Maharashtra News LIVE : अभिजीत दिपकेंकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान? दरेकर यांचा गंभीर आरोप

Maharashtra News LIVE : काल दादरमध्ये झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. आता या आंदोलनाचे पडसात काय उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News LIVE : अभिजीत दिपकेंकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान? दरेकर यांचा गंभीर आरोप
Big Breaking
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 9:51 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 03 Oct 2026 09:50 AM (IST)

    नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक

    पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं शेतकऱ्यांना दिलं होतं आश्वासन. रिंग रोडसाठी जमीन संपादनात गुणांक २ लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गुणांक २ मध्ये जमीन खरेदी केल्यास समाधानकारक मोबदला मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा. प्रशासनाकडून मात्र यापुढे गुणांक १ मध्ये जमीन खरेदी करण्याचा निर्णय. गुणांक १ च्या निर्णयाला विरोध करत शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

  • 03 Oct 2026 09:40 AM (IST)

    भोंदू बाबा अशोक खरात यांच्या पहिल्या जामीन अर्ज संदर्भात सुनावणी

    मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एन एल मोरे यांनी अशोक खरात चे वकील यांना सरकारी पक्षाने पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रे देण्याचे दिले होते आदेश. सुनावणीच्या वेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम होते उपस्थित. भोंदू बाबा अशोक खरात यांच्या जामीन अर्जाला उज्वल निकम यांच्याकडून करण्यात आला होता विरोध

     


  • 03 Oct 2026 09:30 AM (IST)

    आलेगावच्या जंगलात वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती; पाणवठे कोरडेच

    सांगोला तालुक्यातील आलेगावच्या वनक्षेत्रात हरिण, काळवीट, ससे, लांडगे, कोल्हे आणि विविध पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. मात्र दुष्काळामुळे जंगलातील झाडे करपत असून वन्यजीवांसाठी तयार केलेल्या पाणवठ्यांमध्येही पाणी सोडले जात नसल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही पाणी सोडण्याबाबत निर्णय होत नसल्याचा आरोप वन्यजीव अभ्यासक तथा माजी सरपंच प्रा. सुरेश लवटे यांनी केला आहे. तातडीने पाण्याची व्यवस्था करावी

  • 03 Oct 2026 09:20 AM (IST)

    गोराई बीचवर हिट अँड रनचा थरार भरधाव थारने रिक्षाला दिली धडक

    अपघातात चार महिला गंभीर जखमी जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू. भरधाव SUV ने रिक्षाला उडवलं, चार महिला जखमी. गोराई बीचवर फिरायला आलेल्या पर्यटकांना भरधाव चारचाकीने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून पोलिसांनी थार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

  • 03 Oct 2026 09:13 AM (IST)

    शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस राहणार बंद

    जालना शहराचा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार आहे.जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जालना-जायकवाडी योजनेच्या तांत्रिक कामांसाठी 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.पैठण आणि अंबड येथील पंपिंग स्टेशनमधील जुने पंप काढून नवीन पंप बसविण्यासह जलवाहिनी जोडण्याचे काम या कालावधीत करण्यात येणार आहे.


  • 03 Oct 2026 08:51 AM (IST)

    दीपकेंना जय भीम बोलण्याचा अधिकार नाही- प्रविण दरेकर

    दीपकेंना जय भीम बोलण्याचा अधिकार नाही. महत्मा गांधी, नेहरू, बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तुम्ही मोठे होऊ शकत नाही असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

  • 03 Oct 2026 08:36 AM (IST)

    अभिनेते नसिरुद्दीन शहांनी घेतली अभिजीत दिपकेची भेट

    काल दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क मैदानवर सीजेपीचे आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरु असताना ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेची भेट घेतली.

  • 03 Oct 2026 08:34 AM (IST)

    कल्याण स्टेशन परिसरात दुकानदारांचा राडा

    कल्याण स्टेशन परिसरात दुकानदारांचा राडा. बाईकवर बसण्यावरून मोबाईल दुकानदार आणि हॉटेल चालक आपसात भिडले.  भररस्त्यात एकमेकांना केली बेदम मारहाण. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

  • 03 Oct 2026 08:33 AM (IST)

    मार्लेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी मद्यपानाचा प्रकार

    रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर देवस्थान च्या पायथ्याशी मद्यपानाचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. सोशल मिडियावर मद्यपानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • 03 Oct 2026 08:30 AM (IST)

    दुष्काळाच्या तीव्र झळा, बीड जिल्हा कारागृहातील विहीर कोरडी ठाक

    बीड जिल्हा कारागृहातील विहीर कोरडी ठाक. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू.  बीड जिल्हा कारागृहात सध्या चारशे कैदी आहेत. आतमध्ये पाण्याचा थेंबही नाही.  यामुळे दररोज 16 हजार लिटर पाणी टँकरद्वारे पुरवले जात आहे

  • 03 Oct 2026 08:29 AM (IST)

    आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव

    नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा जीव थोडक्यात बचावलाय. १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हावडा एसी दुरंतो एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून रवाना होत असताना एका प्रवाशाने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या आरपीएफ जवानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

काल राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसल्या. 2 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. या आंदोलनात मोठ्या घडामोडी घडल्याचे दिसले. त्याचे पडसात आजही दिसत आहेत.

अंबरनाथ पालिकेची महासभा सुरू असताना बाहेर उभ्या असलेल्या गाडीत काही संशास्पद गोष्टी सापडल्याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. कारण त्यादिवशी नगरसेवक पवन वाळेकर यांच्या हत्येचा त्या संघटीत टोळीचा कट होता, असा खळबळजनक आरोप भाजपाच्या शिष्टमंडळाने केलाय. तर याप्रकरणात योगेश गोरे यांनाही आरोपी करा, अशी मागणी नगरसेवक पवन वाळेकर यांनी केली आहे.

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पंचनामे आणि इतर उपायांना सुरूवात झाली आहे. या काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द झाली आहे. तर दांडीबहाद्दर महसूली कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीचा लाभ ही शेतकऱ्यांना मिळायला सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची कर्ज खाती निरंक झाली आहे. तर राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी अनेक ठिकाणी इच्छुकांच्या भाऊगर्दीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बड्या नेत्यांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us