Maharashtra News LIVE : वाशिम : रिसोड शहरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस, उकड्यापासून दिलासा

Maharashtra News LIVE : शिंदे गटातील अस्वस्थता पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय वर्तुळात नव्या ‘ऑपरेशन’ची जोरदार चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि ‘नव्या ऑपरेशन’ च्या चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra News LIVE :  वाशिम : रिसोड शहरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस, उकड्यापासून दिलासा
tv9 updates
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 26, 2026 | 5:48 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 26 May 2026 05:48 PM (IST)

    यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

    यवतमाळमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  उकड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.  गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ हे उष्णतेच्या झळा सोसत होते. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे होता. आज दुपारपासून वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.

  • 26 May 2026 05:21 PM (IST)

    अतिक्रमणामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले

    जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातलील अतिक्रमण पाहून महापौर दीपमाळा काळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे. महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकूर, उपायुक्त पंकज गोसावी यांना महापौर दीपमाळा काळे यांनी खडेबोल सुनावले आहेत.


  • 26 May 2026 05:08 PM (IST)

    वाशिम : रिसोड शहरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस, उकड्यापासून दिलासा

    वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह आजूबाजूच्या परिसरात आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

  • 26 May 2026 04:58 PM (IST)

    गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथीनिमित्त पंकजा मुंडे यांचे आवाहन, म्हणाल्या…

    दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची ३ जून रोजी पुण्यतिथी असते आणि याच पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थकांना आवाहन केले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्यामुळे यंदाची पुण्यतिथी सर्वांनी आपल्या गावी साजरी करून त्याचे फोटो मला शेअर करावेत असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाले आहेत.

  • 26 May 2026 04:48 PM (IST)

    मिरज तालुक्यातील विजयनगरमध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारवर छापा

    सांगलीच्या मिरज तालुक्यातील विजयनगरमध्ये सुरू असणाऱ्या डान्सबारवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे. पहाटेपर्यंत सुरू असणाऱ्या कारवाईमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच महिलावर कारवाई करण्यात आली आहे. तर ग्राहक म्हणून आलेल्या सांगली जिल्ह्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.


  • 26 May 2026 04:24 PM (IST)

    परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपी धीरज गायकवाड याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीचे अल्पवयीन पीडित मुलीसोबत प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 26 May 2026 04:09 PM (IST)

    ड्यांचे किटसाठी केवायसी गरजेचे, जळगावात महिलांची लांब रांग

    जळगावच्या वावडदा येथे भांड्यांचे किट साठी आवश्यक केवायसी करण्यासाठी महिलांच्या एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब लांगा लागल्या आहेत. भांडे मिळावी यासाठी आवश्यक केवायसी करण्यासाठी भर उन्हामध्ये महिला सकाळपासूनच लांब लांब रांगांमध्ये उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • 26 May 2026 03:52 PM (IST)

    धुळे महानगरातील प्रमुख चार पंपावरील पेट्रोल साठा संपला

    संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलच्या कमतरतेमुळे वाहनधारक त्रास असताना धुळे शहरात पेट्रोल डिझेलची कमतरता नव्हती. आज मात्र धुळे महानगरातील चार पेट्रोल पंपावरील साठा संपल्याने वाहनधारकांना भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. काल रात्रीपर्यंत सर्वच पंपांवर साठा होता, मात्र आज दुपारपर्यंत टप्प्याटप्प्याने पेट्रोल आणि डिझेल संपल्याने वाहनधारकांना पेट्रोल डिझेल भेटत नाहीये.

  • 26 May 2026 02:55 PM (IST)

    बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

    पेट्रोलच्या किमतीमध्ये होत असलेली वाढ पेट्रोलचा तुटवडा तसेच नरेंद्र मोदींचा इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याचं आवाहन केले आहे. डिझेल बरोबरच पेट्रोलची देखील तुडवड्याची समस्या, सलग होत असलेली दरवाढ या गोष्टीचा इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीवर परिणाम. महिन्याला 200 इलेक्ट्रिक दुचाकीची विक्री होत होती आता विक्री दुपटीने वाढली असून 400 ते 500 दुचाकींची विक्री होत असल्याची माहिती व्यवस्थापकांची माहिती.

  • 26 May 2026 02:49 PM (IST)

    सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंपावर धाड

    मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंपावर धाड टाकण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील शाह पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी अचानक धाड टाकली. जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाच्या खरेदी-विक्रीचे दप्तर तपासले.

  • 26 May 2026 02:30 PM (IST)

    मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला

    मंत्रालयात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मंत्रालयामध्ये दहा हजार पेक्षा जास्त रकमेला घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने संजय राठोड यांच्या कार्यालयात 80 हजार रुपये आले कसे याबाबत चर्चांना उधाण.

  • 26 May 2026 02:13 PM (IST)

    नाशिकच्या रामकुंडावर आमदार रोहित पवार दाखल

    नाशिकच्या रामकुंडावर आमदार रोहित पवार , शशिकांत शिंदे , खासदार भास्कर भगरे दाखल झाले आहेत. रामकुंडावर आज पासून रिंग रोड आणि एम आय डी सी भूसंपादन विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरु आहे.

  • 26 May 2026 01:55 PM (IST)

    पुण्यात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

    पुण्यात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर. काँग्रेसचे नेते सतेज पाटलांवर उघड नाराजी. कोल्हापूरचा पैलवान पुण्यात आला कोल्हापुरात
    हरला, आणि पुण्यातही पक्ष सपाट केला अशा आशयाचे बॅनर. सतेज पाटील पुण्यात काँग्रेसचे प्रभारी आहेत

  • 26 May 2026 01:45 PM (IST)

    उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दिल्लीत शाहांची भेट- सूत्र

    उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दिल्लीत शाहांची भेट. शिंदेंनी अचानक दिल्ली गाठून रविवारी शाहांची भेट घेतली. शिंदे-शाहांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता, सूत्रांची माहिती. भेटीदरम्यान शिंदेंसोबत एक शिक्षणसम्राट माजी मंत्रीही उपस्थितीत होते- सूत्र

  • 26 May 2026 01:33 PM (IST)

    पेट्रोल-डिझेलच्या पाठोपाठ CNGच्या दरात पुन्हा वाढ

    पेट्रोल-डिझेलच्या पाठोपाठ CNGच्या दरात पुन्हा वाढ. CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. 12 दिवसात चौथ्यांदा CNGच्या दरात वाढ. मुंबईतदेखील CNGच्या दरात दोन रुपयांनी वाढ. मुंबईत CNGचे दर प्रतिकिलो 84 रुपयांवर

  • 26 May 2026 01:15 PM (IST)

    विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटण्याची शक्यता

    विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली महायुतीची बैठक. वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी होणार बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे, उदय सामंत राहणार उपस्थित

  • 26 May 2026 01:00 PM (IST)

    कांदा आंदोलनातील शेतकरीही ताब्यात

    कांदा आंदोलनातील राजकीय नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. रस्त्यावरील शेतकरी आंदोलकांना पोलिसांना बाजूला केले. शेतकऱ्यांना ताब्यात घेत पोलिस स्थानकात नेण्यात आले. मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक पोलिसांकडून सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा त्याला कडाडून विरोध सुरू आहे.

     

  • 26 May 2026 12:50 PM (IST)

    काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतात नांगरटीला जुंपले

    मुक्ताईनगर पेट्रोल ,डिझेल टंचाईच्या निषेधार्थ थेट काँग्रेस कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी शेतात नांगरटी तिफन हाती घेत पेट्रोल डिझेल टंचाईच्या निषेधार्थ आंदोलन केले. केंद्र सरकार राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध नोंदवला

  • 26 May 2026 12:40 PM (IST)

    शासन निर्णयाचा बोजवारा

    एकत्रित तीन महिन्याचा रेशन धान्य देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा जळगाव जिल्ह्यात बोजवारा उडाला आहे. वाढता तापमानामुळे एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचं एकत्रित रेशन धान्य वितरित करण्याचे शासनाचे आदेश होते. शासन आदेशानंतर देखील रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना केवळ एप्रिल या एका महिन्याच धान्य वितरण, मे आणि जून चा धान्य वितरण अद्यापही बाकी आहे. मे महिना संपत आला तरी रेशन दुकानावर मे आणि जूनचा धान्यसाठा उपलब्ध नसल्याने रेशन धान्य लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत.

  • 26 May 2026 12:30 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलपंप दुपारी ड्राय

    मागच्या महिन्यात ज्या पद्धतीने इंधन पुरवठा होतो त्याच पद्धतीने सुरू आहे उलट यावर्षी वाढ झाली आहे. BPCL कंपनी सोडली तर IPCL आणि HPCL कंपनीकडून 23% ची वाढ झाली आहे. मागणी तेवढा पुरवठा नाही मात्र पुरवठा सगळीकडे होत आहे. आपल्याकडे 1900KL पेट्रोल आहे तर 1200KL डिझेल आहे, काही डिझेलचा साठा कमी आहे त्यामुळे जास्त गर्दी होत आहे. त्यामुळे काही पंप दुपारनंतर ड्राय होत आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.

  • 26 May 2026 12:20 PM (IST)

    धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात विशेष महासभेचा आयोजन

    महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन केले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन मधील भूमिगत गटार योजनेसाठी तब्बल दीडशे कोटी रुपये कर्ज घेण्याचा विषय चा विरोध करत विरोधकांचा सभा त्याग केला. महानगरपालिकेच्या शिष्याची 30 टक्के रक्कम देण्यासाठी महासभेमध्ये 150 कोटी रुपये मंजुरीचा विषय आहे. विरोधक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी दीडशे कोटी रुपये मंजुरीला विरोध करत सभात्याग केला.

  • 26 May 2026 12:10 PM (IST)

    एसटीच्या दरवाढीची शक्यता

    एसटी महामंडळाला चार कंपन्यांकडून डिझेल पुरवठा होतो. १० लाख ८७ हजार लीटर डिझेल लागते. हा पुरवठा थांबू नये, काही ठिकाणी पुरवठा कमी आहे. म्हणून या कंपन्यांना सूचना व विनंती केली आहे. एसटी महामंडळ ५५ लाख प्रवाशांना सेवा देते. प्रति लिटर नुकसान होत असले तरी महामंडळाचे नुकसान होणार नाही अशी मागणी केली आहे. त्यांनी ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्रत्येक आगारातून ५ लीटर बचत करण्याचे आवाहन केले आहे. त्यातून रोज १ हजार लिटर डिझेल बचत होईल, असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांनी एसटी दरवाढीचे संकेत दिले.

  • 26 May 2026 12:00 PM (IST)

    ठाणे पालघर विधानपरिषद निवडणूक अपडेट, ठाण्याची जागा शिवसेनेकडे?

    या जागेवर रवींद्र फाटक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. एकनाथ शिंदेंकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचसाठी मतदार म्हणून विविध पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत , बविआचे हितेंद्र ठाकूर यांची देखील २ दिवसांपूर्वी भेट घेतली होती.ठाण्यात शिवसेना पक्ष भाजपचे मतदार जास्त मात्र ठाण्यातील भाजपचा देखील पाठिंबा असल्याचा शिवसेनेने दावा केला आहे.

  • 26 May 2026 11:58 AM (IST)

    नाशिक – चांदवड येथील आंदोलना दरम्यान जोरदार घोषणाबाजी

    नाशिक –  चांदवड येथील आंदोलनादरम्यान महामार्गावरील गाड्यांची हवा काढण्याचा प्रयत्न . पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. आंदोलकांतर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गळ्यात कांद्याच्या माळा घालून सर्व नेते, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

  • 26 May 2026 11:46 AM (IST)

    चांदवडमध्ये आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

    कांद्याला समाधानकराक हमीभाव मिळावा म्हणून चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे, मात्र आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे.  हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार यांना पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवलं.

  • 26 May 2026 11:43 AM (IST)

    30 वर्ष निष्ठेनं काम करून योग्य दखल मिळाली नाही – आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठकीपूर्वी सातारा जिल्हाप्रमुखांनी पत्र लिहीत दिला राजीनामा

    आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे, मात्र बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हाप्रमुखाने भावनिक पत्र लिहीत राजीनामा दिला आहे.  सातारा जिल्हाप्रमुख  संजय भोसलेंची पत्रातून अंतर्गत नाराजी उघड केली आहे. 30 वर्ष निष्ठेनं काम करून योग्य दखल मिळाली नाही , असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

  • 26 May 2026 11:33 AM (IST)

    डिझेल दरवाढीचा फटका, गोंदियातील छोटे वाहतूकदार आर्थिक संकटात

    डिझेल दरवाढीचा फटका बसल्याने गोंदियातील छोटे वाहतूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत. इंधन महागाईने मालवाहतुकीचे गणित बिघडल्याची व्यथा वाहन चालकांनी मांडली.

    भाडे वाढवलं तर ग्राहक नाराज होतात, पण जुने दर परवडेनासे झालेत, त्यामुळे वाहतूकदार दुहेरी संकटात सापडले आहेत.

  • 26 May 2026 11:30 AM (IST)

    जालन्यात काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात झालमोरी आणि मेलोडी चॉकलेट वाटून आंदोलन

    जालन्यात काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात झालमोरी आणि मेलोडी चॉकलेट वाटून आंदोलन करण्यात आलं. जालना शहरातील बस स्थानक परिसरात काँग्रेसने आंदोलन केलं. गॅसटंचाई,पेपरलीक आणि इंधनदरवाढीच्या विरोधात झालमोरी आणि मेलोडी चॉकलेट वाटून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

  • 26 May 2026 11:19 AM (IST)

    बीड – माजलगाव शहरातील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी नागरिकांची गर्दी

    बीड – माजलगाव शहरातील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी नागरिकांची गर्दी झाली. शेती मशागतीच्या कामासाठी कॅनमधून डिझेल घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांनी पंपावर गर्दी केली आहे. तसेच वाहनांच्या देखील मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला दिसत आहे.

  • 26 May 2026 11:03 AM (IST)

    नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा  क्रांती महामोर्चा सुरू, कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक

    नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा  क्रांती महामोर्चा सुरू असून कांद्याला  भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झालेत. अनुदान नको, सबसिडी नको, फक्त कांद्याला भाव द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

  • 26 May 2026 10:57 AM (IST)

    राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 2 कोटींचा अवैध दारूसाठा जप्त

    पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटी 3 लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला. गोवा मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यातून अवैधरीत्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या दारूच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे.  इतक्या मोठ्या कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्वत्र कौतुक केले जातंय.

  • 26 May 2026 10:46 AM (IST)

    चंद्रपुरात तापमान वाढले, उष्माघाताने दोघांचा मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळत असून भद्रावती तालुक्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भद्रावतीमधील मुरसा येथे एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला, तर भद्रावती शहरातील आंबेडकर चौकातील एका पडक्या घरात राहणाऱ्या ६० वर्षीय निराधार महिला पौर्णिमा विक्रम पेटकर यांचाही मृत्यू झाला. प्रचंड उष्णतेमुळे उष्माघात होऊनच या दोन्ही व्यक्तींचा जीव गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमान सतत ४७ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात असल्याने नागरिक हैराण झाले असून, या वाढत्या उन्हाने प्रशासनाची चिंताही वाढवली आहे.

  • 26 May 2026 10:37 AM (IST)

    महावितरणच्या हलगर्जीपणामुळे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

    इगतपुरी तालुक्यातील घोटीवाडी येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र उर्फ पिंटू अशोक भगत असे या दुर्दैवी मृत युवकाचे नाव असून, विजेच्या उघड्या तारेचा झटका लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही विद्युत वाहिनी अंडरग्राउंड करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली होती, मात्र त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही आणि ही विद्युत वाहिनी तात्काळ अंडरग्राउंड केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

  • 26 May 2026 10:27 AM (IST)

    यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे सेनेच्या नगरसेवकाला रॉडने बेदम मारहाण; गुन्हा दाखल

    यवतमाळच्या आर्णी नगरपालिकेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथील शिंदे सेनेचे नगरसेवक पवन चाफले यांना पालिका इमारतीतच बेदम मारहाण करण्यात आली आहे. पवन चाफले हे उपनगराध्यक्षांच्या कॅबिनमध्ये बसले असताना, एका शुल्लक कारणावरून दोघांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात चाफले यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा आर्णी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एका आरोपीची ओळख पटली आहे तर दुसरा अज्ञात आहे. आर्णी पालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती समोर आली असून, नगरसेवकाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आरोपींविरोधातील गुन्ह्यांमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • 26 May 2026 10:17 AM (IST)

    डिझेलसाठी रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना डंपरची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

    जळगावच्या भडगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल येणार असल्याची माहिती मिळताच वाहनधारकांनी डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाच, एका डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा भरधाव डंपर थेट डिझेल मशीनवर जाऊन धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, डिझेल भरण्याचे यंत्र जागेवरून उखडून फेकले गेले. या अचानक झालेल्या अपघातामुळे पंप परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी एकच धावाधाव केली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

  • 26 May 2026 10:07 AM (IST)

    ठाणे विधान परिषद निवडणूक, रवींद्र फाटकांनी घेतली ठाकूर पिता-पुत्रांची भेट

    आगामी ठाणे विधान परिषद निवडणुकीत एक मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माजी आमदार रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेतली आहे. विश्वसनीय राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीने या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. बहुजन विकास आघाडीकडे एकूण ७१ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे ‘बविआ’चा हा पाठिंबा मिळाल्यास शिवसेनेच्या उमेदवाराचे पारडे कमालीचे जड होणार असून, या निवडणुकीची गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 26 May 2026 09:50 AM (IST)

    पालघर विधानपरिषद जागेवर येणार नवा ट्विस्ट

    एकनाथ शिंदे खेळणार नवी चाल. प्रहारनंतर बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू. हितेंद्र ठाकूर ह्यांच्या बहुजन विकास आघाडीचा वसई – विरार पट्ट्यात आहे दबदबा. विलीनीकरणासाठी एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर ह्यांच्यात चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती. विलीनीकरण झाल्यास रवींद्र फाटक ह्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता. ठाणे – पालघर विधानपरिषद जागेवर हितेंद्र ठाकूर ह्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर असणार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार

  • 26 May 2026 09:40 AM (IST)

    बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

    बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड येथेच कार्यरत एका न्यायाधीशांचा फोटो व नाव वापरून व्हाट्सअप वर काही जणांना मेसेज पाठवण्यात आले. यामध्ये पैशांची मागणी देखील करण्यात आली होती. परंतु हा क्रमांक 11 अंकी असल्याने संबंधितांना संशय आला त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यानंतर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • 26 May 2026 09:30 AM (IST)

    भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संशयिताच्या घरातील साहित्य जाळल्याची घटना

    जळगावात तानाजी मालुसरेनगरात भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संशयिताच्या घरातील साहित्य जाळल्याची घटना. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी राजू काळे व सचिन कोळी या
    दोघांना अटक केली आहे. अटकेतील राजू काळे व सचिन कोळी या दोघा आरोपींची घटनास्थळ परिसरातून शनी पेठ पोलिसांनी धिंड काढली.

     

  • 26 May 2026 09:20 AM (IST)

    जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

    जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये काल सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा दिलाय.अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसामुळे बदनापूर तालुक्यातील आंबा पिकाला मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात आंब्याची पडझड झाली.त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्याच मोठ नुकसान झाल असून शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, दरम्यान काल अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकरी बांधवांची मोठी दाणादाण उडाली.

  • 26 May 2026 09:07 AM (IST)

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल तुटवडा बघायला मिळत आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. परभणी, बीड, नांदेड या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा..

  • 26 May 2026 09:05 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत एकाचा उष्माघाताने तर तिघांचा उष्माघात सदृश्य लक्षणांनी मृत्यू

    जळगावातील चिंचोली येथील 57 वर्षीय सेंट्रिंग कामगार केशरलाल दौलत पाटील यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोंद. उन्हात काम करताना अचानक चक्कर येऊन पडले, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मयत घोषित केले. जिल्ह्यातील इतर घटनेत तीन जणांचा उलटी चक्कर यासह इतर उष्माघात सदृश्य लक्षणांनी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ३५ वर्षीय प्रवीण दत्तु मिस्तरी , ३६ वर्षीय श्रीकांत रमेश कोळी व ४० वर्षीय नंदू किशोर पाटील अशी मयत तिघांची नावे आहेत.

     

  • 26 May 2026 08:59 AM (IST)

    कांद्याचे घसरलेले दर आणि इंधनाच्या दरवाढविरोधात आज सोलापुरात काँग्रेसचं आंदोलन

    कांद्याचे घसरलेले दर आणि इंधनाच्या दरवाढविरोधात आज सोलापुरात काँग्रेसचं आंदोलन आहे. आंदोलनाच्या आधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कायदेशीर आणि सनदशीर मार्गाचा वापर करून आंदोलन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस पोलिसांनी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख तिरुपती परकीपंडला यांना बजावली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काही वेळात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको केला जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मार्केट यार्डजवळ मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

  • 26 May 2026 08:50 AM (IST)

    नाशिक – अकरावी प्रवेशाची आज अंतिम मुदत; आतापर्यंत ४९ हजार अर्ज दाखल

    नाशिक – अकरावी प्रवेशाची आज अंतिम मुदत असून आतापर्यंत ४९ हजार अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक पसंती विज्ञान शाखेला तर वाणिज्यचे केवळ ६८९८ अर्ज आहेत. नाशिक जिल्ह्यातील अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीसाठी अर्ज करण्याला २६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून आज ती संपुष्टात येणार आहे. प्रवेशाची मुदत संपल्यानंतर आता केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती डेटा स्क्रूटनी आणि प्रोसेसिंगची कामे करणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी सकाळी ११:०० वाजता पहिली गुणवत्ता यादी आणि कॉलेज अलॉटमेंट जाहीर केले जाणार आहेत.

  • 26 May 2026 08:40 AM (IST)

    चांदवड इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा

    नाशिक- चांदवड इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा काढणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नऊ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन हजार रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करा, विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्या, या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. या क्रांती महामोर्चात शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यासह खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, शोभाताई बच्छाव उपस्थित राहणार आहेत.

  • 26 May 2026 08:30 AM (IST)

    गिरीश महाजनांच्या पेट्रोल-डिझेलच्या काळाबाजारासंदर्भातील वक्तव्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर

    भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पेट्रोल डिझेलच्या काळाबाजार संदर्भातल्या वक्तव्यानंतर जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जळगाव जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या काळाबाजारासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून पोलीस विभागाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काळाबाजार होत असेल तर नागरिकांनी संपर्क तसेच तक्रार करावी, असं जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. पेट्रोल डिझेलचा काळाबाजार तसंच साठा केल्याचं आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची जिल्हाधिकारी यांची माहिती आहे.

     

  • 26 May 2026 08:20 AM (IST)

    अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरातील न्यू सिरवी बंधू मिठाईवाल्याची कामगाराकडूनच पोलखोल

    अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरातील न्यू सिरवी बंधू मिठाईवाल्याची कामगाराकडूनच पोलखोल करण्यात आली आहे. मिठाईवाल्याकडून तारीख संपलेला माल विकला जात असल्याचा कामगाराचा दावा आहे. समोसे २ दिवस फ्रीजमध्ये ठेवून विकले जात असल्याचाही आरोप कामगाराने केला. तर घरगुती गॅस सिलेंडर वापरला जात असल्याचं व्हिडिओत समोर आलं.

  • 26 May 2026 08:14 AM (IST)

    दिपाली सय्यद यांची चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या वादात उडी

    मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या वादात उडी घेतली आहे. महामंडळाच्या निवडणुकीबाबत कोर्टाचा निकाल 10 जूनला असताना 3400 सभासदांना ग्राह्य धरून निवडणूक जाहीर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 30 हजार सभासदांना त्यांच्या हक्काचा मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं, मग सभासदांनी भरलेल्या पैशांचं काय झालं, असा सवाल दिपाली सय्यद यांनी केला.

  • 26 May 2026 08:12 AM (IST)

    अशोक खरातनंतर आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

    भोंदू अशोक खरातनंतर आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अघोरी पूजा, दैवी तोडगे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भोंदू कमलेश अधिकारीविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूरच्या दोन भावांना मृत्यूयोगाची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. उज्जैनमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि दैवी उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मठ बांधण्याच्या बहाण्याने पीडितांची दोन एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचाही गंभीर आरोप त्याच्यावर आहे. अंनिसच्या प्रयत्नांनंतर गुन्हा दाखल झाला असून इंदीरानगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • 26 May 2026 08:11 AM (IST)

    नाशिक – एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला जाणार

    नाशिक – एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला जाणार आहे. मतीन पटेलच्या चौकशीत पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला होता. मोबाईलच्या माध्यमातून निदा खान संबंधित कनेक्शन शोधले जाणार आहेत. निदा खानसोबत फोनवरून संवाद झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. फोनच्या माध्यमातून कॉल डिटेल्ससह मेसेज चॅटिंग तपासले जाणार आहेत. फोनमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे मतीन पटेलची चौकशी केली जाणार आहे.

  • 26 May 2026 08:08 AM (IST)

    एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली अमित शाह यांची भेट

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली आहे. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि ‘नव्या ऑपरेशन’च्या चर्चांना उधाण आलं आहे. ⁠स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटातील नेत्यांशी संपर्क सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. काही माजी मंत्री आणि आमदारांमध्ये अस्वस्थतेचे संकेत आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये नाराजी वाढल्याचीही चर्चा आहे. दिल्ली दौऱ्यात राजकीय समीकरणांवर महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचाली वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत उकाडा कायम असून तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंशांवर नोंदवला जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रात्री उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. किमान तापमानातही मागील दोन दिवसांपासून सरासरी तापमानाहून वाढ नोंदवली जात आहे. सोमवारीही मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. तसंच मुंबईसह पालघर, ठाणे इथं बुधवारपर्यंत हीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात एकीकडे मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे विदर्भात तीव्र उष्णतेची लाटेसदृश स्थिती कायम आहे. त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची नोंद होत असून अचानक वातावरणात बदल होऊन बरसणाऱ्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळत आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Follow Us