्या हवामान इतिहासातील सर्वात मोठा उन्हाळा. सलग दहा दिवस तापमानाचा पारा 45.5 अंशावर. 23 तारखेपर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट. 26 मे नंतरच अमरावतीकरांना उष्णते पासून मिळणार काहीसा दिलासा….
-
प्रसाद लाड निघाले मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला…
मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना भेटीकरिता बोलावले होते. 23 तारखेपर्यंत वेळ भेटीकरिता दिला होता. त्यानंतर आज प्रसाद लाड भेटीकरिता निघाले आहेत.
-
जळगाव शहरात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा कायम
जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर कॅन घेऊन सकाळपासूनच ग्रामीण भागातले शेतकरी रांगेमध्ये थांबून. दुसरीकडे चार चाकी वाहनांच्या देखील पेट्रोल पंप बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानंतर देखील नागरिकांकडून पंपांवर गर्दी कायम. नागरिकांनी भीती बाळगू नये जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल डिझेलचा साठा असल्या बाबत तसेच गरजे व्यतिरिक्त नागरिकांनी पेट्रोल डिझेल खरेदी करू नये जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं
-
आज काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक
निवडणूक आयोग राबवत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक होत आहे. आज दुपारी १.३० वाजता टिळक भवन, दादर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे विशेष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
-
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून अधिक जागांवर दावा करण्यात येत आहे. १७ पैकी १२ जागा लढवण्यावर भाजप आग्रही आहेत. तर शिवसेना ७ जागेवर लढण्यासाठी आग्रही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील वाढलेल्या संख्याबळामुळे भाजप दावा सोडायला तयार नाही.
-
नाशिकमध्ये उद्या पाणीबाणी
नाशिक शहरातील काही भागात उद्या पुन्हा राहणार पाणीपुरवठा बंद असेल. सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागाचा उद्या पाणीपुरवठा बंद असेल. मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने महापालिकेकडून तातडीची दुरुस्ती करण्यात आली आहे. शनिवारी अनेक भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. मोतीवाला कॉलेज रोड परिसरात ५०० मिमी पीएससी मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे.
-
मराठवाड्यातील पदाधिकार्यांची आज मातोश्रीवर बैठक
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक होत आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे.
-
सोलापूरात वृक्ष लागवड मोहीम
सोलापुरात वाढत्या तापमान वाढीचे संकट लक्षात घेता वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येते आहे. ग्रीन सोलापूर मिशनतर्फे एक घर एक झाडे उपक्रमांतर्गत 5000 झाडांचे वाटप करण्यात आले आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या उपस्थितीत वृक्षवाटप मोहीम राबविण्यात आली आहे. सोलापुरातील 12 लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक घरासमोर एक झाड लावण्याची संकल्पना राबवण्यात येणार आहे.
-
टोमॅटोच्या दरात मोठी घसरण
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोची लाली उतरली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 रुपयांची 20 किलोच्या कॅरेट्स मागे घसरण झाली आहे. डिझेल तुटवड्यामुळे ट्रक उपलब्ध होत नसल्याने टोमॅटो राज्यात पाठवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने घसरण झाली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.