Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांची सही असली पाहिजे, दुसरं म्हणजे.. मनोज जरांगेंची मोठी मागणी

Maharashtra News LIVE : धाराशिव जिल्ह्यामध्ये डीजे संदर्भात या गणेशोत्सवात पहिला गुन्हा दाखल. गणेश आगमन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी वाजवल्याचा ठपका. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धाराशिव शहरात दोन,तेरखेड्यात एक गुन्हा. डॉल्बी साउंड सिस्टिम ऑपरेटरसह तिघांवर पोलिसांची कारवाई.

Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांची सही असली पाहिजे, दुसरं म्हणजे.. मनोज जरांगेंची मोठी मागणी
Breaking news
| Updated on: Sep 17, 2026 | 9:40 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 17 Sep 2026 09:55 AM (IST)

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा बांधवांनी घोषणा देत घातला गोंधळ

    गोंधळ करणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी घेतली ताब्यात. ध्वजारोहण पार पडल्यानंतर मराठा बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन. आठ ते दहा मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतली ताब्यात

  • 17 Sep 2026 09:50 AM (IST)

    तुळजाभवानीच्या शिवकालीन पलंगावरून घोडेगावात वाद

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगावात तुळजाभवानीच्या शिवकालीन परंपरेतील पलंगावरून वाद निर्माण झाला आहे. पलंग पुढे नेण्यावरून दोन गट आमनेसामने आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सध्या या पलंगाच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


  • 17 Sep 2026 09:39 AM (IST)

    जरांगेंनी उपोषण सोडल्याने मला आनंद- फडणवीस

    मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आहे, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, त्यांनी उपोषण सोडल्याने मला आनंद झाला.

  • 17 Sep 2026 09:20 AM (IST)

    धुळे शहरातील झेंडा चौकातील एकवीरा पार्कमध्ये दुर्मिळ पांढरा नाग आढळला

    धुळे शहरातील वर्दळीच्या झेंडा चौक परिसरातील एकवीरा पार्कमध्ये चक्क पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ ‘अल्बिनो’ नाग आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. नाग आढळल्याची माहिती स्थानिक रहिवासी योगेश शिंदे यांनी वॉर फाउंडेशनचे सर्परक्षक चंदन ठाकूर यांना दिली. माहिती मिळताच चंदन ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अत्यंत सावधगिरीने या नागाचे रेस्क्यू केले.

  • 17 Sep 2026 09:19 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरूवात ..

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. यादरम्यान त्यांनी दुष्काळावर मोठे विधान केले.


  • 17 Sep 2026 08:47 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांची सही असली पाहिजे, दुसरं म्हणजे.. मनोज जरांगेंची मोठी मागणी

    “58 लाखातील एकही नोंद कमी होणार नाही याची खात्री हवी. त्यावर मुख्यमंत्र्यांची सही असावी. दुसरं हैदराबाद गॅझेट नावानुसार, संख्येनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन वॅलिडिटी द्यावी लागेल” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

  • 17 Sep 2026 08:26 AM (IST)

    नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचा मोठा निर्णय

    जिंदाल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश. मृत सिद्धार्थ गोरेंचा रस्त्यावर आडवा टाकलेल्या पाईपच्या धडकेत झाला होता अपघात. जिंदाल कंपनीकडे गंगापूर थेट जलवाहिनीचे कंत्राट आहे. सिद्धार्थ गोरेंच्या मृत्यूला जिंदाल कंपनी जबाबदार असल्याचा ठेवला ठपका. कामाच्या दरम्यान निष्काळजीपणा आढळून आल्यानं महापौरांनी दिले आदेश.

     

     

  • 17 Sep 2026 08:24 AM (IST)

    अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं

    मनोज जरांंगे पाटील यांनी मागच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण आज सोडलं. विखे पाटील, दादा भुसे, प्रसाद लाड या सरकारी शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी काही अटींवर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.

मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण आज सोडलं. विखे पाटील, दादा भुसे, प्रसाद लाड या सरकारी शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी काही अटींवर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर आज सलग तिसऱ्यादिवशी सुनावणी होणार आहे. सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेचा युक्तीवाद सुरु आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बीड-पुणे एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ. अनेक दशकांपासूनचे बीडवासीयांचे हे स्वप्न आज साकार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडेल. मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणेंसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची असणार उपस्थिती.नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात. अडीच ते तीन महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा कायम. पावसाअभावी कापूस पिकाची वाढ खुंटली. कापसाच्या बोंडवरही पावसाचा परिणाम. पिकांसाठी केलेला खर्च निघणार का? शेतकऱ्यांची चिंता वाढली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us