Maharashtra News LIVE : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक, आज धाराशिवमध्ये होणार सभा

Maharashtra News LIVE : दोन दिवस समाधानकारक पाऊस बरसल्यानंतर पुण्यात पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली दिवसभर ढगाळ वातावरण होते पण पाऊस पडला नाही दोन दिवसांच्या तुलनेत तापमानातही वाढ नोंदवण्यात आले आहे पुढील दोन दिवसात मात्र आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, यासह महाराष्ट्र, देश, विदेश, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक, आज  धाराशिवमध्ये होणार सभा
| Updated on: Jun 27, 2026 | 10:44 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Jun 2026 10:55 AM (IST)

    महापौर हिमगौरी आडके शहरातील अतिक्रमणांबाबत आक्रमक

    महापौर हिमगौरी आडके शहरातील अतिक्रमणांबाबत आक्रमक झाल्या आहेत.  अधिकाऱ्यांना घेऊन महापौर थेट रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणाच्या ठिकाणी आल्या. अधिकाऱ्यांना आदेश देऊन जागीच अतिक्रमण तोडले. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला.  स्वतः महापौर रस्त्यावर उतरल्याने अतिक्रमित बांधकाम धारकांची धावपळ झाली.

  • 27 Jun 2026 10:43 AM (IST)

    दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 353 वा राज्यभिषेक सोहळा साजरा होतोय…

    दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 353 वा राज्यभिषेक सोहळा साजरा होतोय. या सोहळ्याला ऊपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे स्वातंत्राचा विजय सोहळा आहे… त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी गडावर दाखल झाले आहेत.

  • 27 Jun 2026 10:35 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 47 हजार 496 रूपये तर, चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 33 हजार 810 रुपयांनी वाढले आहेत.

  • 27 Jun 2026 10:20 AM (IST)

    शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यातील मेडशीत दाखल…

    आषाढी एकादशीनिमित्त पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. सुमारे ७०० वारकरी पालखीसोबत पायी प्रवास करत आहेत. मेडशी येथे भाविकांकडून पालखीचे उत्स्फूर्त आणि भव्य स्वागत करण्यात आलं.  विठ्ठल नामाच्या गजराने परिसर भक्तिमय झालं आहे. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.  आज पालखीचा मुक्काम डव्हा येथे आहे. चार दिवसांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव मार्गे पालखी मराठवाड्याकडे प्रस्थान करणार आहे.

  • 27 Jun 2026 09:47 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोनं- चांदीच्या दरात मोठी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.  सोन्याच्या दरात 2 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 47 हजार 496 रूपये झाले तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 33 हजार 810 रुपयांवर पोहोचले.

  • 27 Jun 2026 09:35 AM (IST)

    मिरा भाईंदर – गाडीतील एअरबॅग उघडल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

    मिरा-भाईंदर : प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, गाडीतील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव मोहित सोनी (२५) असे असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 27 Jun 2026 09:26 AM (IST)

    परभणी – बेकायदेशीर आयात केलेली बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त

    परभणीच्या बस स्थानक परिसरातून मेडइन पाकिस्तान आणि मेडइन इंडोनेशिया असलेली बेकायदेशीर आयात केलेली बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली.  अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत एकूण 27 हजार 85 रुपयाचा साठा जप्त केला. याप्रकरणी दुकान मालक पारसा राम यांच्यावर विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 27 Jun 2026 09:09 AM (IST)

    बीड – विलास घुले हत्या प्रकरणात एसआयटीकडून खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची होणार चौकशी

    बीड ब्रेक- विलास घुले हत्या प्रकरणात एसआयटी कडून खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी होणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सौरभ सोनावणे हे आज दुपारी केज पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत.

    विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने पुरवणी जबाबात नाव दिलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी एसआयटी ने पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • 27 Jun 2026 09:03 AM (IST)

    केतन अग्रवाल खून प्रकरणी आठ जणांचे जबाब नोंदवले

    पुणे – केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात लोहगड किल्ल्यावरील सुरक्षारक्षक, पायऱ्यांच्या मार्गावरील विक्रेत्यांचा समावेश आहे. सिया गोयलच्या भावाचा ही पोलिसांनी चौकशी करून महत्त्वाची माहिती घेतली

  • 27 Jun 2026 09:02 AM (IST)

    मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

    मुंबई,उपनगरी रेल्वे मार्गावरील स्ळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. २८) रेल्वेच्या माध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर ठाणे ते वाशी, नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

खासदारांच्या पक्षांतरनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिल्हाभर संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे.आज धाराशिव येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. तर बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात एसआयटी कडून खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एसटी महामंडळ प्रवाशांसाठी विविध सवलतींच्या योजना राबवते. तरीही एसटी बसच्या प्रवासाचा गैरफायदा घेऊन फुकट प्रवास करणारेही आढळतात. राज्यात धावणाऱ्या बसमध्ये वर्षात आढळलेल्या साडेसात हजार फुकट्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २३ लाख ८९ हजार ०८५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Follow Us