Maharashtra News LIVE : चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल
Maharashtra News LIVE Updates : शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कपिल सिब्बल यांच्याकडून आज युक्तीवादाला सुरूवात होईल.

LIVE NEWS & UPDATES
-
नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्यांना रोख 10 लाखांचे बक्षीस जाहीर
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या विरोधात बार्शीतील सकल मराठा समाज आक्रमक. नवनाथ वाघमारेंना चोप देणाऱ्यांना रोख 10 लाखांचे बक्षीस जाहीर. सकल मराठा समाजाचे नेते डॉ. कपिल कोरके यांच्याकडून बक्षीस जाहीर.
-
पुण्यात आंदोलनात एक विद्यार्थी पडला बेशुद्ध
पुण्यातील मांजरी मध्ये विद्यार्थी आंदोलनात एक विद्यार्थी पडला बेशुद्ध. अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याने विद्यार्थी झाला अशक्त. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. काल रात्री त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर आज सोडण्यात आलं आहे.
-
-
चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल
चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रिअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार. उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर महत्त्वाच्या एमएसआरडीसी इंडस्ट्रिअल टाऊनशिप ॲक्टमध्ये परावर्तित करणार. रस्ते, गटारे आणि ड्रेनेजची देखभालही इंडस्ट्रिअल टाऊनशिप अंतर्गत होणार. कचरा, अस्वच्छता आणि सार्वजनिक उपद्रव रोखण्याचे अधिकार अथॉरिटीला जाणार.
-
बीबी का मकबऱ्यातील हौद बनले चक्क खेळाचे मैदान
बीबी का मकबऱ्यातील हौद बनले चक्क खेळाचे मैदान. बीबी का मकबरा परिसरात तरुणांची हुल्लडबाजी. ऐतिहासिक वास्तूच्या हौदात उतरून तरुणांचा खेळ.हुल्लडबाजी घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. नियम फक्त फलकांवरच? पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
-
‘शोलेच्या दोस्ती’वरून डोंबिवलीत राजकीय वाद! रवींद्र चव्हाणांच्या ‘धोक्याच्या’ इशाऱ्यावर मनसेचा पलटवार
‘काचेचे तुकडे उचलणारे कार्यकर्ते आम्ही… शोलेची दोस्ती आहे, पण ज्याच्यासोबत बसतात त्यांनाच सर्वात जास्त जीवाचा धोका’ – राजू पाटील-श्रीकांत शिंदेंच्या जवळिकीवरून रवींद्र चव्हाणांचा अप्रत्यक्ष इशारा. ‘३० वर्षे एकत्र असताना मैत्री आठवली नाही का?’ – ‘काचेचे तुकडे उचलणाऱ्यांनीच डोंबिवलीतील मैदाने चोरली’आधी जनतेची कामं करा, मग इतरांना सल्ले द्या’ मैदानांच्या मुद्द्यावरून हर्षद पाटलांचा रवींद्र चव्हाणवर हल्लाबोल. भाजप आमदार रवींद्र चव्हाण-मनसे शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांच्यातील शाब्दिक युद्धाने कल्याण-डोंबिवलीचं राजकीय वातावरण तापलं.
-
-
अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू..
अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूल मधील धक्कादायक घटना..चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हतरू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले असता उपचारादरम्यान राजेशचा मृत्यू झाला. पाच आदिवासी विद्यार्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती
-
नागपूरच्या वाघांची डरकाळी देशाच्या वेगवेगळ्या भागात गुंजणार
गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील वन्यजीव आता देशातील विविध प्राणी संग्रहालयांची शोभा वाढवणार. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने तब्बल आठ महिन्यानंतर अदलाबदल प्रस्तावाला दिली मंजुरी. या प्रस्तावांतर्गत गोरेवाड्यातून चार वाघ पाच वाघिणी आणि दोन बिबटे स्थानांतरित केले जाणार आहेत, तर नागपूरकरांच्या भेटीसाठी हिमालयीन ब्लॅक बियर आणि देखणा रेड जंगल फाऊल पक्षी गोरेवाड्यात दाखल होणार आहे
-
सोलापुरात आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन
मराठा समाजातील महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या विरोधात आंदोलन. नवनाथ वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काल मराठा समाजाने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने मराठा समाजातर्फे आज आंदोलन करण्यात येणार
-
लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने मित्राच्या साथीने प्रियकराची घरात चाकूने गळा चिरून केली हत्या
पुरावा नष्ट करण्यासाठी १८ तास मृतदेह घरात ठेवून नंतर कारमधून नेत कसारा घाटात फेकला. मृतदेह फेकल्यानंतर मुंबई फिरले, आणि रक्ताचे डाग धुतले. वसंत गोरखनाथ सातपुते असे चाळीस वर्षीय मृत व्यक्तीचे नाव. कुठलाही गुन्हा दाखल नसताना गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा आणला उघडकीस. हसिना शेख व तिचा मित्र साहिल शहा आणि साथीदारांनी कारमधून मृतदेह नेल्याची पोलिसांना दिली होती गुप्त माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दोघांना अटक
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामध्येच मोठ्या घडामोडी घडणार आहे. सुप्रीम कोर्टात दुपारी दोन वाजता सुनावणीला सुरूवात होईल.
सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ही सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवादाला सुरूवात होईल. दुपारी 2 वाजता ही सुनावणी कोर्टात सुरू होईल. कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद कोर्टात केला जात आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वाजले भलतेच वंदे मातरम् गाण. परिवहन विभागाच्या कार्यक्रमात वंदेमातरम ऐवजी वाजले बॉलिवूड गीत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. आता त्यावरून वाद रंगण्याची शक्यता आज आहे. अमराठी भाषिकांना मराठी शिकवणी अभियान समाप्ती अभियानाच्या सांगता कार्यक्रमात घडला प्रकार.